मीनलताईंनी लॉकडाऊनमध्ये शोधली संधी! 5 हजाराची गुंतवणूक करून केली व्यवसायाला सुरुवात; आज आहे 50 लाखाची उलाढाल

संधी ही कधीच स्वतःहून चालून येत नाही. आपल्याला आहे त्या परिस्थितीमध्ये संधीला शोधावे लागते व त्या संधीचे सोने करून जीवनात यशस्वी व्हावे लागते. जीवनामध्ये यशस्वी होण्यासाठी आपल्याला आरामात किंवा घरी बसून काहीच मिळत नाही हे सगळ्यांना माहिती आहे.

Ajay Patil
Published:
business idea

Business Success Story:- संधी ही कधीच स्वतःहून चालून येत नाही. आपल्याला आहे त्या परिस्थितीमध्ये संधीला शोधावे लागते व त्या संधीचे सोने करून जीवनात यशस्वी व्हावे लागते. जीवनामध्ये यशस्वी होण्यासाठी आपल्याला आरामात किंवा घरी बसून काहीच मिळत नाही हे सगळ्यांना माहिती आहे.

जीवनात काही मिळवायचे असेल तर आपल्याला हातपाय हलवण्याशिवाय पर्याय नसतो व यामध्ये प्रचंड प्रमाणात मेहनत व ठरवलेले ध्येय साध्य करण्याकरिता करावी लागणारी मेहनत आणि कामाच्या बाबतीतले समर्पण खूप महत्त्वाचे असते.

तेव्हाच कुठे व्यक्ती यशस्वी होत असते. अगदी याच मुद्द्याला धरून जर आपण जालन्यातील महिला उद्योजक मीनल जैद यांची यशोगाथा बघितली तर ती या मुद्द्याला साजेशी आहे व इतर तरुण उद्योजकांना प्रेरणादायक आहे.

लॉकडाऊन काळात सुरू केला मसाला व्यवसाय
आपल्याला माहित आहे की,जेव्हा कोरोनाच्या महामारीचे सावट संपूर्ण जगावर होते तेव्हा नोकरी किंवा व्यवसाय सगळे काही जागेवर थांबले होते. परंतु या संकटात देखील अनेक व्यक्तींनी नवनवीन संधी शोधल्या व संधीचे सोने केले. याच प्रकारे जालन्यातील महिला उद्योजक मीनल ताईंनी देखील व्यवसायाची संधी या कालावधीत शोधली.

त्यांच्या शेतामध्ये मिरची लागवड केलेली होती व मिरचीला बाजारपेठेत त्या कालावधीत चांगली मागणी नसल्यामुळे त्यांनी शेतातून मिरची तोडून आणली व त्यापासून मिरची पावडर बनवली. या प्रसंगातूनच त्यांचा सामान्य गृहिणी ते मसाला उद्योजक असा प्रवास सुरू झाला. त्यांचे संपूर्ण कुटुंब जालना शहरातील प्रयाग नगर या भागात राहते.

त्यांचे पती सूक्ष्म सिंचनाच्या व्यवसायात आहेत. जेव्हा कोरोना कालावधी दरम्यान लॉकडाऊन लावण्यात आला तेव्हा ते काही दिवसांसाठी गावाकडे आले. त्यांच्या घरच्या शेतामध्ये तेव्हा मिरचीची लागवड केलेली होती व मिरचीला लॉकडाऊन मध्ये खूप कमी बाजार भाव मिळत होता. त्यामुळे त्यांनी मिरची तोडून आणली व मिरची पावडर तयार करण्यासाठी त्या जालन्यात आल्या.

या घरच्या मिरची पासून त्यांनी मिरची पावडर तयार केली व मैत्रिणींना थेट शेतातील मिरची पासून बनवलेली मिरची पावडर दिली व त्यांच्या मैत्रिणींना देखील ती आवडली. नंतर परत काही कॉन्टिटी मध्ये त्यांनी मिरच्या गावाकडून आणल्या व एक क्विंटल मिरचीची पावडर बनवली. विशेष म्हणजे एका दिवसामध्ये त्यांनी ही संपूर्ण मिरची पावडर विकली.

तेव्हा त्यांच्या डोक्यात आले की एका दिवसामध्ये जर एका क्विंटल मिरचीची पावडर विकली जाऊ शकते तर मिरची पावडरचा व्यवसाय का आपण सुरू करू नये? हा प्रश्न त्यांच्या मनामध्ये आला व त्यांनी व्यवसायाला सुरुवात करण्याचा विचार केला. सुरुवातीला त्यांनी फक्त पाच हजार रुपयांचा खर्च करून या व्यवसायाला सुरुवात केली.

आज त्यांचा हा व्यवसाय संपूर्ण राज्यामध्ये चांगल्यापैकी पसरला असून राज्यातील बऱ्याच भागांमध्ये त्यांच्या मसाल्याची विक्री होते. यांचा जालना मसाला आज छत्रपती संभाजी नगर, नागपूर तसेच नाशिक व मुंबई,पुण्यासारख्या शहरांपर्यंत पोहोचला आहे.

व्यवसायाच्या सुरुवातीला त्यांनी हळद आणि मिरची पावडर तयार करायला सुरुवात केली व आता त्या व्यवसायाचा विस्तार करत त्यांनी किचन किंग मसाला,

कांदा लसूण मसाला, चिकन व मटन मसाला अशा मसाल्यांच्या अनेक प्रकारापर्यंत त्यांचा व्यवसाय पोहोचलेला आहे. या त्यांच्या व्यवसायामध्ये त्यांना पती आणि कुटुंबाची साथ मिळाली असून त्यांनी 18 महिलांना रोजगार देखील उपलब्ध करून दिलेला आहे.

किती आहे त्यांचा वार्षिक टर्नओव्हर?
आज या व्यवसायातून त्यांच्या व्यवसायातून कुटुंबाची भरभराट झाली असून त्यांनी जवळपास आता 1500 एकर शेत जमिनीवरील हळद आणि मिरचीचा शेतकऱ्यांकडून करार करून घेतला आहे. त्यांचा या व्यवसायातून 50 लाख रुपयांचा टर्नओव्हर असून पंधरा लाख रुपयांचे निव्वळ उत्पन्न त्यांना या व्यवसायातून सध्या मिळत आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe