महाराष्ट्र राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! ‘या’ कर्मचाऱ्यांना मिळणार 30 हजाराचा अतिरिक्त भत्ता

सध्या केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांना 53% दराने महागाई भत्ता दिला जात असून यामध्ये आणखी दोन ते तीन टक्क्यांची वाढ होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे महाराष्ट्र राज्यातील काही सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आणखी एक भत्ता लागू करण्यात आला आहे.

Updated on -

Maharashtra State Employee News : सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्याबाबत वेगवेगळ्या चर्चा सुरू आहेत. दरवर्षी होळीच्या आधी केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढवला जात असतो. यावर्षी मात्र होळीचा सण झाल्यानंतरही सरकारी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता वाढीची भेट मिळालेली नाही.

सध्या केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांना 53% दराने महागाई भत्ता दिला जात असून यामध्ये आणखी दोन ते तीन टक्क्यांची वाढ होण्याची शक्यता आहे. याचा निर्णय पुढील आठवड्यात होईल आणि ही वाढ जानेवारी 2025 पासून लागू राहणार आहे.

दुसरीकडे महाराष्ट्र राज्यातील काही सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आणखी एक भत्ता लागू करण्यात आला आहे. 21 मार्च 2025 रोजी वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभागाकडून एक महत्त्वाचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे.

या शासन निर्णयानुसार महाराष्ट्र होमिओपॅथी परिषद या कार्यालयाीतील अधिकारी / कर्मचाऱ्यांना सेवेत असताना वैद्यकीय उपाचारावर होणारा खर्च भागविण्यासाठी प्रतिवर्षी वैद्यकीय भत्ता मंजूर करण्यात आला आहे.

या संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना आता 30,000 रुपये इतका वैद्यकीय भत्ता मंजूर करण्यात आला आहे. सन 2024-25 या आर्थिक वर्षापासुन अटी व शर्तींच्या अधीन राहून या संबंधित कर्मचाऱ्यांना दरवर्षी 30 हजार रुपये इतका वैद्यकीय भत्ता दिला जाणार आहे.

दरम्यान हा वैद्यकीय भत्ता अदा करण्यास काल जारी झालेल्या शासन निर्णयाच्या माध्यमातून शासन मंजूरी देण्यात आली आहे.

या शासन निर्णयात देण्यात आलेल्या अटी / शर्तीमध्ये असे नमुद करण्यात आले आहेत कि, वैद्यकीय भत्त्यापोटी अदा करावयाची रक्कम परिषदेने आपल्या स्वनिधीतून भागविण्याचे व सद्य: स्थितीत तसेच भविष्यात वैद्यकीय भत्त्यासाठी शासनाकडून परिषदेस कोणत्याही स्वरुपाचे अर्थसहाय्य करण्यात येणार नाही असे नमुद करण्यात आले आहे.

नक्कीच या शासन निर्णयामुळे संबंधित राज्य कर्मचाऱ्यांना आणि अधिकाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असून वैद्यकीय खर्चासाठी त्यांच्याकडे आता अतिरिक्त पैसा उपलब्ध होणार आहे. यामुळे शासनाच्या या संबंधित निर्णयाचे कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून स्वागत केले जात आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe