MG Motor कंपनीच्या ‘या’ कार आजपासून महाग झाल्यात, 89 हजारापर्यंत वाढल्यात किमती !

MG Motor Price Hike : आजपासून एमजी मोटर कार महाग झाल्या आहेत. यापूर्वी, एमजीने जानेवारीत त्याच्या वाहनांच्या किंमती वाढवल्या होत्या आणि आता किंमती पुन्हा वाढविण्यात आल्या आहेत. म्हणजे नव्या वर्षाच्या पहिल्या दोन्ही महिन्यांमध्ये एमजी मोटर्स कंपनीने आपल्या काही वाहनांच्या किमती वाढवण्याचा निर्णय घेतलेला आहे.

यामुळे मात्र ग्राहकांना मोठ्या प्रमाणात फटका बसतोय. कंपनीने सलग दुसऱ्यांदा वाहनांच्या किमती वाढवण्याचा निर्णय घेतला असल्याने आता एमजीच्या गाड्या घेणे महाग होणार आहे. महत्त्वाची बाब अशी की, यावेळी वाहनांच्या किंमती 89 हजार रुपयांपर्यंत वाढल्या आहेत.

या किमती आजपासूनच म्हणजेच एक फेब्रुवारी 2025 पासून प्रभावी राहणार असल्याची माहिती कंपनीकडून समोर आली आहे. यात झेडएस ईव्हीची किंमत 89,000 रुपयांपर्यंत वाढली आहे.

इनपुट कॉस्टमध्ये वाढ झाल्यामुळे कंपनीला किंमत वाढवावी लागली असल्याचे कंपनीकडून स्पष्ट करण्यात आले आहे. दरम्यान आज आपण कंपनीने कोणकोणत्या मॉडेलच्या किमती वाढवल्या आहेत आणि सुधारित किमती काय आहेत या संदर्भात अगदी थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

MG हेक्टर : एमजी हेक्टर एक मजबूत एसयूव्ही आहे. ही गाडी भारतात मोठ्या प्रमाणात लोकप्रिय झाली आहे. ही गाडी तब्बल 13 प्रकारांमध्ये म्हणजेच व्हेरियंटमध्ये उपलब्ध आहे. हे दोन्ही पेट्रोल आणि डिझेल इंजिन पर्यायांसह दिले जाते. भारतीय बाजारपेठेतील त्याची एक्स शोरूमची किंमत 14 लाख ते 22.89 लाख रुपये आहे.

या गाडीच्या विविध व्हेरियंटच्या किमती किंमत 33,000 रुपयांपासून ते 41 हजार रुपयांपर्यंत वाढवण्यात आल्या आहेत. या गाडीचा परफॉर्मन्स हा खूपच दमदार आहे. विशेषता या गाडीचा परफॉर्मन्स हायवेवर फारच उत्कृष्ट असून चालकाला ही गाडी चालवताना एक वेगळाच आनंद मिळतो.

एमजी मोटर झेडएस ईव्ही : एमजीने आपल्या प्रीमियम इलेक्ट्रिक कार झेडएस ईव्ही च्या किंमती 61,000 रुपयांपासून ते 89,000 रुपयांपर्यंत वाढवल्या आहेत. या कारची किंमत सर्वात जास्त वाढवण्यात आले असून ही गाडी सहा व्हेरिएंट मध्ये बाजारात उपलब्ध आहे. दैनंदिन वापरासाठी गाडी फारच उपयुक्त आहे. हायवेवर सुद्धा या गाडीची कामगिरी विशेष उल्लेखनीय आहे.

MG अ‍ॅस्टर : एमजी एस्टर एक उत्तम आणि उच्च तंत्रज्ञान असणारी एसयूव्ही आहे. या गाडीची किंमत 10 लाख ते 18.35 लाख (एक्स-शोरूम) पर्यंत आहे. या कारची किंमत 12,000 रुपयांवरून 24,000 रुपये झाली आहे. यात सर्वात प्रगत वैशिष्ट्य समाविष्ट आहे.

MG कॉमेट ईव्ही : MG Comet ईव्हीची किंमत 7 लाख रुपयांपासून 9.67 लाख (एक्स-शोरूम) पर्यंत जाते, ती पाच वेरियंट मध्ये बाजारात उपलब्ध आहे. मात्र एक फेब्रुवारी 2025 पासून कंपनीने या कारची किंमत 12,000 रुपयांपासून ते 19,000 रुपयांपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतलेला आहे. यामुळे जर तुम्हाला ही गाडी खरेदी करायची असेल तर आता अधिकचा पैसा खर्च करावा लागणार आहे.