Maharashtra Schools : महाराष्ट्रातील पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी त्यांच्या पालकांसाठी आणि शिक्षकांसाठी महत्त्वाची बातमी समोर येत आहे. खरे तर गेल्या महिन्यात राज्यातील शालेय विद्यार्थ्यांना सुट्ट्या लागल्यात. सध्या विद्यार्थी उन्हाळी सुट्ट्या एन्जॉय करत आहेत. उन्हाळी सुट्ट्यांमुळे अनेक विद्यार्थी आपल्या मामाच्या गावाला गेलेले आहेत.
काही विद्यार्थी आपल्या परिवारासमवेत सहलीला सुद्धा गेलेले आहेत. दुसरीकडे आता उन्हाळी सुट्ट्यांचा हंगाम लवकरच संपणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार सीबीएसई बोर्डाच्या शालेय विद्यार्थ्यांच्या शाळा 9 जून पासून सुरू होणार आहेत.

सीबीएसईची शाळा 9 जून 2025 रोजी उघडणार आहे आणि यामुळे साहजिकच महाराष्ट्र राज्य बोर्डाच्या शाळा कधीपासून सुरू होणार हा सवाल उपस्थित होणे स्वाभाविक आहे. दरम्यान याच संदर्भात राज्य बोर्डाकडून महत्त्वाची माहिती समोर आली आहे.
महाराष्ट्र राज्य बोर्डाच्या शाळा कधी भरणार?
खरे तर, सध्या महाराष्ट्रातील शालेय विद्यार्थ्यांना उन्हाळी सुट्ट्या लागलेल्या आहेत आणि विद्यार्थी उत्साहाने उन्हाळी सुट्ट्या एन्जॉय करत आहेत. तर दुसरीकडे विद्यार्थ्यांना शाळेची सुद्धा आठवण येत आहे.
शाळा कधी भरणार हा सवाल विद्यार्थी आणि पालक सातत्याने उपस्थित करत आहेत. दरम्यान सीबीएसई बोर्डाच्या शाळा या नऊ जूनला सुरू होणार आहेत. तर दुसरीकडे महाराष्ट्र राज्य बोर्डाच्या शाळा या 16 जून पासून सुरू होणार आहेत.
महाराष्ट्रातील अकरा जिल्हे वगळता सगळीकडे शाळा 16 जूनला सुरू होतील अशी माहिती समोर आली आहे. विदर्भात मात्र इतर विभागांच्या तुलनेत थोड्याशा उशिराने शाळा सुरू केल्या जाणार आहेत.
खरे तर दरवर्षी विदर्भात जून महिन्यातही मोठ्या प्रमाणात तापमान पाहायला मिळते आणि यामुळेच विदर्भातील शाळा यंदा उशिराने उघडणार आहेत. CBSE बोर्डाच्या बहुतेक शाळा शहरी भागात आहेत आणि यामुळे या शाळा लवकर उघडल्या जातील आणि राज्य बोर्डाच्या शाळा यापेक्षा उशिराने उघडतील.
राज्य बोर्डाच्या शाळांचे प्रथम सत्र कधी संपणार
खरेतर, सीबीएसईच्या शाळचे नवीन शैक्षणिक वर्ष हे एक एप्रिल पासूनच सुरु झाले आहे. पण सध्या विद्यार्थ्यांना उन्हाळी सुट्ट्या आहेत आणि याच उन्हाळी सुट्टीच्या ब्रेक नंतर आता CBSE चे पहिली ते दहावीचे वर्ग 9 जून 2025 पासून सुरु होणार आहे.
राज्य बोर्डाच्या शाळा मात्र 16 जून 2025 पासून सुरू होतील. राज्य बोर्डाचे नवीन शैक्षणिक वर्ष अर्थातच 2025 – 26 हे शैक्षणिक वर्ष 15 जून 2025 पासून सुरू होईल आणि 16 जून पासून राज्यातील शाळा भरणार आहेत. 16 जून ते 16 ऑक्टोबर 2025 या काळात राज्य बोर्डाच्या शाळांचे प्रथम सत्र राहील.
त्यानंतर मग विद्यार्थ्यांना दिवाळीच्या सुट्ट्या लागतील. दिवाळीच्या सुट्ट्या संपल्यात की मग द्वितीय सत्र सुरू होईल आणि वर्गानुसार, पुढील वर्षाच्या फेब्रुवारी, मार्च आणि एप्रिल महिन्यात विद्यार्थ्यांच्या वार्षिक परीक्षा घेतल्या जातील.