Maharashtra ST Bus : महाराष्ट्रात रेल्वेनंतर एसटीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या सर्वात जास्त आहे. तुम्हीही कधी ना कधी लाल परीने प्रवास केलाच असेल. दरम्यान महाराष्ट्रातील लाल परीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी कामाची अपडेट समोर आली आहे.
खरेतर एसटीने अर्थातच लाल परीने प्रवास करणाऱ्या काही प्रवाशांना महाराष्ट्र राज्य शासनाच्या माध्यमातून तिकिटात सवलत उपलब्ध करून देण्यात आली आहे.
राज्यात लाल परीने प्रवास करणाऱ्या महिलांना तिकीट दरात 50 टक्क्यांची सूट दिली जात आहे. याशिवाय जेष्ठ नागरिकांना एसटी प्रवासात तब्बल 100% सूट आहे.
म्हणजे जेष्ठ नागरिकांना एसटीचा प्रवासासाठी एक रुपया देखील खर्च करावा लागत नाही. महाराष्ट्र राज्य शासनाच्या या निर्णयामुळे गेल्या काही महिन्यांमध्ये एसटी प्रवासी संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे.
यामुळे डबघाईला आलेले एसटी महामंडळ आता खऱ्या अर्थाने उभारी होऊ लागले आहे. अशातच आता एसटी महामंडळाने आणखी एक मोठा कौतुकास्पद निर्णय घेतला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार एसटी महामंडळाने आता सप्टेंबर ते फेब्रुवारी या ऑफ सीझनमध्ये काही लोकांना सलग सहा महिने मोफत प्रवासाची मुभा दिली आहे. ही सवलत मात्र काही विशिष्ट लोकांनाच लागू राहणार आहे.
अशा परिस्थितीत आज आपण सप्टेंबर ते फेब्रुवारी या सहा महिन्यांच्या काळात कोणत्या नागरिकांना मोफत एसटी प्रवास करता येणार याविषयी थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
हाती आलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातून सेवानिवृत्त झालेल्या, ऐच्छिक सेवानिवृत्ती घेतलेल्या तसेच वैद्यकीय कारणांमुळे अपात्र ठरलेल्या महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या वयाच्या 75 वर्षांपर्यंत सप्टेंबर ते फेब्रुवारी या सलग सहा महिन्यांच्या कालावधीत मोफत प्रवास करता येणार आहे. त्यासाठी या संबंधित पात्र व्यक्तींना स्पेशल पास दिला जाणार आहे.
तसेच एसटी महामंडळाच्या सेवेत असताना मृत्यू पावलेल्या, सेवानिवृत्तीनंतर मृत्यू झालेल्या, वैद्यकीयदृष्ट्या अपात्र ठरलेल्या, स्वेच्छानिवृत्ती घेतलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या विधवा, विधूर यांना वयाच्या ६५ वर्षापर्यंत सप्टेंबर ते फेब्रुवारी या सहा महिन्यांच्या ऑफ सीजन मध्ये सलग सहा महिन्यांसाठी मोफत एसटीचा प्रवास करता येणार आहे.
या पात्र लोकांना देखील याकरिता पास उपलब्ध करून दिला जाणार आहे. एसटी महामंडळाच्या या निर्णयामुळे या संबंधित पात्र लाभार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार अशी आशा व्यक्त होत आहे. दरम्यान या संबंधित पात्र लाभार्थ्यांच्या माध्यमातून महामंडळाच्या या निर्णयाचे स्वागत करण्यात आले आहे.