सरकारच्या नव्या आदेशामुळे महाराष्ट्रातील ‘या’ 7,000 शिक्षकांच्या नोकऱ्या धोक्यात !

आगामी काळात राज्यातील हजारो शिक्षकांना आपली नोकरी गमवावी लागणार आहे. राज्य सरकारने अलीकडेच एक मोठा निर्णय घेतलाय. या निर्णयामुळे काही शिक्षकांची नोकरी जाण्याची भीती व्यक्त होत आहे.

Published on -

Maharashtra Schools : महाराष्ट्रातील शिक्षकांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, राज्यातील तब्बल 7,000 शिक्षकांच्या नोकऱ्या धोक्यात आल्या आहेत. खरंतर एकीकडे राज्यातील बहुसंख्य शाळांमधील पटसंख्या कमी होत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे आणि शिक्षक अतिरिक्त होण्याची भीती व्यक्त होत आहे तर दुसरीकडे आता राज्य शासनाच्या एका नव्या आदेशाने आणखी हजारो शिक्षक अतिरिक्त होणार आहेत.

महाराष्ट्र राज्य शासनाच्या कला शिक्षण मंडळाच्या एका नव्या आदेशानंतर राज्यातील तब्बल 7000 कला शिक्षकांच्या नोकऱ्या जाणार असल्याचे बोलले जात आहे.

काय आहे नवा आदेश ?

कला शिक्षण मंडळाने 500 विद्यार्थ्यांना मागे एक कला शिक्षक असावा असा एक नवीन आदेश काढलेला आहे. एकीकडे मराठी शाळांमधील विद्यार्थ्यांची पटसंख्या गेल्या काही वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे.

त्यामुळे राज्यातील बऱ्याच शाळा बंद झालेल्या आहेत. अशातच आता 500 विद्यार्थ्यांमागे एक कला शिक्षक हा नवा नियम यामुळे 500 पेक्षा कमी पटसंख्या असणाऱ्या शाळेतील कला शिक्षकाची नोकरी धोक्यात आली आहे.

यामुळे आता या निर्णयानंतर शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी संघटनांकडून काय भूमिका घेतली जाते? हे पाहणे उत्सुकतेचे राहणार आहे. तसेच या निर्णयानंतर संबंधित कला शिक्षकांच्या नोकऱ्यांवर गंडांतर येणार का हे सुद्धा पाहणे विशेष खास राहील. 

नवा आदेश नवीन शैक्षणिक धोरणाच्या विरोधात 

महाराष्ट्रात केंद्राच्या धर्तीवर नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी सुरू आहे. नवीन शैक्षणिक धोरण हे सृजनशीलतेचा म्हणजेच शिक्षणाचा आग्रह धरणारे धोरण आहे. पण राज्य सरकारच्या कलाशिक्षण मंडळांने जो निर्णय घेतलाय तो पूर्णपणे या धोरणाच्या विरोधातला आहे.

विद्यार्थ्यांच्या सुर्जनशीलतेचा विकास करायचा असेल तर त्यांना मैदानी खेळांसोबतच आणि इतर क्रीडा उपक्रमांसोबतच चित्रकला, हस्तकला आणि दृश्यकला हे विषय सुद्धा शिकवणे आवश्यक आहे. आता हे विषय इतके पण सोपे नाहीत की पाचशे विद्यार्थ्यांना एक शिक्षक शिकवू शकेल. यासाठी वैयक्तिक मार्गदर्शनाची आवश्यकता असते.

मात्र राज्य सरकारने आता 500 विद्यार्थ्यांमागे एक कला शिक्षक नेमायचा असा आदेश काढलेला आहे. साहजिकच यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य आणि त्यांच्या सुर्जनशीलतेचा विकास याला मोठा धक्का पोहोचणार आहे. यामुळे संबंधित कला शिक्षकांच्या नोकऱ्या देखील धोक्यात आल्या आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!