MHADA Lottery 2023 : म्हाडा संदर्भात एक मोठी माहिती हाती येत आहे. ज्या लोकांनी म्हाडासाठी अर्ज केला असेल अशांसाठी ही बातमी अति महत्त्वाची आहे. खरं पाहता म्हाडासाठी अर्ज करण्याची आणि पेमेंट करण्याची तारीख ही उलटून गेली आहे. अशा परिस्थितीत ज्या लोकांनी आता म्हाडाच्या घरासाठी अर्ज केला आहे अशा लोकांना आता लॉटरीची चाहूल लागली आहे. अर्ज केलेले लोक आता लॉटरी केव्हा जाहीर होईल याकडे मोठ बारीक लक्ष ठेवून आहेत. अशा परिस्थितीत, आज आम्ही अशा लोकांच्या सोयीसाठी म्हाडाच्या लॉटरी संदर्भात एक बहुमूल्य माहिती घेऊन हजर झालो आहोत.
आज आपण म्हाडाची प्रत्यक्षात लॉटरी केव्हा लागणार आहे? तसेच, ज्या लोकांना घर मिळणार नाही म्हणजेच लॉटरीत नाव लागणार नाही अशा लोकांना त्यांनी गुंतवलेला पैसा केव्हा रिफंड होणार आहे? या महत्त्वाच्या दिवसाच्या तारखांची माहिती घेऊन हजर झालो आहोत. चला तर मग क्षणाचा ही विलंब न करता जाणून घेऊया या बहुमूल्य माहिती विषयी. एका मीडिया रिपोर्ट मध्ये दिलेल्या माहितीनुसार 13 फेब्रुवारी रोजी म्हणजेच सोमवारी ड्राफ्ट एप्लीकेशन पब्लिश होणार आहे. तसेच 15 फेब्रुवारी रोजी फायनल एप्लीकेशन होणार असल्याचे सांगितले गेले आहे.
आणि मग 17 फेब्रुवारी रोजी म्हणजेच शुक्रवारी लॉटरी काढली जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे ज्यांना लॉटरीमध्ये घर लागणार नाहीत अशांना 20 फेब्रुवारीपासून त्यांचा पैसा परत करण्याचीं प्रोसेस सुरू होणार आहे. अर्ज करणाऱ्यांना कागदपत्रांची पडताळणी देखील करावी लागणार आहे. रहिवासी दाखला, उत्पन्नाचा दाखला, पॅन कार्ड, आधार कार्ड, पंधरा वर्षे महाराष्ट्रात अधिवास असल्याचे प्रमाणपत्र, याशिवाय जर अर्जदार कोट्यातून घर घेत असेल तर त्याला तसे पुरावे सादर करावे लागतील.
दरम्यान ही पडताळणी पूर्ण झाल्यानंतर पुढील प्रोसेस केली जाणार आहे. लॉटरी ऑनलाईन देखील पाहता येणार आहे. हाउसिंग डॉट म्हाडा डॉट जीओव्ही डॉट इन (housing.mhada.gov.in) या संकेतस्थळावर ऑनलाईन लॉटरी पाहिली जाणार आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की मुंबई, पुणे आणि नागपूर विभागासाठी यावेळी म्हाडाने लॉटरी काढली आहे. आता लॉटरी 17 फेब्रुवारी रोजी लागणार असल्याने सर्वांचे लक्ष याकडे लागून आहे.