March 2025 Bank Holiday | मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात बँकेला किती दिवस सुट्ट्या आहेत ? संपूर्ण मार्च महिन्यातील बँकांच्या सुट्ट्यांची यादी पहा…

आरबीआय ने आपल्या अधिकृत संकेतस्थळावर मार्च 2025 मधील बँकांच्या सुट्ट्यांची यादी जाहीर केली आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या (RBI) सुट्ट्यांच्या यादीनुसार, मार्च महिन्यात विविध राज्यांमध्ये बँका काही दिवस बंद राहणार आहेत. तसेच, नियमाप्रमाणे सर्व बँका प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी तसेच प्रत्येक रविवारी बंद असतील.

Published on -

March 2025 Bank Holiday | आज 2 मार्च 2025 रोजी रविवार असल्याने देशभरातील बँकांना सुट्टी आहे. पण या चालू आठवड्यात बँका किती दिवस बंद राहणार आहेत? मार्च 2025 मध्ये बँकांना किती दिवस सुट्ट्या आहेत? याबाबत रिझर्व बॅंक ऑफ इंडिया कडून मोठी माहिती देण्यात आली आहे.

आरबीआय ने आपल्या अधिकृत संकेतस्थळावर मार्च 2025 मधील बँकांच्या सुट्ट्यांची यादी जाहीर केली आहे. दरम्यान आज आपण मार्च 2025 मधील याच सुट्ट्यांची यादी पाहणार आहोत. या महिन्यात विविध कारणांमुळे बँकांना सुट्ट्या मिळणार आहेत.

यामध्ये नियमित सार्वजनिक सुट्ट्या, साप्ताहिक सुट्ट्या आणि काही राज्यनिहाय सणांचा समावेश आहे. म्हणून ज्या लोकांना प्रत्यक्षात बँकेत जाऊन काम करायचे असेल त्या सर्व नागरिकांनी या सुट्ट्यांचा विचार करून आपले आर्थिक व्यवहार करणे आवश्यक आहे.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या (RBI) सुट्ट्यांच्या यादीनुसार, मार्च महिन्यात विविध राज्यांमध्ये बँका काही दिवस बंद राहणार आहेत. तसेच, नियमाप्रमाणे सर्व बँका प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी तसेच प्रत्येक रविवारी बंद असतील. या महिन्यात होळी आणि रामनवमी यांसारखे सण देखील आहेत, त्यामुळे काही ठिकाणी अतिरिक्त सुट्ट्या असतील.

मार्चमध्ये देशभरातील बँकांना मिळणाऱ्या सुट्ट्या

2 मार्च : रविवार निमित्ताने संपूर्ण देशात बँकेला सुट्टी असेल.
7 मार्च : चापचर कुट सणाच्या निमित्ताने मिझोरम मध्ये बँकांना सुट्टी राहणार आहे.
8 मार्च : दुसरा शनिवार असल्याने या दिवशी देशातील सर्वच बँकांना सुट्ट्या राहतील.
9 मार्च : रविवार निमित्ताने या दिवशी देशातील सर्व बँका बंद राहतील.
13 मार्च : डेहराडून, कानपूर, लखनऊ, रांची, तिरुवंगपुरम येथे होलिका दहनची सुट्टी असेल.
14 मार्च : देशातील बहुतांशी राज्यात या दिवशी होळीची सुट्टी असेल.
15 मार्च : याओसेंग दिवस असल्याने अगरतळा, भुवनेश्वर, इंफाळ, पटना येथे बँका बंद राहणार आहेत.
16 मार्च : रविवार असल्याने देशातील बँका बंद राहतील.
22 मार्च : चौथा शनिवारची सुट्टी असेल. आणि हा बिहार दिवस असल्याने बिहारमध्ये विशेष सुट्टी असेल.
23 मार्च : रविवारची सुट्टी
27 मार्च : जम्मू, श्रीनगर येथे शब-ए-कद्रची सुट्टी असेल.
28 मार्च : जम्मू, श्रीनगर मध्ये उल विदाची सुट्टी असेल.
30 मार्च : रविवारची सुट्टी असेल.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe