Maharashtra Vande Bharat Railway : राज्यातील रेल्वे प्रवाशांसाठी ऑक्टोबर महिना विशेष खास ठरणार आहे. या महिन्यात राज्याला 16 कोच वाली वंदे भारत एक्सप्रेसची भेट मिळणार असल्याची बातमी समोर आली आहे. सध्या देशात आठ कोच, 16 कोच आणि 20 कोचच्या वंदे भारत एक्सप्रेस सुरू आहेत.
सुरुवातीच्या टप्प्यात सरकारकडून सर्वच मार्गांवर 16 कोच वाली वंदे भारत चालवली जात होती. पण नंतर काही मार्गांवर प्रवाशांची संख्या कमी झाली आणि यामुळे कोच देखील घटविण्यात आले.

नंतर मग रेल्वे कडून आठ कोच असणारी वंदे भारत सुरू झाली. आता रेल्वे बोर्ड गरजेनुसार आठ कोच किंवा 16 कोच असणारी वंदे भारत एक्सप्रेस चालवत आहे.
ज्या मार्गांवर आठ कोचवाल्या गाड्या सुरू आहेत आणि तिथे जर प्रवाशांची संख्या वाढली तर त्या ठिकाणी 16 कोच असणारी वंदे भारत चालवली जाते.
इंदोर – नागपूर मार्गांवर चालवल्या जाणाऱ्या वंदे भारत ट्रेन संदर्भात एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. या ट्रेनची प्रवासी संख्या सतत वाढत आहे. यामुळे रेल्वे बोर्डाने याच्या डब्यांची संख्या वाढवली जाणार असल्याचे जाहीर करण्यात आले.
अर्थात आता ही वंदे भारत 16 डब्यांसह धावणार आहे. यासाठी मुंबईच्या वाडी बंदर डेपोमधून सात – आठ दिवसांपूर्वी 16 रॅक इंदूरमध्ये आले आहेत. या नव्या रॅकच्या देखभालीचे काम इंदूर रेल्वे डेपोमध्ये सुरू आहे.
ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापासून इंदूर-नागपूर वंदे भारत ट्रेन 16 डब्यांसह धावणार असा अंदाज आहे. प्रवाशांची वाढती संख्या, जागांची प्रचंड मागणी लक्षात घेता ट्रेनमध्ये अतिरिक्त डबे जोडण्याचा निर्णय घेतलाय.
अलिकडेच रेल्वे बोर्ड समितीने वंदे भारत ट्रेनची व्याप्ती आणि प्रवाशांच्या मागणीबाबत सर्व झोन आणि विभागांकडून अहवाल मागवला होता. यानंतर देशभर धावणाऱ्या सात वंदे भारत ट्रेनमध्ये डब्यांची संख्या वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला.