Mahindra New SUV : भारतात मिडसाईज एसयुव्हीची मागणी मोठ्या प्रमाणात असते. Mid Size SUV सेगमेंटमध्ये ह्युंदाई कंपनीच्या क्रेटाचा मोठा बोलबाला आहे. मात्र आता क्रेटाला तगड्या कॉम्पिटिशन चा सामना करावा लागू शकतो.
कारण की महिंद्रा अँड महिंद्रा कंपनी लवकरच या सेगमेंट मध्ये नवीन एसयुव्ही लॉन्च करण्याच्या तयारीत आहे आणि ही नवीन एसयुव्ही थेट क्रेटाला टक्कर देणार आहे. महिंद्रा अँड महिंद्रा येत्या काही दिवसांनी भारतीय SUV बाजारात मोठा धमाका करण्याच्या तयारीत असल्याची बातमी समोर आली आहे.

कंपनी आपला SUV पोर्टफोलिओ अधिक मजबूत करण्यासाठी मिड-साइज SUV सेगमेंटमध्ये नवीन मॉडेल सादर करण्याचा विचार करत आहे. जसं की आपणास माहीतच आहे की, या सेगमेंटवर सध्या Hyundai Creta चे वर्चस्व आहे.
मात्र आता महिंद्रा नवीन मॉडेल लॉन्च करणार असून ही आगामी SUV केवळ क्रेटालाच नाही, तर नुकत्याच चर्चेत आलेल्या Tata Sierra सारख्या गाड्यांनाही थेट टक्कर देऊ शकते. पण, कंपनीकडून अद्याप या कारबाबत कोणतीही अधिकृत माहिती जाहीर करण्यात आलेली नाही.
मात्र, ऑटोमोबाईल इंडस्ट्रीमध्ये या SUV विषयी जोरदार चर्चा सुरू आहे. उपलब्ध माहितीनुसार, महिंद्राची ही नवी मिड-साइज SUV कंपनीच्या अत्याधुनिक NU_IQ मॉड्यूलर प्लॅटफॉर्मवर आधारित असण्याची शक्यता आहे.
या प्लॅटफॉर्मचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे यावर पेट्रोल, डिझेल, हायब्रिड तसेच इलेक्ट्रिक असे विविध प्रकारचे पॉवरट्रेन विकसित करता येतात. त्यामुळे भविष्यात ही SUV वेगवेगळ्या इंजिन पर्यायांसह बाजारात उपलब्ध होऊ शकते.
ही कार महिंद्राच्या लोकप्रिय XUV बँड अंतर्गत सादर केली जाईल, असा अंदाज व्यक्त केला जात असून, तिची थेट स्पर्धा Hyundai Creta शी होण्याची शक्यता आहे. डिझाइनच्या बाबतीत बोलायचे झाल्यास, ही SUV Vision S कॉन्सेप्टवर आधारित असण्याची दाट शक्यता आहे.
हा कॉन्सेप्ट नुकताच स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने सादर करण्यात आला होता. फ्रंटला महिंद्राचा ट्विन पीक्स लोगो, आकर्षक LED हेडलाइट्स आणि दमदार SUV लूक ही याची प्रमुख वैशिष्ट्ये असू शकतात.
अधिक ग्राउंड क्लीयरन्स, मोठे टायर्स आणि रुंद स्टान्समुळे ही कार रस्त्यावर अधिक मजबूत आणि आकर्षक दिसेल. मात्र, प्रोडक्शन व्हर्जनमध्ये काही डिझाइन घटक थोडे साधे केले जाऊ शकतात.
केबिनबाबत सांगायचे झाल्यास, या SUV मध्ये नवे डिझाइन असलेले स्टीयरिंग व्हील, मोठा टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, वायरलेस कनेक्टिव्हिटी, पॅनोरॅमिक सनरूफ आणि ड्युअल-टोन इंटीरियर यांसारखी प्रीमियम वैशिष्ट्ये दिली जाण्याची शक्यता आहे. कॉन्सेप्टमध्ये फ्युएल कॅप दिसत असल्याने ही SUV प्रामुख्याने ICE इंजिनवर आधारित असणार असल्याचे संकेत मिळतात.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, महिंद्राची ही नवी मिड-साइज SUV 2027 पर्यंत भारतीय बाजारात लॉन्च होऊ शकते. तिच्या आगमनामुळे या सेगमेंटमधील स्पर्धा अधिक तीव्र होणार असून, ग्राहकांसाठी आणखी एक दमदार आणि आधुनिक पर्याय उपलब्ध होईल.