दिवाळीपूर्वी एसटी महामंडळाची प्रवाशांना मोठी भेट !  आता फक्त 1364 रुपयांमध्ये संपूर्ण महाराष्ट्रभर प्रवास करता येणार

Maharashtra ST News : लालपरीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. दिवाळीच्या आधीच एसटीच्या प्रवाशांसाठी महामंडळाकडून एक मोठी गुड न्यूज समोर आली आहे.

खरंतर येत्या काही दिवसांनी दिवाळीचा मोठा सण साजरा केला जाईल. दिवाळीच्या अनुषंगाने सगळीकडेच आनंदाचे वातावरण आहे.

दिवाळीमधील सुट्ट्यांचा हंगाम जवळ आल्याने आता महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने प्रवाशांना एक सुखद धक्का दिला आहे.

खरंतर एसटी महामंडळाकडून प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळ्या योजना सुरू करण्यात आल्या आहेत. एस टी महामंडळ काही सवलतीच्या सुद्धा योजना राबवते ज्या की शासनाकडून फंडेड असतात.

तसेच अशा एका योजना आहेत ज्या की महामंडळ स्वतः राबवते. दरम्यान महामंडळाकडून आवडेल तिथे प्रवास अशी एक योजना सुरू करण्यात आली आहे. ही योजना पर्यटकांसाठी डोळ्यासमोर ठेवून डिझाईन करण्यात आली आहे.

या योजनेमुळे पर्यटनाला नक्कीच मोठी चालना मिळाली आहे. दरम्यान आता आवडेल तिथे प्रवासी या योजनेत मोठा बदल करण्यात आला आहे.

दिवाळीच्या आधीच एसटी प्रवाशांसाठी आवडेल तेथे प्रवास या योजनेच्या भाड्यात मोठ्या प्रमाणात कपात केली आहे. प्रवाशांसाठी महामंडळाने या योजनेच्या भाड्यात 225 रुपयांपासून 1254 रुपयांपर्यंत कपात करण्यात आली आहे. वास्तविक, राज्य परिवहन प्राधिकरणाने अलीकडेच महामंडळाला भाडेवाढीची मूभा दिली होती.

प्राधिकरणाने तब्बल 30 टक्क्यांपर्यंत भाडेवाढ करण्याची मुभा महामंडळाला दिली होती आणि यामुळे साहजिकच प्रवाशांना सणासुदीच्या दिवसांमध्ये भुर्दंड बसणार अशा चर्चा सुरू होत्या.

पण झालं या उलट, आवडेल तिथे प्रवास या योजनेतील भाडे कमी करण्यात आले आहे. खरेतर, जानेवारीमध्ये महामंडळाने 15% भाडेवाढ लागू केली होती. विशेष म्हणजे दिवाळीच्या पार्श्वभूमीवर हंगामी भाडेवाढ म्हणून दहा टक्के वाढ करण्याचा प्रस्ताव सुद्धा विचाराधीन असल्याचे समोर आले होते.

पण, राज्यातील पूरस्थिती पाहता हा प्रस्ताव प्रत्यक्षात अमलात काही आणला नाही. त्यामुळे नक्कीच प्रवाशांना दिलासा मिळालाय. आता आवडेल तेथे प्रवास योजनेअंतर्गत प्रवाशांना प्रवासासाठी पास उपलब्ध करून दिला जातो.

हा पास साधी, जलद, रात्रसेवा, शिवशाही, ई-शिवाई, शिवनेरी तसेच आंतरराज्य बसगाड्यांमध्ये प्रवासासाठी लागू आहे. या पासवर प्रवाशांना अमर्यादित प्रवासाची मुभा मिळते. ही योजना नवीन नाही, जुनीच आहे पण आता याचे भाडे कमी झाले आहे. दरम्यान आता आपण या योजनेअंतर्गत भाडे किती कमी झाले आहेत याची माहिती पाहूयात.

नवीन रेट कसे आहेत?

साधी, जलद, रात्रसेवा, शिवशाही व आंतरराज्य बस सेवा

प्रौढांचा चार दिवसांचा पास – 1364

प्रौढांचा सात दिवसांचा पास  – 2382

मुलांचा चार दिवसांचा पास – 685

मुलांचा सात दिवसांचा पास – 1194

शिवशाही आसनी बस सेवा (आंतरराज्यसह)

प्रौढांचा चार दिवसांचा पास – 1818

प्रौढांचा सात दिवसांचा पास  – 3175

मुलांचा चार दिवसांचा पास – 911

मुलांचा सात दिवसांचा पास – 1590