Mahindra XEV 9E : महिंद्रा XEV 9E ही अलीकडेच लॉन्च झालेली महिंद्रा कंपनीची एक बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित एसयूव्ही. खरंतर अलीकडे भारतीय कार मार्केटमध्ये इलेक्ट्रिक SUV गाड्यांना मागणी आली आहे. इलेक्ट्रिक सेगमेंटचा विचार केला असता सध्या देशात टाटा कंपनीचा बोलबाला आहे.
इलेक्ट्रिक सेगमेंट मध्ये टाटा कंपनीचे वर्चस्व खोडून काढण्यासाठी आता इतरही कंपन्या पुढे सरसावल्या आहेत. महिंद्रा कंपनीने देखील अलीकडेच दोन एसयूव्ही लॉन्च केल्या आहेत. XEV 9E ही त्यापैकीच एक बहुचर्चित एसयूव्ही आहे.

या गाडीमध्ये अगदीच वर्ल्ड क्लास फीचर लोड करण्यात आले आहेत. XEV 9E चार वेरियंट मध्ये बाजारात लॉन्च करण्यात आली आहे. पॅक 1, पॅक 2, पॅक 3 सिलेक्ट आणि पॅक 3 हे ते चार वेरियंट आहेत. या एसयुव्हीची किंमत 23.19 लाख ते 32.53 लाख (ऑन-रोड, मुंबई) दरम्यान आहे.
दरम्यान कंपनीने अधिकृतरित्या ही एसयूव्ही बुकिंगसाठी उपलब्ध करून दिली आहे. अशा परिस्थितीत आज आपण महिंद्रा कंपनीच्या या अलीकडेच लॉन्च झालेल्या SUV चे फीचर्स अन पॉवरट्रेन बाबत माहिती पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. या गाडीच्या प्रत्येक वेरियंटमध्ये नेमकं काय खास वैशिष्ट्य देण्यात आले आहे याची सुद्धा आता आपण डिटेल माहिती पाहणार आहोत.
कसे आहे Mahindra XEV 9E Pack 3 Variant?
पॅक 3 व्हेरिएंट हे XEV 9E चा टॉप-ऑफ-द-लाइन वेरियंट आहे आणि त्याची किंमत देशाच्या आर्थिक राजधानी अर्थातच मुंबईत 32.53 लाख रुपये आहे. ही मुंबईतील ऑन रोड प्राईस आहे. हे या मॉडेलचे टॉप व्हेरिएंट आहे अन यात 79 केडब्ल्यूएच बॅटरी पॅक मिळतो. आता आपण या व्हेरिएंट मध्ये कोणकोणते फीचर्स आहेत याची थोडक्यात माहिती पाहूयात.
फास्ट चार्जिंग – यात 175 किलोवॅट डीसी चार्जर देण्यात आले आहे जे की फक्त 20 मिनिटांत गाडी 20% हुन 80% पर्यंत चार्ज करते.
ग्लास रूफ आणि इंटेरियर मध्ये 16 million कलर अम्बीएन्ट लायटिंग इंटिग्रॅटेड आहे.
नाईट ट्रेल कार्पेट लाईट आहेत.
व्हिजन-ऑगमेंटेड रिअलिटी हेड-अप डिस्प्ले देण्यात आला आहे.
5 रडार आणि 1 व्हिजन कॅमेर्यासह लेव्हल 2 + ADAS
ड्रायव्हर इनिशिएटेड ऑटो लेन चेंज फिचर सुद्धा यामध्ये देण्यात आले आहे.
यात इमर्जन्सी स्टेरिंग असिस्ट आणि ब्लाइंड स्पॉट डिटेक्शन सारखे फीचर्स सुद्धा आहेत.
Mahindra XEV 9E चे Pack 3 Select व्हेरिएंट कसे आहे?
पॅक 3 सिलेक्ट हे व्हेरिएंट विविध फीचर्ससह लॉन्च करण्यात आले आहे. या व्हेरिएंटची मुंबईमधील ऑन रोड प्राईस ही 29.47 लाख रुपये इतकी आहे. या व्हेरिएंटमध्ये 59 केडब्ल्यूएच बॅटरी मिळते. या गाडीत इंटेलिजन्ट अडॅप्टिव्ह सस्पेन्शन, सॉफ्ट लेदर सीट आणि लेदर इंटेरियर देण्यात आले आहे. कन्सोल आणि स्टीयरिंग व्हील वर कॅपेसिटिव्ह टच स्विच दिले आहे.
7 एअरबॅग्ज, Eyedentity – DOMS, 360-डिग्री कॅमेरा, ब्लाइंड व्ह्यू मॉनिटर, सेक्यूर 360 लाईव्ह व्यूव्ह अँड मॉनिटरिंग, ऑटोपार्क, व्हिडिओ कॉलिंग, दोन वायरलेस चार्जिंग पॅड, व्हेंटिल्टेड फ्रंट सीट, पॅसीव्ह कीलेस एंट्री, जेश्चर कंट्रोलसह इलेक्ट्रिक टेलगेट, सेकण्ड रो विंडो सनशेड असे काही भन्नाट फीचर्स या गाडीमध्ये देण्यात आले आहेत.
Mahindra XEV 9E चे Pack 2 व्हेरिएंट कसे आहे?
Mahindra XEV 9E चे Pack 2 व्हेरिएंटमध्ये सुद्धा कंपनीने अनेक भन्नाट फीचर्स दिले आहेत. या गाडीची राजधानी मुंबईत 26.33 लाख रुपये इतकी ऑन-रोड प्राईस आहे. या व्हेरिएंटमध्ये 59 केडब्ल्यूएच बॅटरी मिळते. या गाडीच्या फीचर्स बाबत आता आपण सविस्तर माहिती पाहूयात.
या गाडीत अॅडॉप्टिव्ह क्रूझ कंट्रोल, फिक्स्ड इन्फिनिटी ग्लासरुफ, कंपनीच्या सिग्नेचर लॅम्पसह एलईडी डीआरएल देण्यात आले आहेत. 19 इंची अलोय व्हील, लेदर सीट, सिक्वेन्शियल टर्न इंडिकेटर, 1 रडार आणि 1 व्हिजन कॅमेर्यासह लेव्हल 2 ADAS, टीपीएमएस सारखे फीचर्स सुद्धा यामध्ये आहेत.
फ्रंटला फॉग लाईट, कॉर्नरिंग लाईट, ऑटो बूस्टर लाईट, फ्रंट पार्किंग सेन्सर सुद्धा देण्यात आले आहेत. शिवाय यात डॉल्बी अॅटॉमसह 16-स्पीकर हार्मोन-कारार्डन म्युझिक सिस्टम, वायरलेस चार्जिंग पॅड, एनएफसी की, 6-वे इलेक्ट्रॉनिक ऍडजेस्टेबल ड्रायव्हर सीट, ऑटो फोल्ड ORVMs, ड्युअल-झोन ऑटोमॅटिक टेंपरेचर कंट्रोल, ऑटो-डिमिंग आयआरव्हीएम अन मागील बाजूस एसी व्हेंट्स देण्यात आले आहेत.
Mahindra XEV 9E चे Pack 1 व्हेरिएंट कसे आहे?
Mahindra XEV 9E पॅक 1 हा या लाइनअपचा बेस व्हेरिएंट आहे. या बेस व्हेरिएंटमध्ये देखील कंपनीने जबरदस्त फीचर्स दिले आहेत. त्याची मुंबईमधील ऑन रोड प्राईस 23.19 लाख रुपये एवढी आहे. यात 59 केडब्ल्यूएच बॅटरी पॅक मिळतो. आता आपण या गाडीमध्ये देण्यात आलेले फीचर्स अगदी थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
या गाडीत सुपरफास्ट चार्जिंग आहे, 140 kW DC चार्जेरमुळे ही गाडी फक्त वीस मिनिटात 20 टक्क्याहून 80% पर्यंत चार्ज होते. यात व्हेरिएबल गियर रेशोसह इलेक्ट्रिक पॉवर स्टीयरिंग, बूस्ट मोडसह मल्टिपल ड्राइव्ह मोड, ऍडजेस्टेबल लेवल ऑफ रीजनरेशन, सिंगल पेडल ड्राइव्ह, अॅडॉप्टिव्ह डॅम्पर, क्रूझ कंट्रोल, Bi-Led हेडलॅम्प्स, एलईडी टेल लॅम्प देण्यात आले आहेत.
तसेच, प्रीमियम फॅव्ह्रिक अपहोल्स्ट्री, एरो कव्हरसह 19 इंचाचे अलोय व्हील, 6 एअरबॅग, ब्रेक-बाय-वायर, इंटेलिजंट इलेक्ट्रॉनिक ब्रेक बूस्टर, ड्राइवर ड्राउसिनेस डिटेकशन, इलेक्ट्रॉनिक पार्किंग ब्रेक, रिअर पार्किंग सेन्सर आणि कॅमेरा, ट्रिपल स्क्रीन सेटअप (12.3-इंच स्क्रीन), वायरलेस Android ऑटो आणि Apple कारप्ले सारखे फीचर्स यामध्ये आहेत.
तसेच ओटीटी, सोशल मीडिया आणि इतर अॅप्स, ADRENOX फिचर, 4 स्पीकर्स आणि 2 ट्वीटर, पुश बटण स्टार्ट, रेन सेन्सिंग वाइपर, हाईट ऍडजेस्टेबल सीट, स्मार्ट क्लायमेट कंट्रोल यांसारखे फीचर्स देखील या गाडीमध्ये देण्यात आले आहेत.