Maharashtra Vande Bharat Railway : वंदे भारतने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी समोर येत आहे. ही बातमी नागपूर – इंदौर वंदे भारत एक्स्प्रेसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी खास राहणार आहे. खरेतर या गाडीला जबरदस्त प्रतिसाद मिळतोय.
दरम्यान या गाडीच्या वाढत्या प्रतिसादामुळे भारतीय रेल्वेने या गाडीबाबत मोठा निर्णय घेतला आहे. सोमवार, 24 नोव्हेंबर 2025 पासून (गाडी क्रमांक 20911/20912) ही ट्रेन विद्यमान 8 कोचेसऐवजी दुप्पट म्हणजे 16 कोचेससह धावणार आहे.

या बदलामुळे या मार्गावरील प्रवाशांची आसनक्षमता तब्बल 530 वरून 1128 एवढी होणार असून दररोज अतिरिक्त 600 प्रवाशांना आरामात प्रवास करता येणार आहे.
काय असेल नवीन बदल?
रेल्वेने जाहीर केलेल्या माहितीनुसार, नव्या 16 कोच रेकमध्ये 2 एक्झिक्युटिव्ह एसी कोचेस, 14 चेयर कार एसी कोचेस असे एकूण 16 डबे असतील. या सुविधेमुळे नागपूर–इंदौर मार्गावरील गर्दी मोठ्या प्रमाणात कमी होईल तसेच सणासुदीच्या काळात प्रवाशांना मोठा दिलासा मिळेल.
उच्च वेग, आधुनिक सुविधा, उत्तम सुरक्षा यंत्रणा आणि आरामदायी प्रवासामुळे वंदे भारत एक्स्प्रेसला सतत सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे अनेक प्रवाशांची प्रतीक्षा यादी वाढत होती. आता कोच संख्या वाढल्याने ही समस्या मोठ्या प्रमाणात सुटणार आहे.
इंदौर ते नागपूर वेळापत्रक
इंदौर प्रस्थान – 06:10 सकाळी
उज्जैन – 06:50
भोपाळ – 09:10
नर्मदापुरम – 10:22
इटारसी – 10:45
बैतूल – 11:58
नागपूर आगमन – 14:35
नागपूर ते इंदौर वेळापत्रक
नागपूर प्रस्थान – 15:20 दुपारी
बैतूल – 05:23
इटारसी – 07:00
नर्मदापुरम – 07:22
भोपाळ – 08:38
उज्जैन – 10:40
इंदौर आगमन – 11:50
प्रवाशांना काय फायदे मिळणार ?
यामुळे आसनक्षमतेत मोठी वाढ होणार आहे. परिणामी प्रतीक्षा यादीत घट होईल. सर्वात मोठा फायदा म्हणजे गर्दीच्या काळातही आरामदायी प्रवास करता येणार आहे. यामुळे अधिक प्रवाशांना वंदे भारतचा लाभ घेता येणार आहे.
दरम्यान, रेल्वेच्या या निर्णयामुळे मध्य प्रदेश आणि विदर्भातील प्रवाशांसाठी हा मार्ग अधिक सुलभ व सोयीस्कर होणार आहे. वंदे भारत एक्स्प्रेस आता अधिक क्षमतेसह आणि आधुनिक सुविधांसह दररोजच्या प्रवासाला एक नवीन गती देणार आहे.













