मकर संक्रांतीच्या दिवशी चुकूनही ‘या’ वस्तूंचे दान करू नका ! पुण्य नाही पाप लागणार, लक्ष्मीमाता नाराज होईल

मकर संक्रांतीचा हा सण भारतातील विविध राज्यांमध्ये वेगवेगळ्या नावांनी ओळखला जातो. अन वेगवेगळ्या राज्यांमध्ये साजरा होणारे हे वेगवेगळे सण काही प्रमाणात बदलही आहेत. मकर संक्रांतीचा सण हा पोंगल, लोहरी, बिहू इत्यादी नावांनी ओळखला जातो. पण शास्त्रामध्ये या दिवशी काही गोष्टींचे दान करणे अशुभ असल्याचे सांगितले गेले आहे.

Tejas B Shelar
Published:
Makar Sankranti 2025

Makar Sankranti 2025 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार नवग्रहातील ग्रह एका ठराविक कालावधीनंतर राशी आणि नक्षत्र परिवर्तन करत असतात. सूर्य देवाचे सुद्धा राशी आणि नक्षत्र परिवर्तन होते. दरम्यान सूर्यदेवाचे जेव्हा मकर राशीत आगमन होते म्हणजेच सूर्यदेवाचे जेव्हा मकर राशीत गोचर होते त्या दिवशी महाराष्ट्रात एक मोठा सण साजरा होत असतो.

ज्याला आपण सर्वजण मकर संक्रांत म्हणून ओळखतो. जानेवारी महिन्यातील हा पहिलाच सण. या दिवशी सूर्यदेवाची यथासांग पूजा करण्याची आपल्याकडे परंपरा आहे. हा दिवस उत्तरायणाचा प्रारंभही मानला जातो. असे मानले जाते की, या दिवशी स्नान, दान आणि पूजा केल्याने पुण्य प्राप्त होते. मकर संक्रांतीचा सण हा नवीन पिकाच्या आगमनाचेही प्रतीक असतो.

सूर्य देवाचे मकर राशीत गोचर झाले की आपण मकर संक्रांत साजरा करतो. पण, मकर संक्रांतीचा हा सण भारतातील विविध राज्यांमध्ये वेगवेगळ्या नावांनी ओळखला जातो. अन वेगवेगळ्या राज्यांमध्ये साजरा होणारे हे वेगवेगळे सण काही प्रमाणात बदलही आहेत. मकर संक्रांतीचा सण हा पोंगल, लोहरी, बिहू इत्यादी नावांनी ओळखला जातो.

पण शास्त्रामध्ये या दिवशी काही गोष्टींचे दान करणे अशुभ असल्याचे सांगितले गेले आहे. अशा स्थितीत आज आपण मकर संक्रांतीच्या दिवशी कोणकोणत्या गोष्टी दान करू नयेत आणि कोणत्या गोष्टी दान केल्यास पुण्य मिळणार याबाबतचा आढावा घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. सर्वात आधी आपण कोणत्या गोष्टी दान कराव्यात याची माहिती पाहूयात.

कोणत्या गोष्टी दान कराव्यात ?

शास्त्रात असं सांगितलं गेलं आहे की मकर संक्रांतीच्या पवित्र दिवशी सुवासिनींना खिचडी, तिळगूळ, सौभाग्याच्या वस्तू, नवीन वस्त्र दान करायला हवे. या वस्तू दान केल्याने आपल्या घरात सुख-समृद्धी नांदते.

या दिवशी पात्र दान, वस्त्र दान, गौ दान, तिळगूळ आणि खिचडी दान यांना विशेष महत्त्व आहे. महाराष्ट्रात तिळगुळ देऊन तिळगुळ घ्या गोड गोड बोला असं म्हणतं सर्वधर्म, सर्व जाती समभाव आहेत असा संदेशही दिला जातो.

कोणत्या गोष्टी दान करू नयेत

शास्त्र असं सांगत की मकर संक्रांतीच्या दिवशी झाडू चुकूनही दान करू नये कारण की असं दान अशुभ मानले गेले आहे. झाडूला माता लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते आणि याला दान करणे म्हणजे लक्ष्मी दान करणे असं होईल. या दिवशी झाडू दान केल्यास घरात गरिबी येते असं म्हणतात.

धारदार वस्तू सुद्धा मकर संक्रांतीच्या दिवशी दान करू नये. तीक्ष्ण किंवा धारदार वस्तूंमध्ये नकारात्मक ऊर्जा असते. त्यामुळे हे दान केल्याने घरात कलह आणि दुर्दैव येऊ शकते. धारदार वस्तू म्हणजेच चाकू विळा-खिळा अशा वस्तू दान करू नयेत.

याशिवाय काचेच्या वस्तू, स्टील, ऍल्युमिनियम, लोखंडाच्या वस्तू अन सर्वात महत्त्वाचे म्हणजे वापरलेल्या वस्तू मकर संक्रांतीच्या दिवशी दान करू नये. फक्त मकर संक्रांतीलाच नाही तर इतरही दिवशी या वस्तू दान केल्यास घरात दरिद्री येण्याची शक्यता असते. यामुळे शास्त्रात सांगितलेल्या या गोष्टीचे आपण सार्‍यांनी पालन केले पाहिजे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe