महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारची मोठी घोषणा ! नरेंद्र मोदी ‘या’ तारखेला शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करणार 2 हजार

मोदी सरकार पीएम किसान योजनेचा पुढील हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करणार आहे. केंद्रातील सरकारने दिलेल्या माहितीनुसार, या योजनेचा पुढील हप्ता म्हणजेच 18 वा हप्ता हा पाच ऑक्टोबर 2024 ला पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला जाणार आहे. या अंतर्गत साडेनऊ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत.

Tejas B Shelar
Published:
Maharashtra Vidhansabha Nivdnuk

Maharashtra Vidhansabha Nivdnuk : लोकसभा निवडणुकीनंतर आता महाराष्ट्राच्या जनतेचे लक्ष लागले आहे ते आगामी विधानसभा निवडणुकांकडे. आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील महायुती आणि महाविकास आघाडीकडून जोरदार तयारी सुरू झाली आहे. दरम्यान, केंद्रातील मोदी सरकारने विधानसभा निवडणुकांच्या आधीच शेतकऱ्यांना एक मोठी भेट देण्याचा निर्णय घेतलेला आहे.

मोदी सरकार पीएम किसान योजनेचा पुढील हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करणार आहे. केंद्रातील सरकारने दिलेल्या माहितीनुसार, या योजनेचा पुढील हप्ता म्हणजेच 18 वा हप्ता हा पाच ऑक्टोबर 2024 ला पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला जाणार आहे.

या अंतर्गत साडेनऊ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत. नक्कीच यामुळे सणासुदीच्या काळात शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.

नवरात्र उत्सवाच्या काळात पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या पात्र लाभार्थ्यांना या योजनेचा पैसा मिळणार असल्याने सर्वसामान्य गरीब शेतकऱ्यांचा नवरात्र उत्सव आणि विजयादशमीचा सण मोठ्या आनंदात पार पडणार आहे. त्यामुळे पीएम किसानच्या पात्र लाभार्थ्यांनी सरकारच्या या निर्णयाचे स्वागत केले असून आनंद व्यक्त केला आहे.

कशी आहे पीएम किसान योजना ?

पीएम किसान सन्मान निधी योजना ही एक केंद्र पुरस्कृत योजना आहे. या योजनेची सुरुवात 2019 मध्ये झाली. या अंतर्गत वार्षिक सहा हजार रुपये दिले जातात.

परंतु हे पैसे एकाच वेळी मिळत नाहीत. दोन हजाराचा एक हप्ता याप्रमाणे या पैशांचे वितरण होते. यानुसार आत्तापर्यंत या योजनेच्या पात्र लाभार्थ्यांना एकूण 17 हप्ते मिळालेले आहेत.

मागील सतरावा हप्ता हा 18 जून 2024 ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वाराणसी येथे आयोजित एका कार्यक्रमातून पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आला. यामुळे आता या योजनेच्या पात्र शेतकऱ्यांना याचा पुढील हप्ता कधी मिळणार याची प्रतीक्षा आहे.

दरम्यान, पीएम किसान योजनेच्या पुढील हफ्त्याची तारीख शासनाने जाहीर केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या योजनेचा पुढील हप्ता विधानसभा निवडणुकांच्या अनुषंगाने महाराष्ट्रातील वाशिम येथून पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे.

5 ऑक्टोबरला वाशिम येथे आयोजित एका कार्यक्रमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी पीएम किसान योजनेचा अठरावा हप्ता पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करणार आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe