Maharashtra Teacher : महाराष्ट्रातील शिक्षकांसाठी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. जसं की आपणास ठाऊकच आहे ते सध्या राज्यातील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून शासनाच्या काही धोरणांचा विरोध केला जातोय.
तसेच सर्वोच्च न्यायालयात च्या टीईटी सक्तीच्या विरोधातही शिक्षक संघटनायकवले आहेत. टीचर्स एलिजिबिलिटी टेस्ट आधीच सेवेत असणाऱ्या शिक्षकांसाठी सुद्धा अनिवार्य करण्यात आली असल्याने शिक्षकांच्या माध्यमातून या निर्णयाचा जोरदार विरोध होतोय.

दरम्यान सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयाविरोधात राज्य शासनाने फेरविचार याचिका दाखल करावी अशी सुद्धा शिक्षकांची मागणी आहे आणि याच मागणीच्या पार्श्वभूमीवर शिक्षकांनी अलीकडेच राज्यव्यापी आंदोलन सुद्धा पुकारले होते.
या आंदोलनात राज्यातील हजारो शिक्षकांनी सहभाग घेतला. 5 डिसेंबर 2025 रोजी राज्यातील विविध शिक्षक संघटनांनी राज्यव्यापी शाळा बंद आंदोलन कारले होते आणि या आंदोलनात जवळपास राज्यातील 97 हजार शिक्षकांनी सक्रिय सहभाग नोंदवला होता.
दरम्यान या शाळा बंद आंदोलनात जे शिक्षक सहभागी झाले होते त्याच शिक्षकांच्या विरोधात आता शासनाकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे.
खरे तर आंदोलनाच्या आधीच शिक्षण संचालनालयाकडून आंदोलनात सहभागी होणाऱ्या शिक्षकांवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येणार असा इशारा देण्यात आला होता.
यानुसार आता शाळा बंद आंदोलनात सक्रिय सहभाग नोंदवणाऱ्या शिक्षकांवर शिस्तभंगाची कारवाई होणार आहे. शाळा बंद आंदोलनासाठी राज्यातील बहुतांशी शाळा बंद होत्या.
आता याच शाळा बंद आंदोलनात सक्रिय सहभागी झालेल्या शिक्षकांचे वेतन कापले जाणार आहे. आंदोलनात सक्रिय सहभाग घेतलेल्या शिक्षकांच एका दिवसांच वेतन कापले जाणार आहे.
राज्य सरकारच्या काम बंद वेतन बंद या धोरणांनुसार ही कारवाई करण्यात येणार आहे. या कारवाईचा राज्यातील 96,800 शिक्षकांना फटका बसणार आहे. 05 डिसेंबर रोजी एका दिवसाचे शाळा बंद आंदोलन झाले अन यात सहभागी असणाऱ्या शिक्षकांचे एक दिवसाचे वेतन कपात केले जाणार आहे.
याकरीता शिक्षण विभाग मार्फत कारवाई करण्याचे आदेश शासनाकडून जारी झाले आहेत. शाळा बंद आंदोलनात राज्यातील 24000 शाळांमध्ये कार्यरत शिक्षकांनी सक्रिय सहभाग घेतला. आता या आंदोलनामुळे संबंधित शिक्षकांवर मोठी कारवाई करण्यात येणार आहे.













