एसटी प्रवाशांसाठी खुशखबर ! महाराष्ट्रातील ‘या’ शहरातून गाणगापूरसाठी सुरु झाली नवीन बससेवा, राज्यातील कोणकोणत्या जिल्ह्यातून धावणार?

कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातूनही नवीन बस गाडी सुरू करण्यात आली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी ते गाणगापूर अशी ही नवीन बससेवा सुरू करण्याचा निर्णय झाला आहे. दरम्यान आता आपण या एसटी महामंडळाच्या नवीन बससेवेचे संपूर्ण वेळापत्रक आणि या गाडीचा रूट कसा आहे याबाबत जाणून घेणार आहोत.

Published on -

Maharashtra ST Bus Service : गाणगापूर हे महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर असणार एक महत्त्वाच तीर्थक्षेत्र. या ठिकाणी संपूर्ण देशभरातील भाविक दर्शनासाठी जातात. कोकणातून गाणगापूरला जाणाऱ्या भाविकांची संख्या सुद्धा फारच उल्लेखनीय आहे.

हेच कारण आहे की कोकणातून गाणगापूरला जाण्यासाठी एसटी महामंडळाकडून नवीन बस सेवा सुरू करण्यात आली आहे. कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातूनही नवीन बस गाडी सुरू करण्यात आली आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी ते गाणगापूर अशी ही नवीन बससेवा सुरू करण्याचा निर्णय झाला आहे. ही बस कोल्हापूर-सोलापूर- अक्कलकोट मार्गे गाणगापूरला जाणार आहे.

यामुळे कोल्हापूर येथील महालक्ष्मी मातेच्या दर्शनासाठी जाणाऱ्या तसेच अक्कलकोट ला जाणाऱ्या भाविकांसाठी देखील ही बस सेवा विशेष फायद्याची राहील. दरम्यान आता आपण या एसटी महामंडळाच्या नवीन बससेवेचे संपूर्ण वेळापत्रक आणि या गाडीचा रूट कसा आहे याबाबत जाणून घेणार आहोत.

कसा असणार रूट ?

सिंधुदुर्ग जिल्ह्यातून गाणगापूरला जाणाऱ्या भाविकांसाठी एसटी महामंडळाकडून नवीन बस सेवा सुरू करण्यात आली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातून गाणगापूरला जाणाऱ्या भाविकांची संख्या फारच उल्लेखनीय आहे आणि याचमुळे ही गाडी सुरू करण्याचा निर्णय सिंधुदुर्ग विभागाकडून घेण्यात आला आहे.

महत्त्वाचे म्हणजे गाणगापूरला जाताना ही गाडी इतरही अनेक महत्त्वाच्या तीर्थक्षेत्रांमधून जाणार आहे. सिंधुदुर्ग एस.टी. विभागाकडून सावंतवाडी-गाणगापूर ही सिंधुदुर्गातून गाणगापूरला जाणारी पहिली एस.टी. बस सुरू करण्यात आली आहे.

कसं असणार वेळापत्रक?

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी बस डेपो मधून सुरू करण्यात आलेल्या नव्या बससेवेचे वेळापत्रकाबाबत बोलायचं झालं तर ही गाडी दुपारी 2.45 वाजता सावंतवाडी आगारातून गाणगापूरसाठी जाणारी एस.टी. बस सोडली जाणार आहे.

ही बस कुडाळ, कणकवली, गगनबावडामार्गे, कोल्हापूर-सोलापूर, अक्कलकोट, गाणगापूर या मार्गे चालवली जाणार आहे. गाणगापूर येथून त्याचवेळेला म्हणजे पहाटे 2.45 वाजता सुटून त्याच मार्गाने पुन्हा सिंधुदुर्गात येईल. आजवर सिंधुदुर्ग जिल्ह्यातून अन्य सर्व तीर्थस्थळावर एस.टी. बसेस धावत होत्या.

परंतु गाणगापूर या दत्तस्थळावर ही एस.टी.बस जाणार असल्याने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रवासी जनतेची सोय होणार असा आशावाद व्यक्त करण्यात आला आहे. यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भाविकांची मोठी सोय होणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News