सरकारी कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज ! आठवा वेतन आयोगाबाबत ‘या’ तारखेला निर्णय होणार ? सरकार जारी करणार अधिसूचना

Tejas B Shelar
Published:
7th Pay Commission News

7th Pay Commission News : अलीकडेच केंद्र सरकारने जुलै-डिसेंबर या कालावधीसाठीचा DA (महागाई भत्ता) वाढवण्याची घोषणा केली आहे. यानुसार आता केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 53% झाला आहे. आधी हा महागाई भत्ता 50 टक्के एवढा होता.

अर्थातच केंद्रातील सरकारने महागाई भत्ता तीन टक्क्यांनी वाढवला आहे. दरम्यान महागाई भत्ता वाढीनंतर सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आणखी एक खुशखबर समोर येत आहे.

खरेतर, सरकारी कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने नवीन वेतन आयोगाचा प्रश्न उपस्थित केला जातोय. म्हणून आता पुढील वेतन आयोगाबाबत सरकार लवकरच काही निर्णय घेणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या मनात हा प्रश्न बऱ्याच दिवसांपासून आहे आणि सरकार लवकरच याबाबत घोषणा करेल अशी अपेक्षा केली जाऊ शकते.

आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की दर 10 वर्षांनी एक नवीन वेतन आयोग तयार केला जातो. नवीन वेतन आयोगामध्ये सरकारी कर्मचाऱ्यांचे वेतन आणि निवृत्ती वेतन विविध आर्थिक मापदंड, विशेषत: महागाईनुसार सुधारित केले जाते.

मिळालेल्या माहितीनुसार पुढील वर्षी सुरुवातीलाच केंद्रातील सरकार आठवा वेतन आयोगाबाबत निर्णय घेण्याची शक्यता आहे. पुढील वर्षी सादर होणाऱ्या केंद्रीय अर्थसंकल्पात आठवा वेतन आयोगाची घोषणा होणार असा अंदाज काही मीडिया रिपोर्ट मध्ये वर्तवण्यात आला आहे.

2025 मध्ये सादर होणाऱ्या केंद्रीय अर्थसंकल्पात आठवा वेतन आयोगाची स्थापना करण्याचा निर्णय होईल. आठवा वेतन आयोगाची स्थापना झाल्यानंतर आयोगाच्या माध्यमातून आपल्या शिफारशींना अंतिम रूप देण्यासाठी थोडासा वेळ घेतला जाईल.

आयोगांच्या माध्यमातून शिफारशींना अंतिम रूप दिल्यानंतर याबाबतचा अहवाल शासनाकडे जमा होईल आणि यानंतर मग 1 जानेवारी 2026 पासून प्रत्यक्षात आठवा वेतन आयोग लागू होऊ शकतो अशी शक्यता वर्तवली जात आहे.

आम्ही आपणास सांगू इच्छितो की पहिला वेतन आयोग 1946 मध्ये लागू झाला होता. तेव्हापासून प्रत्येक दहा वर्षांनी नवीन वेतन आयोग लागू होत आला आहे. सध्याचा सातवा वेतन आयोग हा 2016 पासून लागू करण्यात आला आहे.

मात्र, या वेतन आयोगाची स्थापना ही 2014 मध्ये करण्यात आली होती. सातव्या वेतन आयोगाची स्थापना झाल्यानंतर दोन वर्षांनी हा वेतन आयोग लागू झाला म्हणजेच 1 जानेवारी 2016 पासून सातवा वेतन आयोग सरकारी कर्मचाऱ्यांसाठी बहाल करण्यात आला.

तेव्हापासून कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू झालाय. आता सरकारी कर्मचाऱ्यांना नवीन आठवा वेतन आयोगाची प्रतीक्षा असून याबाबतचा निर्णय पुढील वर्षी होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. यामुळे खरंच पुढील वर्षी सरकार याबाबत निर्णय घेणार का ही गोष्ट पाहण्यासारखी ठरणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe