Mhada Lottery 2023 : मुंबईमध्ये घर घेऊ इच्छिणाऱ्या व्यक्तींसाठी एक महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर येत आहे ती म्हाडा मुंबई मंडळाकडून. खरं पाहता, राजधानी मुंबईमध्ये घरांच्या किमती गेल्या काही दशकात विक्रमी वाढल्या आहेत.
यामुळे सर्वसामान्यांचे घर घेण्याचे स्वप्न अजूनही अपूर्णच आहे. मात्र आता मुंबईमध्ये घर घेण्याचे स्वप्न पूर्ण करण्याची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. कारण की, म्हाडा मुंबई मंडळाने हजारो घरांसाठी लॉटरी काढली आहे.
मुंबई मंडळाने 4 हजार 38 घरांसाठी लॉटरी काढली असून यासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. 22 मे 2023 पासून अर्ज भरण्यास सुरुवात झाली असून इच्छुक व्यक्तींना लवकरात लवकर अर्ज सादर करण्याचे आवाहन केले जात आहे.
हे पण वाचा :- मुंबई ते नागपूर प्रवास करणाऱ्या रेल्वे प्रवाशांसाठी महत्वाची बातमी ! ‘ही’ एक्सप्रेस ट्रेन दोन दिवस झाली रद्द, वाचा डिटेल्स
चार वर्षानंतर निघाली लॉटरी
म्हाडाच्या मुंबई मंडळांने याआधी 2019 मध्ये घरांसाठी सोडत जारी केली होती. तेव्हापासून मुंबईमध्ये घरांसाठी म्हाडाची लॉटरी निघालेली नाही. म्हणून या घर सोडतीकडे अनेकांचे लक्ष लागून होते. दरम्यान चार वर्षानंतर आता म्हाडाची लॉटरी निघाली आहे.
त्यामुळे या घर सोडतीला नागरिकांची पसंती मिळणार आहे. या लॉटरीसाठी लाखो लोक अर्ज करणार असल्याचे सांगितले जात आहे. निश्चितच मुंबईमध्ये घर घेणाऱ्यांसाठी एक सुवर्णसंधी राहणार आहे. मात्र या लॉटरी संदर्भात लोकांचे काही प्रश्न देखील आहेत.
या लॉटरीसाठी अर्ज कोण करू शकतो, अर्ज कुठे करावा लागणार, यासाठी कोणती कागदपत्रे लागतील, लॉटरीचे वेळापत्रक कसे आहे? यांसारखे प्रश्न नागरिकांकडून विचारले जात आहेत. दरम्यान आज आपण या प्रश्नांचे उत्तर जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
म्हाडाच्या घरांसाठी कोण अर्ज करू शकतो?
किमान 18 वर्षे वय असलेले नागरीक म्हाडाच्या घरांसाठी अर्ज करण्यास पात्र राहणार आहेत.
पण अर्ज करणारा व्यक्ती पंधरा वर्षे महाराष्ट्राचा रहिवासी असणे अनिवार्य आहे.
म्हाडाच्या घरासाठी पॅन कार्ड असलेला व्यक्तीच अर्ज करू शकणार आहे.
तसेच ज्या व्यक्तीच्या नावावर या आधी कोणतच घर नाही असेच व्यक्ती या घरांसाठी पात्र राहतील.
अर्ज कसा आणि कुठे करायचा?
म्हाडाच्या घरांसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागतो.
lottery.mhada.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन इच्छुक व्यक्ती आपला अर्ज सादर करू शकतात.
अर्ज केवळ म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळावरच सादर करायचा आहे.
अर्ज सादर करताना इच्छुक व्यक्तींना आवश्यक कागदपत्रे देखील सादर करावी लागणार आहेत. एकूण 7 महत्त्वाची कागदपत्रे अर्जदारांना सादर करावी लागतात.
अर्जातील माहिती आणि कागदपत्रांमधील माहिती यामध्ये तफावत आढळल्यास अर्ज बाद होतो यामुळे अर्ज भरताना काळजी घेणे अपेक्षित आहे.
हे पण वाचा :- मोठी बातमी ! बारावीनंतर आता महाराष्ट्र बोर्डाच्या 10वीच्या निकालाची तारीख जाहीर ? ‘या’ दिवशी लागणार रिजल्ट, वाचा….
कोण-कोणती कागदपत्रे लागणार
अर्जदाराचे ओळखपत्र म्हणून आधार कार्ड ( यावर पत्ता असणे अनिवार्य आहे)
महाराष्ट्रात रहिवासी असल्याचे तहसीलदार यांनी दिलेली अधिवास प्रमाणपत्र ( क्यूआर कोडं सहित)
उत्पन्नाचा पुरावा म्हणून बँक स्टेटमेंट आणि सॅलरी स्लिप
अर्जदाराचे कास्ट सर्टिफिकेट
अर्जदाराचा जन्म दाखला
ड्रायव्हिंग लायसन्स
पॅन कार्ड
अर्जदाराचा पासपोर्ट
शाळा सोडल्याचा दाखला
मतदार ओळखपत्र
म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या घर सोडतीचे वेळापत्रक
ऑनलाईन अर्ज सादर करण्याची अंतिम दिनांक :- 22 मे 2023 पासून ऑनलाईन अर्ज सुरुवात झाली असून 26 जून 2023 पर्यंत ऑनलाईन अर्ज करता येणार आहेत.
ऑनलाइन पेमेंट करण्याची अंतिम दिनांक :- 26 जून 2023 पर्यंत ऑनलाईन पेमेंट करता येणार आहे.
आरटीजीएस आणि एन ई एफ टी ने पेमेंट करण्याची अंतिम दिनांक :- 28 जून 2023
लॉटरी केव्हा काढली जाणार :- 18 जुलै 2023 वांद्रे येथील रंगशारता सदन येथे लॉटरी काढली जाणार आहे.
हे पण वाचा :- मुंबई-गोवा वंदे भारत एक्सप्रेस संदर्भात मोठी अपडेट ! नवीन वंदे भारत मडगावकडे रवाना; केव्हा होणार उदघाट्न? पहा….