विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी ! शैक्षणिक वर्ष 2024 – 25 च्या उन्हाळी सुट्ट्या ‘या’ तारखेपासून सुरु ; नवीन वर्षात शाळा कधी भरणार ? पहा वेळापत्रक

पुढील शैक्षणिक वर्षाचे वेळापत्रक कसे राहणार? या शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांना सुट्ट्या कधी लागणार? असे अनेक प्रश्न तुमच्याही मनात असतील. दरम्यान आता याच सर्व प्रश्नांची उत्तरे समोर आली आहेत.

Published on -

Maharashtra Student Summer Vacation : महाराष्ट्रातील हजारो, लाखो शालेय विद्यार्थ्यांसाठी आणि शिक्षकांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. खरे तर गेल्या अनेक दिवसांपासून राज्यातील शालेय विद्यार्थ्यांना उन्हाळी सुट्ट्या कधी लागणार हा सवाल उपस्थित केला जात होता.

दरम्यान आता याच बाबत एक नवीन माहिती समोर आली असून नवीन शैक्षणिक वर्ष कधी सुरू होणार याचे सुद्धा वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शैक्षणिक वर्ष 2024-25 साठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेमार्फत सुधारित वेळापत्रक नुकतेच जाहीर करण्यात आले आहे.

या वेळापत्रकानुसार, विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना लवकरच उन्हाळी सुट्ट्यांची भेट मिळणार आहे. यावर्षी शाळांना उन्हाळी सुट्ट्या उशिराने लागत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार यावर्षी विद्यार्थ्यांना 26 एप्रिल पासून सुट्ट्या लागणार आहेत.

25 एप्रिल 2025 रोजी विद्यार्थ्यांचा शेवटचा पेपर आहे आणि यानंतर मग विद्यार्थ्यांना उन्हाळी सुट्ट्या लागणार आहेत. पण शिक्षकांना मात्र 3 मे 2025 पासून उन्हाळी सुट्टीचा लाभ मिळणार आहे.

विद्यार्थ्यांचा निकाल कधी लागणार?

विद्यार्थ्यांच्या अंतिम सत्र परीक्षा 25 एप्रिलपर्यंत चालणार आहे. यामुळे यावर्षी निकाल एक मे ला लागणार नाही का असा प्रश्न उपस्थित होतोय. तर आम्ही आपणास सांगू इच्छितो की शिक्षण विभागाशी संबंधित लोकांनी दिलेल्या माहितीनुसार यंदाही विद्यार्थ्यांच्या अंतिम सत्र परीक्षेचा निकाल 1 मे 2025 रोजी जाहीर केला जाणार आहे.

म्हणजे अंतिम सत्र परीक्षा झाल्यानंतर पेपर तपासणीसाठी शिक्षकांना केवळ 5 दिवस मिळतील. या काळात शिक्षकांना निकाल प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे. यासोबतच नवीन शैक्षणिक वर्षाचे संभाव्य वेळापत्रक देखील हाती आले आहे. आता आपण ह्याच नवीन वर्षाच्या संभाव्य वेळापत्रकाची थोडक्यात माहिती पाहणार आहोत.

कस आहे नवीन शैक्षणिक वर्षाचे वेळापत्रक?

मीडिया रिपोर्टवर जर विश्वास ठेवायचा झाला तर पुढील शैक्षणिक वर्ष म्हणजे शैक्षणिक वर्ष 2025-26 हे 15 जून 2025 पासून सुरु होणार आहे. यामुळे या नव्या शैक्षणिक वर्षासाठी सर्व शाळांना नव्या वेळापत्रकानुसार तयारी करावी लागणार आहे. तसेच पुढील शैक्षणिक वर्षात दिवाळी सुट्टी 17 ते 30 ऑक्टोबरदरम्यान राहणार आहे.

दिवाळी काळात विद्यार्थ्यांना एकूण 14 दिवसांची म्हणजे जवळपास अर्धा महिन्याची सुट्टी मिळणार आहे. तसेच, संपूर्ण शैक्षणिक वर्षात शाळांना एकूण 54 दिवस सार्वजनिक सुट्ट्या असणार अशी सुद्धा माहिती यावेळी संभाव्य वेळापत्रक मधून समोर आली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News