राज्यातील ४थी ते ८वीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी ! येत्या शैक्षणिक वर्षापासून ‘हा’ नवीन निर्णय लागू होणार, शिक्षण मंत्री भुसे यांचे निर्देश

महाराष्ट्र राज्यातील शालेय शिक्षण विभागाकडून घेण्यात आलेले काही निर्णय गेल्या काही महिन्यांच्या काळात फिरवण्यात आले आहेत. दरम्यान आता मंत्री भुसे यांनी पुन्हा एकदा शालेय शिक्षण विभागाचा एक महत्वाचा निर्णय बदलण्याचे संकेत दिले आहेत.

Published on -

Maharashtra Schools : शिक्षण मंत्री दादा भुसे पुन्हा एकदा शालेय विद्यार्थ्यांसाठी घेण्यात आलेला निर्णय बदलण्याच्या तयारीत आहेत. खरे तर गेल्या काही महिन्यांमध्ये शालेय शिक्षण विभागाने घेतलेले अनेक निर्णय मंत्री भुसे यांनी बदललेले आहेत.

यातील काही बदलांचे अनेकांकडून स्वागत करण्यात आले आहे तर काही बदलांबाबत विरोधकांकडून प्रश्न उपस्थित केले जात आहेत. मंत्री भुसे यांनी मोफत गणवेश योजनेबाबतचा आधीचा निर्णय चेंज केलाय, तसेच पुस्तक-वही एकत्रसह इत्यादी निर्णय यापूर्वीच बदललेले आहेत.

दरम्यान आता शालेय शिक्षण विभागाचा आणखी एक मोठा निर्णय मंत्री भुसे बदलणार असल्याची बातमी समोर आली आहे. त्यामुळे ही बातमी राज्यातील चौथी ते आठवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी आणि त्यांच्या पालकांसाठी अधिक खास राहणार आहे. 

कोणता निर्णय बदलणार?

खरे तर सध्या पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्तीची परीक्षा घेतली जाते. आधी हीच परीक्षा चौथी आणि सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी होत असे. मात्र गेल्या काही काळापासून शिष्यवृत्तीची परीक्षा पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी करण्यात आली आहे.

दरम्यान आता हीच शिष्यवृत्तीची परीक्षा पुन्हा एकदा चौथी आणि सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी करण्यात यावी असे निर्देश मंत्री भुसे यांच्याकडून देण्यात आले आहेत.

शालेय विद्यार्थ्यांसाठी लागू असणारे शिष्यवृत्तीची परीक्षा पुन्हा एकदा चौथी आणि सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी करण्याबाबत पडताळणी करण्याच्या सूचना शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी दिल्या आहेत.

शैक्षणिक वर्ष २०२५ – २६ मध्ये लागू होईल नवा निर्णय 

दादा भुसे यांनी शिष्यवृत्ती ची परीक्षा पुन्हा एकदा पूर्ववत करण्याचा सूचना दिले आहे. महत्त्वाचे म्हणजे यावर्षीपासूनच अर्थातच शैक्षणिक वर्ष २०२५ – २६ पासूनच हा निर्णय अमलात आणला जावा यासाठी शालेय शिक्षण विभागाने प्रयत्न करावेत असे सुद्धा निर्देश मंत्री महोदयांनी यावेळी दिले आहेत.

दादा भुसे यांनी शालेय शिक्षण विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबतच्या बैठकीत याबाबतचे सूतोवाच केले आहे. शालेय विद्यार्थ्यांसाठी लागू करण्यात आलेल्या शिष्यवृत्ती परीक्षामधील बदलामुळे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळू शकेल व त्यांचे पुढील शिक्षण सुलभ होणार आणि पुढील शिक्षण घेण्यास विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढेल असा विश्वास दादा भुसे यांनी व्यक्त केला आहे.

नक्कीच मंत्री भुसे यांनी सांगितल्याप्रमाणे जर शिष्यवृत्ती परीक्षेत बदल झाला तर पूर्वीप्रमाणे चौथीच्या विद्यार्थ्यांना आणि सातवीच्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती परीक्षा देता येणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe