ब्रेकिंग : महाराष्ट्रातील पहिल्या वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनला ‘या’ Railway Station वर मिळाला अतिरिक्त थांबा, वाचा सविस्तर

देशातील तिसऱ्या आणि महाराष्ट्रातील पहिल्या वंदे भारत ट्रेन बाबत अर्थातच मुंबई सेंट्रल ते गांधीनगर या ट्रेन बाबत एक महत्त्वाचे अपडेट हाती आले आहे. या गाडीला आणखी एक अतिरिक्त थांबा मंजूर करण्यात आला आहे.

Published on -

Maharashtra Vande Bharat Railway : वंदे भारत एक्सप्रेस ही देशातील संपूर्ण स्वदेशी बनावटीची पहिली हाय स्पीड ट्रेन असून सध्या स्थितीला ही गाडी 60 हून अधिक मार्गांवर सुरू आहे. महाराष्ट्र बाबत बोलायचं झालं तर राज्याला आत्तापर्यंत अकरा वंदे भारत ट्रेन मिळालेल्या आहेत.

राज्यातील सीएसएमटी ते सोलापूर, सीएसएमटी ते शिर्डी, सीएसएमटी ते मडगाव, सीएसएमटी ते जालना, मुंबई सेंट्रल ते गांधीनगर, मुंबई सेंट्रल ते अहमदाबाद, पुणे ते कोल्हापूर, पुणे ते हुबळी, नागपूर ते सिकंदराबाद, नागपूर ते इंदोर आणि नागपूर ते बिलासपुर या मार्गांवर ही गाडी सुरू आहे.

अशातच राज्यातील एका महत्त्वाच्या वंदे भारत एक्सप्रेस संदर्भात एक मोठी अपडेट हाती आली आहे. महाराष्ट्रातील पहिली वंदे भारत ट्रेन म्हणजेच मुंबई सेंट्रल ते गांधीनगर या गाडीला एक अतिरिक्त थांबा मंजूर करण्यात आला आहे.

प्रायोगिक तत्त्वावर ही गाडी गुजरात राज्यातील आनंद रेल्वे स्थानकावर थांबा घेत असून याबाबत रेल्वे बोर्डाकडून एक अधिसूचना देखील प्रसिद्ध करण्यात आली आहे.

देशातील तिसऱ्या क्रमांकाची आणि महाराष्ट्रातील पहिली वंदे भारत ट्रेन तसेच पश्चिम रेल्वेवरील पहिली वंदे भारत एक्स्प्रेस ट्रेन म्हणून ओळखली जाणारी मुंबई सेंट्रल – गांधीनगर वंदे भारत ट्रेन कमी काळात प्रवाशांमध्ये लोकप्रिय ठरली.

अत्यंत कमी काळात या वंदे भारत एक्स्प्रेसला प्रवाशांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. ही गाडी आधी मुंबई सेंट्रल, बोरिवली, वापी, सुरत, वडोदरा, अहमदाबाद, गांधीनगर याच रेल्वे स्थानकावर थांबा घेत होती.

पण प्रवाशांकडून मिळणारा प्रतिसाद पाहता आता या वंदे भारतला पश्चिम रेल्वेवरील गुजरातमधील आनंद स्थानकावर प्रायोगिक तत्वावर थांबा मंजूर करण्यात आला आहे. यामुळे या गाडीच्या वेळापत्रकात सुद्धा बदल करण्यात आला आहे, आता आपण या गाडीचे नवीन वेळापत्रक जाणून घेऊयात.

कसं असेल नवीन वेळापत्रक?

पश्चिम रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, गाडी क्रमांक 20901 मुंबई सेंट्रल – गांधीनगर वंदे भारत एक्स्प्रेस आणि गाडी क्रमांक 20902 गांधीनगर – मुंबई सेंट्रल वंदे भारत एक्स्प्रेसला 23 मार्च 2025 पासून प्रायोगिक तत्वावर आनंद स्थानकावर अतिरिक्त थांबा देण्यात आला आहे.

आता गाडी क्रमांक 20901 मुंबई सेंट्रल – गांधीनगर वंदे भारत एक्स्प्रेस सकाळी 10.38 वाजता आनंद स्थानकात पोहचते. त्यानंतर सकाळी 10.40 वाजता निघते. मात्र इतर स्थानकाच्या वेळेत कोणताही बदल करण्यात आलेला नाही.

गाडी क्रमांक 20902 गांधीनगर – मुंबई सेंट्रल वंदे भारत एक्स्प्रेस आनंद स्थानकावर दुपारी साडे तीन वाजता पोहोचते आणि दुपारी 3 वाजून 32 मिनिटांनी निघते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe