Maharashtra ST Location : महाराष्ट्रातील एसटी प्रवाशांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे. आता एसटी महामंडळाच्या बसचे लाईव्ह लोकेशन सुद्धा समजणार आहे. सध्या राज्यात एका शहरातून दुसऱ्या शहरात प्रवास करण्यासाठी तसेच एका गावातून दुसऱ्या गावात जाण्यासाठी आजही लाल परीचा पर्याय सर्वात बेस्ट पर्याय ठरतो. राज्यात रेल्वे प्रमाणेच बसने प्रवास करणाऱ्यांची संख्या फारच उल्लेखनीय आहे.
मात्र लाल परीचा प्रवास हा जेवढा मनोरंजक, सोयीचा आणि खिशाला परवडणारा आहे तेवढाच हा प्रवास प्रवाशांसाठी तापदायक देखील ठरतो. बसने जायचे म्हटले तर बस एसटी स्टँडवर कधी पोहोचणार ? आपल्या गावात लाल परीचे आगमन नेमके कधी होणार? याची योग्य माहिती प्रवाशांना मिळत नाही.

एसटी नेमकी कधी येणार? याची योग्य वेळ प्रवाशांना माहीत नसते आणि यामुळे अनेकदा बस स्टैंड वरच प्रवाशांना तासनतास ताटकळत उभे राहावे लागते. जर तुम्हीही कधी एसटीने गेला असाल तर तुम्हाला सुद्धा अशा अडचणी फेस कराव्या लागल्या असतील. यामुळे एसटीचा प्रवास हा प्रवाशांसाठी जेवढा सोयीचा ठरतो तेवढाच हा प्रवास तापदायक सुद्धा ठरतो.
पण आता प्रवाशांची ही अडचण दूर होणार आहे. कारण एसटी महामंडळाची बस केव्हा स्टॅन्ड वर येणार, सध्या बस कुठे आहे? अशी सर्व महत्त्वाची माहिती आता प्रवाशांना आपल्या मोबाईलवरच मिळू शकणार आहे. म्हणजेच एसटीचा प्रवास सुद्धा आता हायटेक होणार आहे. प्रवाशांना आता लाल परीचे लाईव्ह लोकेशन समजणार आहे आणि यामुळे एसटीचा प्रवास फारच आरामदायी होईल अशी आशा व्यक्त होत आहे.
राज्य मार्ग परिवहन महामंडळाने अर्थातच एसटी महामंडळाने विकसित केलेल्या एप्लीकेशनवर प्रवाशांना या सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. ॲप्लिकेशनच्या माध्यमातून प्रवाशांकडे असलेल्या तिकिटावरील क्रमांकावरून एसटीचे लाईव्ह लोकेशन प्रवाशांना समजणार असल्याची माहिती महामंडळाकडून देण्यात आली आहे.
लालपरी बनणार हायटेक
प्रवाशांना लाईव्ह लोकेशन समजावे यासाठी एसटी महामंडळाच्या ताफ्यात असणाऱ्या बस गाड्यांना व्हेईकल ट्रॅकिंग सिस्टम बसवले जाणार आहे. दरम्यान ही सर्व प्रक्रिया येत्या काही दिवसात पूर्ण होईल आणि त्यानंतर ही सुविधा प्रवाशांसाठी उपलब्ध करून दिली जाणार आहे.
तांत्रिक बाबी पूर्ण झाल्यावर येत्या काही आठवड्यात प्रवाशांसाठी ही सुविधा उपलब्ध होणार असल्याची माहिती हाती येत आहे. खरे तर, आगाऊ तिकीट काढूनही अनेकदा बस स्थानकात कधी येणार याची माहिती प्रवाशांना मिळत नाही. यामुळे प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो.
दरम्यान प्रवाशांची हेच अडचण लक्षात घेऊन आता एसटी महामंडळाकडून आपल्या वाहनांवर व्हेईकल ट्रॅकिंग सिस्टम बसवले जाणार आहे आणि यामुळे एसटीचे लाईव्ह लोकेशन प्रवाशांना मिळणार आहे. एसटी महामंडळाच्या एप्लीकेशन वर हे लाईव्ह लोकेशन प्रवाशांना उपलब्ध करून दिले जाणार असून हे ॲप्लिकेशन प्रवाशांच्या सोयीसाठी मराठी आणि इंग्रजी या दोन भाषांमध्ये उपलब्ध करून दिले जाईल.
लालपरीच लाईव्ह लोकेशन कसे चेक करणार?
जाणकार लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, एसटी महामंडळाच्या ॲपमधील ट्रॅक बस या सेक्शनमध्ये गेल्यानंतर तिकिटावरील ट्रिप कोड टाकायचा आहे आणि त्यानंतर मग एसटीचे लाईव्ह लोकेशन प्रवाशांना समजणार आहे. या एप्लीकेशन मध्ये इतर मार्गांवरील बस गाड्यांचे थांबे देखील समजणार आहेत.
एसटी महामंडळाच्या मुंबई सेंट्रल मध्यवर्ती कार्यालयात यासाठी नियंत्रण कक्ष स्थापित करण्यात आले असून याच्या माध्यमातून राज्यभरातील एसटीवर नियंत्रण ठेवता येणे शक्य होणार आहे. एसटी बिघडली किंवा अपघात झाली तर अशा इमर्जन्सी मध्ये या ॲप मधून संबंधित यंत्रणांना फोन करण्याची सुविधा देखील उपलब्ध करून दिली जाणार आहे. एसटी महामंडळाच्या बस चालकाची आणि वाहकाची माहिती सुद्धा यामध्ये राहणार आहे.
एखाद्या मार्गावर किती बस आहेत, बस सध्या कुठे आहे आणि ती स्थानकात येण्यास किती वेळ लागू शकतो? यासारखी महत्त्वाची माहिती सुद्धा यामधून प्रवाशांना मिळणार आहे. नक्कीच यामुळे लाल परीचा प्रवास हा आणखी रंजक होणार आहे यात शंकाच नाही. प्रवाशांच्या सोयीसाठी एसटी महामंडळाने घेतलेला हा निर्णय नक्कीच कौतुकास्पद असून या निर्णयाचा राज्यातील लाखो लोकांना फायदा होणार आहे. यामुळे एसटीने प्रवास करणाऱ्यांची संख्या आणखी वाढणार आहे. यामुळे एसटीचा प्रवास हा सुद्धा आरामदायी होऊ शकतो.