Mahindra Scorpio N ही भारतातील सर्वाधिक विक्री होणाऱ्या आणि लोकप्रिय एसयूव्हींपैकी एक आहे. ह्या कारचे आकर्षक डिझाइन, मजबूत इंजिन आणि शहर तसेच ग्रामीण भागातील उत्तम कामगिरीमुळे ती ग्राहकांमध्ये विशेष पसंतीस उतरली आहे. जर तुम्ही लवकरच स्कॉर्पिओ एन खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर त्यासाठी आवश्यक असलेला डाउन पेमेंट, EMI आणि एकूण खर्च याचा अंदाज आज आपण जाणून घेऊयात.
किंमत आणि डाउनपेमेंट
महिंद्रा स्कॉर्पिओ एन ची एक्स-शोरूम किंमत ₹13.99 लाख पासून सुरू होते. मात्र, मोठ्या शहरांमध्ये बेस Z2 (पेट्रोल) मॉडेलची ऑन-रोड किंमत अंदाजे ₹16.29 लाख इतकी आहे. या किंमतीमध्ये ₹1.45 लाख आरटीओ शुल्क आणि सुमारे ₹70,000 विमा खर्च समाविष्ट आहे. जर तुम्ही 3 लाख रुपयांचे डाउन पेमेंट करण्याचा विचार करत असाल, तर तुम्हाला उर्वरित रक्कम कर्जाद्वारे भागवावी लागेल. यासाठी कर्ज घेतल्यास तुम्हाला किती EMI आणि व्याज द्यावं लागेल हे आता आपण पाहुयात.
![Mahindra Scorpio N](https://ahmednagarlive24.com/wp-content/uploads/2025/02/Mahindra-Scorpio-N.jpg)
EMI आणि व्याज
जर तुम्ही ₹3 लाखांचे डाउन पेमेंट केल्यानंतर उर्वरित ₹13.29 लाख कर्ज घेतले, तर कर्जाचा कालावधी आणि व्याजदरानुसार तुमचा मासिक हप्ता समजा 5 वर्षांचे कर्ज (9% व्याजदराने) घेतल्यास, मासिक ईएमआय ₹27,582 असेल.तर 7 वर्षांचे कर्ज घेतल्यास, मासिक ईएमआय ₹21,000 पर्यंत कमी होईल.जर तुम्ही 5 वर्षांत कर्ज फेडले, तर एकूण परतफेड केलेली रक्कम सुमारे ₹18 लाख होईल. म्हणजेच, डाउन पेमेंटसह तुम्हाला एकूण ₹21 लाख खर्च करावे लागतील.
महिन्याला होणारा खर्च किती असेल ?
महिंद्रा स्कॉर्पिओ एन खरेदी केल्यानंतर तुमचा एकूण मासिक खर्च फक्त ईएमआयपुरता मर्यादित नसतो. कारचा इंधन खर्च, नियमित देखभाल, विमा नूतनीकरण, आणि इतर लहानसहान खर्चाचा विचार केल्यास, एकूण मासिक खर्च ₹35,000 पर्यंत जाऊ शकतो. या हिशोबानुसार, ₹70,000 ते ₹80,000 मासिक उत्पन्न असणाऱ्या व्यक्तीसाठी स्कॉर्पिओ एन खरेदी करणे आर्थिकदृष्ट्या सोयीस्कर ठरू शकते.
कार खरेदी करण्याआधी कोणते मुद्दे लक्षात घ्यावेत ?
महिंद्रा स्कॉर्पिओ एन ची ऑन-रोड किंमत डीलरशिपनुसार आणि शहरानुसार बदलू शकते. त्यामुळे खरेदी करण्यापूर्वी विविध शहरांमधील किंमतींची तुलना करणे फायदेशीर ठरू शकते. याशिवाय, कार कर्जासाठी व्याजदर तुमच्या क्रेडिट स्कोअरवर अवलंबून असतो. जर तुमचा क्रेडिट स्कोअर चांगला असेल, तर तुम्हाला स्वस्त व्याजदर मिळू शकतो. जर तुम्ही स्कॉर्पिओ एन खरेदी करण्यास उत्सुक असाल, तर अधिकृत माहिती आणि फायनान्सिंग पर्यायांसाठी जवळच्या महिंद्रा डीलरशिपला भेट देणे किंवा बँक आणि फायनान्स कंपन्यांशी संपर्क साधणे चांगले राहील.
₹3 लाख डाउन पेमेंटमध्ये कार घेता येईल का ?
होय, ₹3 लाख डाउन पेमेंट करून तुम्ही महिंद्रा स्कॉर्पिओ एन खरेदी करू शकता. मात्र, तुम्हाला कर्ज आणि मासिक खर्च याचा योग्य अंदाज घ्यावा लागेल. कर्ज कालावधी आणि व्याजदर यानुसार, तुमच्या मासिक ईएमआयची रक्कम ₹21,000 ते ₹27,582 दरम्यान असेल, तर एकूण खर्च ₹21 लाख रुपयांपर्यंत जाऊ शकतो. जर तुमचे मासिक उत्पन्न ₹70,000 किंवा त्याहून अधिक असेल आणि तुम्हाला दीर्घकालीन आर्थिक व्यवस्थापन करण्याची तयारी असेल, तर महिंद्रा स्कॉर्पिओ एन तुमच्यासाठी योग्य पर्याय ठरू शकतो.