Maharashtra Skywalk Project : गेल्या काही वर्षांमध्ये महाराष्ट्रात विविध प्रकल्पांची कामे पूर्ण झाली आहेत. पर्यटनाला चालना मिळावी या अनुषंगाने देखील शासनाकडून विशेष प्रयत्न करण्यात आले आहेत. याच प्रयत्नाचा एक भाग म्हणून महाराष्ट्रातील एका लोकप्रिय पिकनिक स्पॉटवर आता स्कायवॉक विकसित केला जाणार आहे.
पुणे आणि ठाणे जिल्ह्याच्या सीमेवर असणाऱ्या माळशेज घाटात हा प्रकल्प तयार होणार असून यामुळे या पर्यटन स्थळाच्या विकासाला चालना मिळणार आहे. माळशेज घाटातील पर्यटनाला चालना मिळावी या अनुषंगाने फडणवीस सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी स्कायवॉक विकसित केला जाणार असून याच प्रकल्पाबाबत आता एक महत्त्वाचे अपडेट हाती आले आहे.

काय आहे अपडेट
मिळालेल्या माहितीनुसार, या प्रकल्पाच्या संदर्भात नुकतीच एक महत्त्वाची बैठक संपन्न झाली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी या प्रकल्पाचा एकात्मिक प्रस्ताव पुढील एका महिन्यात तयार करण्याचे निर्देश दिले आहेत. पर्यटन विभागाला याबाबतचे निर्देश प्राप्त झाले असून आता लवकरच या प्रकल्पाचा एकात्मिक प्रस्ताव रेडी होणार आहे.
राजधानी मुंबईत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या अध्यक्षतेखाली या प्रकल्पाच्या संदर्भात एक महत्त्वाची बैठक संपन्न झाली. या बैठकीत या प्रकल्पाच्या बाबत सखोल चर्चा झाली असून यावेळी पवार यांनी असे निर्देश दिले आहेत की, हा प्रकल्प माळशेज घाटातील महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या विश्रामगृहाशेजारील टेकडीवरील रिकाम्या जागेत तयार केला जावा.
महत्त्वाचे म्हणजे हा प्रकल्प पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप म्हणजेच सार्वजनिक खाजगी भागीदारी विकसित करण्यात यावा अशा सूचना देखील उपमुख्यमंत्री महोदयांच्या माध्यमातून देण्यात आल्या आहेत. माळशेज घाट हे राज्यातील मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक आणि अहिल्यानगर या शहरांपासून हाकेच्या अंतरावर असणारे एक लोकप्रिय पिकनिक स्पॉट आहे.
या ठिकाणी दररोज पर्यटकांची मोठी गर्दी पाहायला मिळते. दरवर्षी पिकनिक साठी येथे लाखो पर्यटक गर्दी करत असतात. दरम्यान जर या ठिकाणी काचेचा स्कायवॉक विकसित करण्यात आला तर पर्यटक मोठ्या प्रमाणात आकर्षित होणार अशी शक्यता आहे.
यामुळे माळशेज घाटातील पर्यटनालाच चालना मिळणार असे नाही, तर यामुळे येथील स्थानिक अर्थव्यवस्थेला सुद्धा नवीन उभारी मिळणार आहे.
या प्रसिद्ध पिकनिक स्पॉटच्या सर्वांगीण विकासासाठी हा प्रकल्प एक गेम चेंजर प्रकल्प म्हणून पाहिला जात आहे. हेच कारण आहे की पर्यटन विभागाने एकत्रित आणि सुस्पष्ट प्रस्ताव सादर करणे महत्त्वाचे ठरेल, अशी सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी दिली आहे.