Maharashtra Schools : पुढील वर्षी दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आत्ताच्या घडीची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. म्हणजेच जे विद्यार्थी पुढील शैक्षणिक वर्षात दहावी आणि बारावीच्या वर्गात प्रवेश घेतील त्यांच्यासाठी आणि त्यांच्या पालकांसाठी आजची ही बातमी खास राहील.
खरेतर, काल 5 मे 2025 रोजी महाराष्ट्र राज्य बोर्डाचा बारावीचा निकाल जाहीर करण्यात आला. दरम्यान एचएससीचा निकाल जाहीर झाल्यानंतर महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

खरंतर, कालच्या निकालात राज्यातील लाखो विद्यार्थ्यांनी यश संपादित केले आहे. त्यामुळे विद्यार्थी आणि पालक मोठ्या प्रमाणात उत्साही आहेत आणि आता पुढील वर्गातील प्रवेशासाठी विद्यार्थ्यांकडून तयारी सुरू करण्यात आली आहे.
बारावी परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर विद्यार्थी आता उच्च शिक्षणासाठी नामांकित कॉलेजमध्ये ऍडमिशन घेण्याची तयारी करत आहेत. तर दुसरीकडे महाराष्ट्र राज्य बोर्डाकडून नव्या शैक्षणिक वर्षातील दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.
राज्य बोर्डाचा निर्णय नेमका काय
मिळालेल्या माहितीनुसार शैक्षणिक वर्ष 2025 – 26 साठी दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षा शुल्क राज्य बोर्डाकडून वाढवण्यात आले आहे. बोर्ड एक्झाम फी दहा टक्क्यांनी वाढवण्याचा निर्णय बोर्डाकडून घेण्यात आला आहे. बोर्डाच्या कार्यकारी परिषदेच्या बैठकीत याबाबतचा निर्णय झाला असल्याची माहिती संबंधितांकडून देण्यात आली आहे.
मात्र बोर्डाकडून फक्त एक्झाम फी वाढवण्यात आली आहे, म्हणजेच दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांची फक्त बोर्ड एक्झाम फी वाढणार आहे इतर शुल्क जसे होते तसेच कायम राहतील. इतर शुल्कांमध्ये जसे प्रशासकीय शुल्क, गुणपत्रक शुल्क व प्रमाणपत्र शुल्कात कोणताही बदल केला नाही.
यासाठी प्रत्येकी 20 रुपये शुल्क आकारले जाते आणि पुढील शैक्षणिक वर्षात देखील एवढेच शुल्क आकारले जाणार आहे. खरे तर गेल्यावर्षीही परीक्षा शुल्कात वाढ करण्यात आली होती. सलग तीन वर्षांपासून बोर्ड कडून परीक्षा शुल्कात वाढ केली जात आहे. गेल्या तीन वर्षांच्या काळात परीक्षा शुल्क 30 टक्क्यांनी वाढले आहे.
आता किती फी भरावी लागणार?
पुढील शैक्षणिक वर्षाच्या बोर्ड परीक्षेसाठी म्हणजेच शैक्षणिक वर्ष 2025 26 साठी दहावीच्या अन बारावीच्या विद्यार्थ्यांना अतिरिक्त पन्नास रुपये बोर्ड फी भरावी लागणार आहे. अर्थातच परीक्षा शुल्कात 50 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना आता एक्झाम फी म्हणून 520 रुपये भरावे लागणार आहेत.
शैक्षणिक वर्ष 2024 25 मध्ये ही फी 470 एवढी होती. तसेच जे विद्यार्थी 17 नंबर चा फॉर्म भरून बोर्ड एक्झाम देणार आहे त्यांना 1110 एवढी नोंदणी फी भरावी लागणार आहे. एकंदरीत राज्य बोर्डाकडून पुढील शैक्षणिक व वर्षासाठी दहावी-बारावीच्या बोर्ड परीक्षेची एक्झाम फी वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.