महाराष्ट्रातील या कर्मचाऱ्यांना मिळणार वेतन आयोगाचा थकीत हफ्ता, बोनसही झाला मंजूर 

Published on -

Maharashtra State Employee : राज्यातील कर्मचाऱ्यांसाठी एक महत्वाची बातमी समोर आली आहे. ही बातमी पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) कर्मचाऱ्यांसाठी अधिक खास ठरणार आहे. पुणे महानगरपालिकेच्या स्थायी समितीने पीएमपीच्या कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट दिली आहे.

या कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाच्या फरकाच्या रकमेचा दुसरा हप्ता दिला जाणार आहे. यासाठी तब्बल 84.15 कोटी रुपयांच्या निधीस मान्यता देण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. ऐन दिवाळीत हा निर्णय झाला असल्याने कर्मचारी समाधानी आहेत.

महापालिका कर्मचारी, शालेय विद्यार्थी तसेच सवलतीच्या पाससाठी अतिरिक्त 20 कोटी रुपयांचा निधी देण्याच्या प्रस्तावाला पण मंजुरी देण्यात आली आहे. यामुळे कर्मचाऱ्यांना बोनसचे पण वाटप केले जाणार आहे. गुरुवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत हा प्रस्ताव मंजूर करण्याचा निर्णय झालाय.

महत्वाची बाब म्हणजे शुक्रवारी हा निधी त्वरित पीएमपीएमएलकडे जमा झाला आहे. ऐन दिवाळीत पीएमपी कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाच्या फरकासह बोनस देण्याचा मार्ग यामुळे मोकळा झालाय. यामुळे कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड होणार आहे.

खरेतर, ऑगस्ट 2024 मध्ये पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत एक महत्वपूर्ण बैठक संपन्न झाली होती. या बैठकीत सातव्या वेतन आयोगाचा फरक चार हप्त्यांमध्ये देण्याचा निर्णय झाला. त्यानुसार अंदाजपत्रकात संबंधित तरतूद सुचवण्यात आली होती.

या पार्श्वभूमीवर महापालिकेचा 60 टक्के हिस्सा म्हणून 84.15 कोटी रुपये देण्याचा प्रस्ताव प्रशासनाने स्थायी समितीसमोर मांडला होता. आता याच प्रस्तावाला समितीची मंजुरी मिळाली आहे.

या महत्त्वपूर्ण प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यानंतर आता पीएमपी कर्मचाऱ्यांना दुसरा हप्ता अदा करण्याची प्रक्रिया सुद्धा सुरू करण्यात आली आहे. पीएमपी कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाचा दुसरा थकीत हप्ता मिळणार असल्याने कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळेल.

सोबतच सवलतीच्या पाससाठी मंजूर झालेल्या 20 कोटी रुपयांमुळे विद्यार्थी व इतर प्रवाशांनाही दिवाळीच्या काळात दिलासा मिळणार आहे. दरम्यान प्रशासनाकडून घेण्यात आलेल्या या निर्णयाचे संबंधितांच्या माध्यमातून स्वागत करण्यात आले आहे. 

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News