Maharashtra Schools : राज्यातील पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी आताची सर्वात मोठी महत्त्वाची बातमी समोर येत आहे. ही बातमी विद्यार्थ्यांसाठी जेवढी महत्त्वाची आहे तेवढी त्यांच्या पालकांसाठी आणि साहजिकच त्यांच्या शिक्षकांसाठी सुद्धा फारच खास ठरणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती परीक्षेचा अंतरिम निकाल आज जाहीर होणार आहे.
आम्ही आपणास सांगू इच्छितो की, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेतलेल्या पाचवी आणि आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेचा अंतरिम निकाल आज म्हणजेच 25 एप्रिल 2025 रोजी जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे.

जाणकार लोकांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शाळांना पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीचा निकाल त्यांच्या लॉगिनद्वारे उपलब्ध करून दिला जाणार आहे. तसेच पाचव्या आणि आठवीच्या विद्यार्थ्यांना तसेच त्यांच्या पालकांना अधिकृत संकेतस्थळावर शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल पाहता येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
खरे तर गेल्या काही दिवसांपासून या निकालाची विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना प्रतीक्षा होती अखेर कार आज हा निकाल जाहीर करण्यात येत आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांची गेल्या काही दिवसांपासून ची प्रतीक्षा आता संपणार असे आपण म्हणू शकतो.
या परीक्षेबाबत अधिक माहिती अशी की, या परीक्षेसाठी राज्यातील लाखो विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. पाचवीचे तब्बल पाच लाख 46 हजार 874 विद्यार्थी या परीक्षेसाठी बसले होते आणि आठवीच्या परीक्षेबाबत बोलायचं झालं तर तीन लाख 65 हजार 855 एवढे विद्यार्थी या परीक्षेसाठी बसले होते.
ही शिष्यवृत्तीची परीक्षा 9 फेब्रुवारी 2025 रोजी एकाच दिवशी घेण्यात आली आणि ही परीक्षा संपूर्ण राज्यभरात झाली होती. दरम्यान आज या परीक्षेचा निकाल जाहीर होणार आहे यामुळे आता याचा निकाल कसा बघायचा, कुठे बघायचा याबाबत आपण माहिती जाणून घेणार आहोत.
निकाल कसा पाहणार ?
पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल www.mscepune.in आणि www.puppssmsce.in या संकेतस्थळांवर पाहता येणार आहे. दरम्यान या परीक्षेत बसलेल्या विद्यार्थ्यांना जर गुणपडताळणी हवी असेल तर त्यांना आजपासूनच अर्ज सादर करता येणार आहे.
आज 25 एप्रिल पासून ते 4 मे 2025 पर्यंत विद्यार्थ्यांना गुण पडताळणीसाठी अर्ज करता येणार आहे. शाळेच्या माहितीमध्ये दुरुस्ती हवी असल्यास मुख्याध्यापकांनी [email protected] वर 4 मे 2025 पूर्वी विनंतीपत्र पाठवावे अशी सुद्धा माहिती यावेळी देण्यात आली आहे.
महत्त्वाची बाब म्हणजे 30 दिवसांत गुणपडताळणीचा निर्णय कळवला जाणार असल्याचे सांगितले गेले आहे. दरम्यान, गुण पडताळणीचा निर्णय जाहीर झालेत की मग याचा अंतिम निकाल आणि गुणवत्ता यादी त्यानंतर जाहीर केली जाणार आहे.