Business Idea : विविध बिझनेस, स्टार्टअप्स यांची डिमांड सध्या वाढत आहे. लोक वेगवेगळे बिझनेस करत आहेत. बिझनेसद्वारे लोक आपली आर्थिक प्रगती करत आहेत. तुम्ही देखील व्यवसाय करायच्या विचहरात असाल व तुम्हाला रेगुलर बिझनेस पेक्षा युनिक बिझनेस करायचा असेल तर तुमच्यासाठी
केळीपासून कागद बनवण्याचा व्यवसाय अतिशय योग्य ठरणार आहे. विशेष म्हणजे हा व्यवसाय अतिशय युनिक असून इतर व्यवसायापेक्षा वेगळा देखील आहे. हा व्यवसाय तुम्ही गाव, शहर, मेट्रो सिटी कुठेही सुरू करू शकता. चला या व्यवसायाबद्दल सविस्तर जाणून घेऊया.
केळीपासून पेपर हा केळीच्या झाडाची साल किंवा केळीच्या सालीच्या तंतूपासून बनवला जातो. हा कागद आपल्या रेगुलर कागदापेक्षा कमी घनतेचा असतो. याचा टिकाऊपणा अत्यंत जबरदस्त आहे. शिवाय हा कागद हाय डिस्पोजेबल आहे.
* सुरवातीला जाणून घेऊयात किती लागेल भांडवल
खादी व ग्रामोदय आयोगाने मॅन्युफॅक्चर युनिटचा एक रिपोर्ट तयार केला आहे. त्यानुसार हा व्यवसाय सुरू करण्यासाठी अंदाजे 16 लाख 47 हजार रुपये खर्च येईल. बऱ्याचदा इतके पैसे तुमच्या खात्यात नसतात. अनेकदा केवळ भांडवल नसल्याने हा व्यवसाय अनेक लोक करत नाहीत. पण तुम्ही काळजी करू नका.
तुमच्याकडे फक्त 1 लाख 65 हजार रुपये असले तरी काम ओके आहे. उर्वरित रक्कम बँक तुम्हाला कर्ज देईल. एकंदरीत तुमच्याकडे पुरेसे पैसे असले की तुम्ही हा व्यवसाय व्यवस्थित व मोठ्या प्रमाणात करू शकता. तुम्हाला पंतप्रधान मुद्रा कर्ज योजनेतूनही यासाठी मदत होईल. पण थांबा,
एक काम महत्वाचं करा, व्यवसाय सुरु करतं असताना एमएसएमई एंटरप्राइझ ऑनलाइन नोंदणी, जीएसटी नोंदणी, बीआयएस प्रमाणपत्र आधीच गोष्टी आधीच करून घ्या.
* केळीच्या धाग्यांचा उपयोग कुठे कुठे होतो माहितीये का?
केळीच्या खोडापासून तयार केलेल्या धाग्यांचा वापर अनेक ठिकाणी होतो. याचा वापर शक्यतो हस्तकला वस्तू, पिशव्या, उच्च-गुणवत्तेचे कापड, दोरी, माशांचे जाळे, पडदे आदी वस्तू तयार करण्यासाठी होतो. या वस्तू या धाग्यांद्वारे चांगल्या दर्जाच्या बनतात.
* किती होईल कमाई
या व्यवसायातून साधारण वार्षिक 5 लाख रुपयांहून अधिक कमवू शकता. तुमचा व्यवसाय जसजसा वाढत जाईल तसतसा तुमचा नफा वाढत जाईल. तुम्ही योग्य पद्धतीने नियोजन केले तर नक्कीच तुमचा व्यवसाय वाढेल व तुमचा निकम देखील वाढेल.