अक्षय तृतीयेच्या आधीच हापूसचा रुबाब वाढला, हापूस आंब्याचे रेट 20 टक्क्यांनी वाढलेत, आता एक डझनसाठी मोजावे लागणार ‘इतके’ पैसे

उन्हाळा सुरू झाला की बाजारात आंब्यांची आवक वाढते. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये दरवर्षी आंबे खरेदीसाठी ग्राहकांची बाजारात प्रचंड गर्दी पाहायला मिळते. यंदा देखील आंब्याच्या खरेदीसाठी ग्राहकांची अशीच गर्दी होत आहे. यावर्षी गुढीपाडव्याला हापूस आंब्याला चांगला विक्रमी भाव मिळाला होता. यानंतर काही काळ हापूसचे रेट कंट्रोल मध्ये राहिलेत मात्र, आता पुन्हा एकदा हापूसचे रेट तेजीत आले आहेत.

Published on -

Mango Price : उन्हाळा सुरू झाला की खवय्यांच्या माध्यमातून आंब्यावर ताव मारला जातो. आंबा हा फळांचा राजा आहे आणि हापूसला आंब्यांचा राजा म्हणतात. खवय्ये लोक हापूस आंब्याला अधिक पसंती दाखवत असतात. दरम्यान हापूस प्रेमींसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे.

खरे तर गुढीपाडवा झाल्यानंतर हापूस आंब्याच्या रेटमध्ये थोडीशी कपात झाली होती. यामुळे सर्वसामान्य ग्राहकांना नक्कीच दिलासा मिळाला. पण 30 एप्रिलला साजऱ्या होणाऱ्या अक्षय तृतीयाच्या आधीच हापूसचा तोरा पुन्हा वाढलाय.

खरेतर, नाशिकच्या बाजारपेठांमध्ये हापूस आंब्याची जोरदार एंट्री झाली आहे. महत्त्वाचे म्हणजे याच्या खरेदीला सामान्य ग्राहकांकडून चांगला प्रतिसाद सुद्धा मिळतोय. ग्राहक मोठ्या प्रमाणात हापूस आंब्याची खरेदी करत आहेत. गुढीपाडव्यानंतर हापूसची आवक वाढली होती आणि यामुळे याचे भाव कमी झाले होते.

पण आता पुन्हा एकदा याचे दर वाढले आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत याचे दर जवळपास 15 ते 20 टक्क्यांनी अधिक असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. आता आपण एक डझन हापूस आंबा खरेदीसाठी सध्या किती रुपये मोजावे लागत आहेत ? याची माहिती पाहणार आहोत.

हापूसचा भाव काय ?

व्यापाऱ्यांकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार, सध्या नाशिकमध्ये हापूस आंब्याचा भाव 1400 ते 1600 रुपये प्रति डझन असा आहे. पण काही व्यापाऱ्यांकडून आणि विक्रेत्यांकडून हापूसचे रेट आगामी काळात कमी होऊ शकतात असे म्हटले जात आहे.

कारण म्हणजे हापूस सहित इतर आंब्यांची बाजारपेठेत आता मोठ्या प्रमाणात आवक होत आहे आणि हेच कारण आहे की पुढे याचे रेट कमी होण्याची शक्यता आहे. जाणकार लोक सांगतात की, रमजान महिना संपला की बाजारात हापूस चमकू लागतो.

यंदा सुद्धा रमजान महिना संपल्यानंतर लगेचच बाजारात हापूसची मोठ्या प्रमाणात आवक सुरु झाली. तसेच एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात बाजारात केसर, बादाम व इतर जातीच्या आंब्याची ही मोठ्या प्रमाणात आवक सुरू होते.

यानुसार हापुसहित बाजारात आता इतरही जातींचे आंबे मोठ्या प्रमाणात येऊ लागले आहेत. यंदा नाशिकच्या बाजारात मार्च महिन्यात हापूसची आवक सुरू झाली आणि त्यानंतर एप्रिल महिना सुरू झाल्याबरोबर देवगड हापूससह केसर, बादाम, लालबाग, राजापूरी, रत्नागिरी व अन्य जातींच्या आंब्याची आवक सुरू झाली.

खरे तर बाजारात आता हापूस सहित वेगवेगळ्या जातींच्या आंब्याची मोठी आवक होत आहे पण असे असतानाही अजूनही हापूसचे रेट तेजितच आहेत. दरम्यान 30 एप्रिल 2025 रोजी अक्षय तृतीया हा सण साजरा होणार आहे. या सणाला महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये आमरस केला जातो.

खानदेशात किंबहुना उत्तर महाराष्ट्रात सर्वत्र अक्षय तृतीयेच्या दिवशी आमरस तयार केला जातो, यासोबतच राज्यातील इतरही जिल्ह्यांमध्ये या दिवशी आमरस बनवतात आणि यामुळे या काळात आंब्यांना मोठी मागणी असते. म्हणून अक्षय तृतीया पर्यंत हापूसचे रेट कायम राहतील अशी शक्यता आहे आणि त्यानंतर याचे रेट कमी होऊ शकतात.

मित्रांनो गेल्या वर्षी याच काळात हापूस आंब्याला एक हजार रुपयांपासून ते बाराशे रुपये प्रति डझन असा दर मिळत होता. मात्र सध्या हापूस आंब्याचे दर 1400 ते 1600 रुपये प्रति डझन असा आहे. मिळालेल्या माहितीनुसार सध्या किरकोळ बाजारात हापूसचे रेट 300 रुपये प्रति किलो आणि इतर आंब्यांचे दर दोनशे रुपये प्रति किलो पर्यंत पोहोचले आहेत.

यावर्षी आंबा पिकाला हवामानाच्या लहरीपणाचा एवढा फटका बसलेला नाही यामुळे आगामी काळात आंब्याची आवक आणखी वाढू शकते आणि याचाच परिणाम म्हणून दर आटोक्यात येण्याची शक्यता आहे.

पण सध्या तरी देवगड हापूसला तीनशे ते पाचशे रुपये प्रति किलो, रत्नागिरी हापूसला 250 ते 450 रुपये प्रति किलो, केशर आंब्याला 250 ते 450 रुपये प्रति किलो, लालबाग आणि बादाम आंब्याला 200 ते 300 रुपये प्रति किलो असा भाव मिळतोय. यामुळे आता अक्षय तृतीयाच्या काळात हापुसहित इतर आंब्यांना काय दर मिळतो हे पाहण्यासारखे ठरणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe