महाराष्ट्र राज्यातील ‘या’ 90 हजार सरकारी कर्मचाऱ्यांना लवकरच मिळणार आनंदाची बातमी! बोनस मिळावा म्हणून निवडणूक आयोगाला साकडे

गेल्या वर्षी अर्थातच 2023 च्या दिवाळीत देखील एसटी कर्मचाऱ्यांना बोनस देण्यात आला होता. एसटी कर्मचाऱ्यांना गेल्या वर्षी सरसकट सहा हजार रुपयांचा बोनस मिळाला आणि यामुळे त्यांची दिवाळी आनंदात साजरी झाली होती. यावर्षी मात्र एसटी कर्मचाऱ्यांना बोनस मिळाला नाही.

Published on -

Maharashtra ST Employee News : महाराष्ट्र राज्यातील जवळपास 90 हजार सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. ही बातमी एस टी महामंडळ अंतर्गत कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी खास ठरणार आहे. खरंतर एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांना दरवर्षी दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर बोनस दिला जात असतो.

गेल्या वर्षी अर्थातच 2023 च्या दिवाळीत देखील एसटी कर्मचाऱ्यांना बोनस देण्यात आला होता. एसटी कर्मचाऱ्यांना गेल्या वर्षी सरसकट सहा हजार रुपयांचा बोनस मिळाला आणि यामुळे त्यांची दिवाळी आनंदात साजरी झाली होती. यावर्षी मात्र एसटी कर्मचाऱ्यांना बोनस मिळाला नाही.

यामुळे एसटी महामंडळातील जवळपास 90 हजार कर्मचाऱ्यांना याचा मोठा फटका बसला आणि दिवाळीचा सण या कर्मचाऱ्यांना आर्थिक तंगीतच साजरा करावा लागला. दिवाळी बोनस मिळाला असता तर या हजारो कर्मचाऱ्यांची दिवाळी आनंदात साजरी झाली असती.

मात्र तसे काही झाले नाही. पण आता येत्या काही दिवसात एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांना बोनसची रक्कम मिळू शकते असे खात्रीलायक वृत्त हाती आले आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की 2024 च्या दिवाळीत एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांना बोनस मिळावा यासाठी विविध कर्मचारी संघटनांनी एसटी प्रशासन आणि शासनाला विनंती पत्र पाठविले होते.

मात्र, एसटी प्रशासनाच्या वित्त विभागाने वेळेत याबाबतचा प्रस्ताव शासनाकडे पाठवला नाही यामुळे शासनाकडून दिवाळी बोनसचा निधी एसटीला वितरित करणे शक्य झाले नाही. खरे तर एसटी महामंडळाप्रमाणेच बेस्टच्या कर्मचाऱ्यांना देखील दिवाळीच्या काळात बोनसची रक्कम मिळाली नव्हती.

दरम्यान बेस्टच्या या 30000 कर्मचाऱ्यांना मुंबई महापालिकेने 80 कोटी रुपये बेस्ट उपक्रमाला दिले आहेत. दरम्यान ही रक्कम संबंधित कर्मचाऱ्यांना मिळावी यासाठी सध्या आचारसंहिता सुरू असल्याने निवडणूक आयोगाकडून परवानगी मागितली होती.

दरम्यान निवडणूक आयोगाने दिलेल्या परवानगी नंतर आता या संबंधित बेस्टच्या हजारो कर्मचाऱ्यांना दिवाळीनंतर का होईना पण बोनसची रक्कम मिळू शकणार आहे.

दरम्यान आता बेस्ट कर्मचाऱ्यांच्या धरतीवरच एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना देखील दिवाळीनंतर का होईना बोनसची रक्कम मिळावी यासाठी पाठपुरावा सुरू झाला असून याच संदर्भात एसटी प्रशासनाने निवडणूक आयोगाला पत्र पाठवून बोनस वितरित करण्यासाठी परवानगी मागितली आहे. स्वतः एसटी महामंडळानेचं निवडणूक आयोगाकडे बोनस वितरित करण्यासाठी परवानगी मागितली असल्याचे सांगितले आहे.

यामुळे आता निवडणूक आयोग एसटी महामंडळाच्या या मागणीवर काय निर्णय घेते बोनसची रक्कम वितरित करण्यास परवानगी देते का हे पाहण्यासारखे ठरणार आहे. पण जर निवडणूक आयोगाने ही परवानगी दिली तर एस टी महामंडळाच्या 90 हजार कर्मचाऱ्यांना बोनस मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News