शेतकऱ्यांसाठी दिलासादायक! महाराष्ट्रातील ‘या’ बाजारात सोयाबीनला मिळाला सर्वाधिक भाव, पण…..

यंदाही विजयादशमी झाल्यानंतर सोयाबीनची आवक वाढली असून सध्या सोयाबीनचे दर हे दबावात आहेत. आज राज्यातील मध्य महाराष्ट्र विभागातील सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनला सर्वाधिक भाव मिळाला आहे. या बाजारात आज सोयाबीनला कमाल 5,200 रुपये प्रति क्विंटल असा दर मिळाला आहे.

Updated on -

Maharashtra Soybean Rate : सोयाबीन हे महाराष्ट्रात उत्पादित होणारे एक महत्त्वाचे नगदी पीक आहे. या तेलबिया पिकाची राज्यातील अनेक भागांमध्ये लागवड केली जाते. मराठवाडा, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये सोयाबीन उत्पादित होते. खरीप हंगामातील हे महत्त्वाचे तेलबिया पिक असून या पिकावर राज्यातील बहुतांशी शेतकऱ्यांचे अर्थकारण अवलंबून आहे.

मात्र गेल्या दोन वर्षांपासून शेतकऱ्यांना सोयाबीन पीक परवडत नाहीये. कारण म्हणजे सोयाबीनला बाजारात फारसा भाव मिळत नाहीये. यंदाही अशीच परिस्थिती आहे. दरवर्षी विजयादशमीनंतर राज्यात सोयाबीनची आवक वाढत असते.

यंदाही विजयादशमी झाल्यानंतर सोयाबीनची आवक वाढली असून सध्या सोयाबीनचे दर हे दबावात आहेत. आज राज्यातील मध्य महाराष्ट्र विभागातील सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनला सर्वाधिक भाव मिळाला आहे.

या बाजारात आज सोयाबीनला कमाल 5,200 रुपये प्रति क्विंटल असा दर मिळाला आहे. राज्यातील इतर बाजारांमध्ये मात्र सोयाबीनचे कमाल भाव देखील पाच हजार रुपये प्रति क्विंटलच्या खालीच नमूद करण्यात आले आहेत.

शेतकऱ्यांना सोयाबीनला किमान सात ते आठ हजाराचा भाव मिळावा अशी आशा आहे. प्रत्यक्षात मात्र सोयाबीनचे दर शेतकऱ्यांच्या अपेक्षापेक्षा फारच कमी आहेत. दरम्यान आज आपण राज्यातील प्रमुख बाजारांमध्ये सोयाबीनला नेमका काय भाव मिळाला आहे याविषयी थोडक्यात माहिती पाहणार आहोत.

राज्यातील प्रमुख बाजारांमध्ये सोयाबीनला काय दर मिळाला?

सांगली कृषी उत्पन्न बाजार समिती : या बाजारात सोयाबीनला किमान 4900, कमाल 5200 आणि सरासरी 5,050 असा भाव मिळाला आहे.

मुखेड कृषी उत्पन्न बाजार समिती : या बाजारात सोयाबीनला किमान 4000, कमाल 4575 आणि सरासरी साडेचार हजार रुपये प्रति क्विंटल असा भाव मिळाला आहे.

गंगाखेड कृषी उत्पन्न बाजार समिती : या बाजारात सोयाबीनला किमान 4450, कमाल 4550 आणि सरासरी 4500 असा भाव मिळाला आहे.

मालेगाव वाशिम कृषी उत्पन्न बाजार समिती : या बाजारात सोयाबीनला किमान 4100, कमाल 4550 आणि सरासरी 4300 असा भाव मिळाला आहे.

हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समिती : या बाजारात सोयाबीनला किमान 4 हजार 51, कमाल 4535 आणि सरासरी चार हजार 293 असा दर मिळाला आहे.

अकोला कृषी उत्पन्न बाजार समिती : या बाजारात सोयाबीनला किमान 3550, कमाल 4535 आणि सरासरी 4200 रुपये प्रति क्विंटल असा भाव मिळाला आहे.

घाटंजी कृषी उत्पन्न बाजार समिती : या बाजारात सोयाबीनला किमान 3800, कमाल 4505 आणि सरासरी 4250 असा भाव मिळाला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News