Mahindra XEV 9e And BE 6 Price : महिंद्रा अँड महिंद्रा आपला इलेक्ट्रिक कारचा पोर्टफोलिओ स्ट्रॉंग करण्याच्या तयारीत आहे. कंपनीने नुकत्याच दोन बहुचर्चित इलेक्ट्रिक SUV लॉन्च केल्यात. XEV 9e आणि BE 6 या त्या दोन बहुचर्चित एसयुव्ही आहेत. खरे तर या गाड्या लॉन्च झाल्यापासूनच चर्चेचा विषय ठरत आहेत.
यामध्ये देण्यात आलेले फीचर्स सर्वांचे लक्ष आपल्याकडे वेधून घेत आहेत. सध्या इलेक्ट्रिक कार च्या सेगमेंट मध्ये टाटा कंपनीचा बोलबाला आहे. मात्र आता टाटा कंपनीची ही मक्तेदारी खोडून टाकण्यासाठी महिंद्रा अँड महिंद्रा कंपनी सज्ज झाली असून याच अनुषंगाने महिंद्राने या दोन बहुचर्चित गाड्या लॉन्च केल्या आहेत.
दरम्यान आता कंपनीकडून त्यांच्या बहुप्रतिक्षित इलेक्ट्रिक SUVs XEV 9e आणि BE 6 च्या किंमती आणि वितरण वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. खरे तर गेल्या अनेक दिवसांपासून या गाडीच्या किमती बाबत आणि वितरण वेळापत्रकाबाबत प्रश्न विचारले जात होते. अखेर कार कंपनीने आता याबाबत मोठी माहिती दिली आहे.
या दोन्ही आलिशान ईव्हीसाठीची बुकिंग 14 फेब्रुवारी 2025 पासून सुरू होईल आणि मार्च 2025 पासून टप्प्याटप्प्याने वितरण सुरू होईल, असे कंपनीकडून कळविण्यात आले आहे. महिंद्रासाठी अधिकृत बुकिंग 14 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी 9 वाजेपासून सुरू होणार आहे.
पण आज, 6 फेब्रुवारी 2025 पासून, ग्राहक mahindraelectricsuv.com वर जाऊन त्यांचे आवडते प्रकार आणि मॉडेल निवडू शकतात, ज्यामुळे बुकिंग प्रक्रिया सुलभ होईल. आता आपण BE 6 आणि XEV 9e ची किंमत आणि वितरण तपशीलबाबत सविस्तर माहिती अगदी थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
बहुचर्चित BE6 एसयुव्हीच्या किंमती कशा आहेत?
पॅक वन 59 Kwh बॅटरी पॅकची एक्स शोरूम किंमत 18.90 लाख आहे. पॅक वन 79 Kwh बॅटरी पॅकची एक्स शोरूम किंमत 20.50 लाख आहे. या दोन्ही मॉडेलची डिलिव्हरी ऑगस्ट महिन्यात सुरु होण्याची शक्यता आहे. पॅक टू 59Kwh मॉडेलची एक्स शोरूम किंमत 21.90 लाख आहे.
याची डिलिव्हरी जुलै 2025 पासून सुरू होईल. पॅक थ्री सिलेक्ट 59 kWh या मॉडेलची किंमत 24.50 लाख इतकी आहे. याची डिलिव्हरी जून 2025 पासून सुरु होणार आहे. पॅक थ्री टॉप व्हेरियंट 79 kWh मॉडेल ची किंमत 26.90 लाख आहे अन याची डिलिव्हरी मिड मार्च पासून सुरु होणार आहे.
बहुचर्चित XEV 9e एसयुव्हीच्या किंमती कशा आहेत?
पॅक वन 59 Kwh बॅटरी पॅकची एक्स शोरूम किंमत 21.90 लाख आहे. या मॉडेलची डिलिव्हरी ऑगस्ट महिन्यात सुरु होण्याची शक्यता आहे. पॅक टू 59Kwh मॉडेलची एक्स शोरूम किंमत 24.90 लाख आहे. याची डिलिव्हरी जुलै 2025 पासून सुरू होईल. पॅक थ्री सिलेक्ट 59 kWh या मॉडेलची किंमत 27.90 लाख इतकी आहे. याची डिलिव्हरी जून 2025 पासून सुरु होणार आहे. पॅक थ्री टॉप व्हेरियंट 79 kWh मॉडेल ची किंमत 30.50 लाख आहे अन याची डिलिव्हरी मिड मार्च पासून सुरु होणार आहे.
वर नमूद केलेल्या किमती या एक्स शोरूम किमती असून यामध्ये चार्जर आणि इन्स्टॉलेशन खर्च समाविष्ट केलेला नाही. ग्राहक अतिरिक्त पैसे देऊन आपल्या पसंतीचे चार्जर घेऊ शकणार आहेत. 7.2 kW चार्जर साठी पन्नास हजार अतिरिक्त द्यावे लागणार आहेत आणि 11.2 kW चार्जर साठी 75 हजार रुपये अतिरिक्त द्यावे लागणार आहेत.