पावरफुल इंजिन आणि आकर्षक डिझाईनची Maruti Alto K10 फक्त एका लाखात खरेदी करता येणार, कसं ते पहा ?

Published on -

Maruti Alto K10 Finance Details : जर तुमचे बजेट कमी असेल आणि तुम्हाला नवीन कार खरेदी करायची असेल तर तुमच्यासाठी आजचा लेख कामाचा ठरणार आहे. खरे तर बाजारात स्वस्त कारला नेहमीच मागणी असते. जेव्हाही स्वस्त कारचा विषय येतो तेव्हा मारुती सुझुकीची अल्टो K10 या गाडीचा विषय निघतोचं. ही देशातील सर्वात स्वस्त कार्सपैकी एक आहे. विशेष म्हणजे या गाडीची मध्यमवर्गीयांमध्ये मोठी क्रेझ असून ही कंपनीची एक हॉट सेलिंग कार आहे. मारुती सुझुकी ही सर्वात जास्त कार उत्पादित करणारी आणि विक्री करणारी कंपनी आहे.

जर तुम्हाला या कंपनीची सर्वात स्वस्त मारुती सुझुकी अल्टो k10 ही परवडणारी कार घ्यायची असेल तर तुम्ही फक्त 1 लाख रु. भरून ही गाडी खरेदी करू शकता. Maruti Alto K10 मध्ये तुम्हाला शक्तिशाली इंजिनसह लक्झरी डिझाइन आणि अनेक प्रीमियम फिचर्स पाहायला मिळणार आहेत. त्यामुळे, जर तुम्ही प्रीमियम डिझाइन, अप्रतिम वैशिष्ट्ये आणि उत्तम मायलेज असलेली ही भन्नाट कार खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर मारुती अल्टो K10 तुमच्यासाठी योग्य पर्याय ठरणार आहे. विशेष म्हणजे गाडी फक्त एक लाख रुपयात तुम्ही तुमच्या दारासमोर उभी करू शकता. यासाठी तुम्हाला फायनान्स करावा लागणार आहे. दरम्यान आज आपण या गाडीसाठी एक लाख रुपये डाऊन पेमेंट भरले तर किती रुपयांचा हप्ता भरावा लागणार, यासाठी किती वर्षांची परतफेड राहणार? या गोष्टींची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

1 लाख रुपये डाऊन पेमेंट भरल्यास कितीचा हप्ता भरावा लागणार :

Maruti Alto K10 ही स्वस्त कार EMI द्वारे तुम्ही खरेदी करू शकणार आहात. या कारच्या बेस मॉडेलची एक्स-शोरूम किंमत 3.99 लाख रुपये आहे आणि याची ऑन-रोड किंमत ही 4.43 लाख रुपयांपर्यंत जाते. जर तुम्हाला ही गाडी फायनान्स करायची असेल तर तुम्हाला 1 लाख रुपये डाउन पेमेंट करावे लागणार आहे. एक लाख रुपये डाऊन पेमेंट केल्यानंतर तुम्हाला 7 वर्षांसाठी 9% व्याजदराने 3.43 लाख रुपयांचे कर्ज मिळणार आहे. या कर्जासाठी तुम्हाला दरमहा ५२२१ रुपयांचा ईएमआय भरावा लागणार आहे. आता आपण या कारचे फीचर्स थोडक्यात समजून घेऊया.
कसे आहेत फिचर्स

मारुती अल्टो K10 चे डिझाईन हे कमी किंमत असतानाही खूपच आकर्षक आहेत. या गाडीचे डिझाईन तर शानदार आहेत शिवाय याचे फीचर्सही दमदार आहेत. ही गाडी सर्वसामान्यांना नजरेसमोर ठेवून डेव्हलप करण्यात आली आहे. या गाडीत तुम्हाला 1 लीटर ड्युअल जेट पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे, ज्यामध्ये 67 BHP च्या पॉवरसह 89 न्यूटन मीटरचा पीक टॉर्क जनरेट करण्याची क्षमता आहे. याशिवाय हे 5 स्पीड मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक ट्रान्समिशनमध्येही उपलब्ध आहे हे विशेष. म्हणजेच ही गाडी तुम्हाला ऑटोमॅटिक प्रकारातही मिळते.

या गाडीचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे त्याचे मायलेज. मध्यमवर्गीय लोक चांगल्या मायलेजची कार खरेदी करण्याला पसंती दाखवतात त्यामुळे या गाडीचे मायलेज इतर कारच्या तुलनेत अधिक चांगले असल्याचे पाहायला मिळते. ही कार तुम्हाला 1 लीटर पेट्रोलमध्ये 24.3 किलोमीटर प्रति लिटर मायलेज देऊ शकते असा दावा कंपनीने केला आहे. मारुती अल्टो K10 भारतीय कार मार्केटमध्ये विविध वेरिएंट्समध्ये लॉन्च करण्यात आली आहे.

या गाडीच्या बेस मॉडेलची एक्स-शोरूम किंमत 3.9 लाख एवढी आहे आणि टॉप मॉडेलची 5.96 लाख रुपये एवढी आहे. ही कार Std, LXi आणि VXi Plus या वेरिएंट्समध्ये मिळते. तसेच ही कार अनेक रंगांच्या पर्यायांमध्येही उपलब्ध आहे. म्हणजेच ग्राहकांना आपल्या आवडीनुसार कलर ऑप्शन सिलेक्ट करता येणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe