Maharashtra Schools : देशभरातील विद्यार्थ्यांना सध्या उन्हाळी सुट्ट्या लागल्या आहेत. पण विद्यार्थी आता शाळा उघडण्याची वाट पाहत आहेत. खरेतर तापमान वाढू लागले की बहुतेक शाळा त्यांच्या वार्षिक उन्हाळी सुट्ट्या जाहीर करतात. देशातील महाराष्ट्र, राजस्थान, उत्तर प्रदेश, दिल्ली आणि तामिळनाडू सारख्या राज्यांनी 2025 साठी त्यांचे कॅलेंडर सुद्धा जारी केले आहेत.
जवळपास सर्वच राज्यांनी हवामान परिस्थिती, शैक्षणिक मंडळे आणि सरकारी सूचनांनुसार शाळा पुन्हा सुरू करण्याच्या तारखा वेगवेगळ्या ठेवलेल्या आहेत. मात्र, खाजगी संस्थांचे वेळापत्रक वेगळे राहणार आहे. पण राज्य-संचालित किंवा अनुदानित शाळा अधिकृत निर्देशांचे पालन करतील.

राज्यनिहाय शाळेची घंटा कधी वाजणार ?
दिल्ली : दिल्लीतील शाळांना 30 जून पर्यंत उन्हाळी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. येथील शाळा एक जुलैपासून पुन्हा एकदा रिओपन होणार आहेत.
उत्तर प्रदेश : उत्तर प्रदेश राज्यातील शाळांना 15 जून पर्यंत उन्हाळी सुट्ट्या जाहीर करण्यात आल्या आहेत. मात्र येथील शाळा 30 जून पासून ओपन होणार अशी माहिती समोर आली आहे.
राजस्थान : राजस्थान येथील शिक्षण विभागाने जारी केलेल्या परिपत्रकानुसार राजस्थान राज्यातील शाळा 16 जून 2025 पासून सुरु होणार आहेत.
मध्य प्रदेश : मध्यप्रदेश राज्यातील शाळा देखील 16 जून पासून सुरू होतील अशी माहिती समोर आली आहे.
तमिळनाडू : तामिळनाडू राज्यातील शाळांना एक जून पर्यंत उन्हाळी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे आणि येथील शाळा 2 जून पासून पुन्हा एकदा सुरू होणार आहेत.
बिहार : बिहार राज्यातील शाळांना 21 जून पर्यंत उन्हाळी सुट्ट्या राहणार आहेत. त्यानंतर 23 जून पासून येथील शाळा पुन्हा ओपन होतील.
पंजाब : पंजाब राज्यातील शाळांना 30 जून पर्यंत उन्हाळी सुट्ट्या राहतील आणि एक जुलैपासून पुन्हा येथील शाळा सुरू होणार आहेत.
हरियाणा : हरियाणा राज्यातील शाळांना 30 जून पर्यंत उन्हाळी सुट्ट्या राहणार आहेत. यानंतर एक जुलै 2025 पासून पुन्हा एकदा शाळा ओपन होणार आहेत.
कर्नाटक : कर्नाटक मधील उन्हाळी सुट्ट्या 28 मे रोजी संपणार आहेत आणि 29 मे पासून येथील शाळा पुन्हा सुरू होतील.
केरळ : केरळ राज्यातील शाळांना 31 मे पर्यंत उन्हाळी सुट्ट्या राहणार आहेत आणि त्यानंतर एक जून पासून येथील शाळा पुन्हा एकदा ओपन होतील.
छत्तीसगड : छत्तीसगड मधील शाळांना 15 जून पर्यंत उन्हाळी सुट्ट्या राहणार आहेत आणि 16 जून पासून येथील शाळा ओपन होतील.
महाराष्ट्र : महाराष्ट्रातील शाळांना 15 जून पर्यंत उन्हाळी सुट्टी आहेत आणि 16 जून पासून येथील शाळा पुन्हा एकदा ओपन होतील.
गोवा : गोवा मधील शाळांना 8 जूनपर्यंत उन्हाळी सुट्ट्या राहणार आहेत आणि नऊ जून पासून येथील शाळा पुन्हा एकदा ओपन होणार आहेत.
गुजरात : या राज्यातील शाळांना 3 जून पर्यंत सुट्ट्या राहतील आणि चार जून पासून येथील शाळा पुन्हा एकदा सुरू होणार आहे.
पश्चिम बंगाल : पश्चिम बंगाल या राज्यातील शाळा 30 एप्रिल पर्यंत उन्हाळी सुट्टीसाठी बंद राहतील आणि दोन जून पासून पुन्हा एकदा शाळा सुरू होणार आहेत.