विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांसाठी महत्त्वाची बातमी! महाराष्ट्रदिनी राज्यातील ‘ही’ मराठी शाळा कायमची बंद होणार, कारण काय ?

उद्या आपल्या महाराष्ट्रात महाराष्ट्र दिन मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. खरतर, गेल्या काही वर्षांमध्ये माय मराठीचा डंका संपूर्ण जगभर वाजला आहे. पण आपल्या महाराष्ट्रात मात्र मराठी धोक्यात आली आहे. गेल्या काही वर्षांमध्ये विद्यार्थ्यांची अपुरी संख्येचे कारण पुढे करत राज्यातील अनेक मराठी शाळा बंद झाले आहे. उद्या एक मे 2025 रोजी कमी पटसंख्याच्या कारणामुळे राज्यातील आणखी एक महत्त्वाची मराठी शाळा बंद होणार आहे.

Published on -

Maharashtra Schools : राज्यातील विद्यार्थी शिक्षक आणि पालकांसाठी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. खरंतर, उद्या एक मे 2025 रोजी संपूर्ण महाराष्ट्रात महाराष्ट्र दिन मोठ्या थाटामाटात साजरा होणार असून यंदाच्या महाराष्ट्र दिनी महाराष्ट्रातील एक मराठी शाळा कायमची बंद होणार असल्याचे वृत्त हाती आले आहे.

एकीकडे मराठी भाषेच्या संवर्धनासाठी सर्वसामान्य मराठी माणूस तसेच राजकारणातील आणि समाजकारणातील व्यक्तींकडून मोठा लढा उभा केला जात आहे. मराठी संवर्धनासाठी सर्वजण एकजूट होत आहेत तर दुसरीकडे महाराष्ट्रात मराठी शाळा बंद करण्याचा कार्यक्रम सुरूच आहे.

दिवसेंदिवस मराठी शाळांमधील पटसंख्या कमी होत असल्याने मराठी शाळा बंद पडण्याचे सत्र गेल्या काही वर्षांपासून सुरूच असून ही मराठी भाषेसाठी धोक्याची घंटा असल्याचे जाणकार लोकांचे म्हणणे आहे.

मिळालेल्या माहितीनुसार मुंबईमधील दादर येथे स्थित इंडियन एज्युकेशन सोसायटीचे नाबर गुरुजी विद्यालय उद्या महाराष्ट्र दिनी बंद होणार आहेत. विद्यार्थ्यांची पटसंख्या मोठ्या प्रमाणात कमी झाली असल्याने एक मे 2025 पासून या मराठी शाळेला टाळे लावण्याची नामुष्की शाळा प्रशासनावर ओढवली असल्याची माहिती समोर आली आहे.

सद्यस्थितीत दादर येथील या मराठी शाळेत इयत्ता नववी, दहावीच्या वर्गात प्रत्येकी 9 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. मात्र उद्या ही शाळा बंद होणार असल्याची बातमी समोर आली असल्याने आता या संबंधित विद्यार्थ्यांना आपल्या आसपासच्या अन्य शाळांमध्ये प्रवेश घ्यावा लागणार आहे. यामुळे संबंधित शाळेतील विद्यार्थी त्यांचे पालक आणि शिक्षकांमध्ये तीव्र नाराजीचे स्वर ऊमटत आहेत.

महाराष्ट्र दिनीच महाराष्ट्रातील एक मराठी शाळा बंद पडणार असल्याने अनेकांच्या माध्यमातून यावर नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. दादर येथील या मराठी शाळेबाबत बोलायचं झालं तर गेल्या अनेक वर्षांपासून या विद्यालयात नाममात्र शुल्क आकारून विद्यार्थ्यांना मराठी माध्यमातून शिक्षण दिले जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार चालू शैक्षणिक वर्षात या शाळेतील 35 विद्यार्थ्यांनी एसएससी म्हणजेच दहावी बोर्डाची परीक्षा दिली. मात्र, गेल्या एका दशकाहून अधिक काळापासून विविध कारणांमुळे शाळेतील पटसंख्येला गळती लागली आहे. या शाळेतील विद्यार्थी संख्या गेल्या दहा-बारा वर्षांच्या काळात मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे.

शाळेकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार सध्या इथे इयत्ता नववीत 9 आणि दहावीच्या वर्गात 9 असे मिळून केवळ 18 विद्यार्थी मराठी माध्यमातून शिक्षण घेत आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे सध्या या शाळेत इयत्ता पाचवी, सहावी, सातवी, आठवीची पटसंख्या शून्य आहे म्हणजे पुढच्या शैक्षणिक वर्षात या शाळेत शिकायला विद्यार्थीच उपलब्ध राहणार नाहीत.

आता अपुऱ्या विद्यार्थी संख्येमुळे मराठी माध्यमाची ही शाळा एक मे पासून बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती देण्यात आली आहे. दुसरीकडे सध्या जे विद्यार्थी या शाळेत शिकत आहेत त्यांचे देखील विद्यार्थ्यांची संख्या जास्त नसल्याने मनोबल पूर्णपणे खचलेले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News