Maharashtra Schools : महाराष्ट्र राज्य बोर्डाचा दहावीचा आणि बारावीचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. बोर्डाने आधी बारावीचा निकाल जाहीर केला आणि त्यानंतर दहावीचा निकाल जाहीर करण्यात आला.
चालू शैक्षणिक वर्षातील म्हणजेच शैक्षणिक वर्ष 2024 – 25 या वर्षातील महाराष्ट्र राज्य बोर्डाचा बारावीचा निकाल पाच मे 2025 रोजी दुपारी एक वाजता जाहीर झाला. यानंतर अवघ्या आठ दिवसात राज्य बोर्डाचा दहावीचा निकाल लागला. एसएससी म्हणजेच दहावीचा निकाल 13 मे 2025 रोजी जाहीर करण्यात आला.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावी आणि बारावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर आता विद्यार्थ्यांसाठी एक मोठा निर्णय घेतला आहे. हा निर्णय पुढील वर्षी दहावी आणि बारावीला ऍडमिशन घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अधिक महत्त्वाचा आहे.
राज्य बोर्डाने काय निर्णय घेतलाये?
महाराष्ट्र राज्य बोर्डाने पुढील वर्षी दहावी आणि बारावीला ऍडमिशन घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी नुकताच एक मोठा निर्णय घेतलाय. हा निर्णय मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात घेण्यात आला असून या निर्णया अंतर्गत दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षेच्या शुल्कात वाढ करण्यात आली आहे.
यामुळे विद्यार्थ्यांना अतिरिक्त भुर्दंड सहन करावा लागणार आहे. खरे तर दरवर्षी दहावी आणि बारावीला लाखो विद्यार्थी ऍडमिशन घेतात आणि याच लाखो विद्यार्थ्यांसाठी हा निर्णय महत्वाचा आहे.
आम्ही आपणास सांगू इच्छितो की राज्य शिक्षण मंडळाचा कार्यकारी परिषदेच्या बैठकीत या संदर्भात सविस्तर चर्चा झाली होती आणि या चर्चेनंतर शुल्क वाढीवर अंतिम निर्णय घेण्यात आला आहे.
महत्वाची बाब अशी की गेल्या वर्षी देखील या शुल्कात वाढ करण्यात आले होती आणि यंदाही म्हणजेच शैक्षणिक वर्ष 2025 – 26 साठी देखील शुल्कात वाढ करण्यात आली आहे. तथापि बोर्डाकडून फक्त आणि फक्त परीक्षा शुल्कात वाढ करण्यात आलेली आहे इतर शुल्क जसे होते तसेच राहतील.
प्रशासकीय शुल्क, गुणपत्रक शुल्क आणि प्रमाणपत्र शुल्कात बोर्डाकडून कोणतीच वाढ करण्यात आलेली नाही. गेल्यावर्षीप्रमाणे हे शुल्क प्रत्येकी 20 रुपये एवढेच राहणार आहे.
आम्ही आपल्या माहितीसाठी सांगू इच्छितो की दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेनंतर मिळणाऱ्या गुणपत्रिका व प्रमाणपत्रे लॅमिनेट स्वरूपात दिली जातात आणि यासाठी शुल्क वसूल केले जाते. हे शुल्क प्रत्येकी 20 रुपये इतके राहणार आहे.
दरम्यान पुढील शैक्षणिक वर्षात म्हणजे 2025 – 26 मध्ये या शुल्कात कोणताही बदल करण्यात आलेला नाही, अशी माहिती संबंधितांकडून देण्यात आली आहे. दरम्यान आता आपण दहावी आणि बारावी बोर्डाच्या शुल्कात किती वाढ झाली आहे याचा आढावा घेणार आहोत.
दहावी – बारावी बोर्डाच्या शुल्कात किती वाढ झाली?
मिळालेल्या माहितीनुसार, दहावी- बारावीच्या परीक्षेसाठी शैक्षणिक वर्ष 2025 – 26 मध्ये 520 रुपये शुल्क भरावे लागणार अशी माहिती बोर्डाकडून देण्यात आली आहे आहे. या शैक्षणिक शुल्कात बोर्डाकडून दहा टक्क्यांची वाढ करण्यात आली आहे म्हणजेच शैक्षणिक शुल्क 50 रुपयांनी वाढले आहे.
गेल्या शैक्षणिक वर्षात हे शुल्क 470 रुपये इतके राहणार आहे. याशिवाय, महाराष्ट्र राज्य बोर्डाकडून 17 नंबर फॉर्म भरुन परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांना 1,110 रुपये नोंदणी फी भरावी लागणार असा सुद्धा निर्णय बोर्डाने घेतलेला आहे.