दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी आत्ताची सर्वात महत्त्वाची बातमी !

दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी एक कामाची अपडेट समोर आली आहे. फेब्रुवारी - मार्च 2025 मध्ये बोर्ड एक्झाम दिलेल्या अन अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी ही बातमी खास ठरणार आहे.

Published on -

Maharashtra Schools : शैक्षणिक वर्ष 2024-25 मधील दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांच्या बोर्ड एक्साम फेब्रुवारी – मार्च 2025 मध्ये झाल्यात. या दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षेचा रिझल्ट मे महिन्यात डिक्लेअर करण्यात आला. मे च्या पहिल्या आठवड्यात बारावीचा रिझल्ट लागला आणि त्यानंतर मग लगेचच दहावीचा रिझल्ट जाहीर करण्यात आला. शैक्षणिक वर्ष 2024 – 25 मध्ये दहावी आणि बारावीचा निकाल चांगला लागला.

नेहमीप्रमाणे दोन्ही वर्गांच्या निकालात मुलींनी बाजी मारली. दरम्यान दहावी आणि बारावी परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी नेहमीप्रमाणेच पुरवणी परीक्षा घेण्यात आली होती. जून-जुलै 2025 मध्ये ही पुरवणी परीक्षा घेण्यात आली होती आणि आता पुरवणी परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. 

काय आहे नवीन अपडेट?

मिळालेल्या माहितीनुसार, स्टेट बोर्ड ऑफ सेकंडरी अँड हायर सेकंडरी एज्युकेशनने दहावी आणि बारावी पुरवणी परीक्षेचा निकाल आज अर्थातच 29 जुलै 2025 रोजी जाहीर करण्याची घोषणा केली आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे जून- जुलै महिन्यात घेण्यात आलेल्या इयत्ता दहावी आणि बारावी पुरवणी परीक्षेचा निकाल आज मंगळवारी जाहीर होणार आहे. हा रिजल्ट दुपारी एक वाजता डिक्लेअर केला जाईल आणि विद्यार्थ्यांना नेहमीप्रमाणेच महाराष्ट्र राज्य बोर्डाच्या अधिकृत संकेतस्थळावर हा निकाल पाहता येणार आहे.

आज दहावी आणि बारावी बोर्डाच्या पुरवणी परीक्षेचा निकाल जाहीर केला जाईल आणि उद्यापासून म्हणजेच 30 जुलै 2025 पासून या पुरवणी परीक्षेतील विद्यार्थ्यांना आपल्या गुणांची पडताळणी व उत्तरपत्रिकांच्या छायांकित प्रतीसाठी तसेच पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज सादर करता येणार आहेत. 

पुनर्मूल्यांकनाची प्रक्रिया कशी असणार ?

विद्यार्थ्यांना 30 जुलै ते 8 ऑगस्ट 2025 या कालावधीत गुण पडताळणीसाठी आणि उत्तर पत्रिकांच्या छायांकित प्रतीसाठी अर्ज करता येणार आहेत. आपापल्या विभागीय मंडळाकडे ऑनलाइन पद्धतीने यासाठी अर्ज करायचे आहेत.

मात्र हे अर्ज सादर करण्यासाठी विद्यार्थ्यांना आठ ऑगस्टपर्यंतच मुदत राहणार आहे. या मुदतीनंतर विद्यार्थ्यांना अर्ज करता येणार नाही. दरम्यान जर विद्यार्थ्यांना पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज करायचा असेल तर सुरुवातीला विद्यार्थ्यांना आपल्या उत्तर पत्रिकेची छायांकित प्रत मागवावी लागणार आहे.

म्हणजे विद्यार्थ्यांना सुरुवातीला उत्तर पत्रिकेची छायांकित प्रत मागवण्यासाठी अर्ज करायचा आहे. छायांकित प्रत त्यांच्याकडे आल्यानंतर मग विद्यार्थ्यांना पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज करायचा आहे. जर विद्यार्थ्यांना या संदर्भातील सविस्तर माहिती जाणून घ्यायची असेल तर त्यांनी त्यांच्या शिक्षकांची मदत घ्यायला हवी आणि आपापल्या विभागीय मंडळाशी संपर्क साधायला हवा.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe
Stay updated!