Maharashtra Schools : यावर्षी दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना लवकरच कसोटी द्यावी लागणार आहे. या दोन्ही वर्गांच्या परीक्षा यंदा वेळेआधी घेतल्या जाणार असून याबाबतचे वेळापत्रक राज्य बोर्डाकडून नुकतेच जाहीर करण्यात आले आहे. यावर्षी जवळपास पंधरा दिवस आधी परीक्षा घेतल्या जाणार आहेत यामुळे विद्यार्थ्यांना आतापासूनच कसून अभ्यासाची तयारी करावी लागणार आहे.
वेळेआधी परीक्षा होणार असल्याने विद्यार्थ्यांना आत्तापासूनच आपल्या अभ्यासाचे नियोजन करावे लागेल जेणेकरून त्यांचा संपूर्ण सिलॅबस कव्हर होईल आणि परीक्षेत चांगले मार्क्स मिळवता येतील.

दरम्यान आता आपण राज्य बोर्डाने जाहीर केलेले वेळापत्रक नेमके कसे आहे, दहावी आणि बारावीच्या बोर्ड एक्झाम कधी सुरू होतील, तसेच प्रॅक्टिकल परीक्षा कधी असतील? या संदर्भातील सविस्तर माहिती आजच्या या लेखातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
राज्य बोर्डाचे सुधारित वेळापत्रक
विद्यार्थ्यांना वेळेत अभ्यासाचे नियोजन करता यावे तसेच त्यांचा ताण कमी व्हावा यासाठी यावेळी बोर्ड कडून लवकरच वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. फेब्रुवारी मार्च 2026 बोर्ड एक्झाम च्या लेखी व प्रात्यक्षिक परीक्षेचे वेळापत्रक राज्य बोर्डाकडून नुकतेच जाहीर करण्यात आले आहे.
पण, बोर्ड परीक्षांचे विषयनिहाय सविस्तर अंतिम वेळापत्रक स्वतंत्रपणे मंडळाच्या संकेतस्थळावर यथावकाश जाहीर करण्यात येईल अशी पण माहिती बोर्डाकडून यावेळी देण्यात आली आहे. अर्थात बोर्डाचे फायनल वेळापत्रक नाही. गरज पडल्यास बोर्डाकडून या वेळापत्रकात बदल होणे शक्य आहे.
परंतु जर फार मोठी आणीबाणीची समस्या उद्भवली नाही तर या वेळापत्रकात बदल होणार नाही. यामुळे विद्यार्थ्यांनी हेच वेळापत्रक गृहीत धरून अभ्यासाला लागावे जेणेकरून त्यांचा अभ्यास कव्हर होईल. दरम्यान राज्य बोर्डाने आत्ता जे वेळापत्रक जाहीर केले आहे ते राज्य बोर्डाचे सचिव प्रमोद गोफणे यांच्या सहीनेच जारी करण्यात आले आहे.
या परिपत्रकानुसार एचएससी अर्थातच 12 वी ची लेखी परीक्षा मंगळवार 10 फेब्रुवारी 2026 रोजी सुरु होणार आहे. तसेच ही परीक्षा बुधवार 18 मार्च 2026 रोजी संपन्न होईल. या कालावधीत बारावीच्या विद्यार्थ्यांची माहिती तंत्रज्ञान व सामान्यज्ञान विषयांच्या ऑनलाईन परीक्षा पण घेतल्या जाणार आहेत.
तसेच माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (SSC) म्हणजे 10 वीची परीक्षा शुकवार 20 फेब्रुवारी 2026 रोजी सुरू होणार आहे. तसेच बुधवार 18 मार्च 2026 रोजी या परीक्षा संपन्न होतील.
प्रॅक्टिकल एक्झाम बाबत बोलायचं झालं तर एच एस सी च्या अर्थात 12 वी बोर्डाच्या प्रात्यक्षिक श्रेणी तोंडी व अंतर्गत मूल्यमापन तसेच व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रात्यक्षिक परीक्षा 23 जानेवारी 2026 ते 9 फेब्रुवारी 2026 या कालावधीत आयोजित करण्यात आल्या आहेत.
तसेच दहावी बोर्डाच्या प्रात्यक्षिक श्रेणी व अंतर्गत मूल्यमापन तसेच अंतर्गत व्यावसायिक अभ्यासक्रम प्रात्यक्षिक परीक्षा 2 फेब्रुवारी ते 18 फेब्रुवारी दरम्यान होतील अशी माहिती बोर्डाकडून यावेळी देण्यात आली आहे.













