सर्वसामान्यांसाठी आनंदाची बातमी ! Mhada महाराष्ट्रातील या शहरातील शेकडो घरांसाठी लॉटरी जाहीर करणार

Published on -

Mhada News : राज्यातील सर्वसामान्य नागरिकांसाठी एक महत्त्वाचे अपडेट समोर येत आहे. ही अपडेट नव्याने घर खरेदी करू इच्छिणाऱ्यांसाठी अधिक खास ठरणार आहे. खरतर अलीकडे मुंबई ठाणे पुणे नाशिक अशा महानगरांमध्ये घरांच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत.

मात्र म्हाडा प्राधिकरणाकडून राज्यातील सर्वसामान्य नागरिकांना परवडणाऱ्या दरात घरांची उपलब्धता करून दिली जात आहे. महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरण (म्हाडा) नाशिक मंडळाकडून परवडणाऱ्या दरातील घरांसाठी मोठी लॉटरी जाहीर करण्यात आली आहे.

नाशिक शहराच्या वेगवेगळ्या भागांमध्ये बांधण्यात येणाऱ्या एकूण 402 घरांच्या विक्रीसाठी ही लॉटरी काढली जात असून, घरांच्या किंमती 14 लाखांपासून 36 लाखांपर्यंत आहेत.

मुंबईतील वांद्रे येथील मुख्यालयात झालेल्या कार्यक्रमात म्हाडाचे उपाध्यक्ष संजीव जैस्वाल यांनी या लॉटरीसाठी नोंदणी प्रक्रिया आणि ऑनलाइन अर्ज मागवण्याचा शुभारंभ केला. म्हाडाकडून नाशिकमध्ये उपलब्ध होणारी ही चौथी परवडणारी गृहसंधी आहे.

विशेष म्हणजे, ज्या घरांसाठी ही लॉटरी काढली जात आहे ती घरे अद्याप बांधली गेलेली नाहीत. लॉटरीत विजयी ठरलेल्या अर्जदारांनी घराची रक्कम पाच हप्त्यांमध्ये भरण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे.

अल्प उत्पन्न गटासाठी 293 घरे

अल्प उत्पन्न गटातील (EWS/LIG) नागरिकांसाठी यंदाच्या लॉटरीत सर्वाधिक म्हणजे 293 घरे राखीव ठेवण्यात आली आहेत. 

चुंचाळे शिवार – 138 घरे

पाथार्डी शिवार – 30 घरे

मखमलाबाद शिवार – 48 घरे

आडगाव शिवार – 77 घरे

तर मध्यम उत्पन्न गटासाठी (MIG) 109 घरे उपलब्ध करून देण्यात आली आहेत. त्यात सातपूर शिवारात 40, पाथर्डीत 35 आणि आडगाव येथे 34 घरांचा समावेश आहे.

अर्जासाठी आवश्यक कागदपत्रे

लॉटरीत सहभागी होण्यासाठी अर्जदारांना 1 एप्रिल 2024 ते 31 मार्च 2025 या कालावधीतील उत्पन्नाचा पुरावा सादर करावा लागेल. यासाठी इन्कम टॅक्स रिटर्न किंवा तहसील कार्यालयाद्वारे मिळणारे उत्पन्न प्रमाणपत्र ग्राह्य धरले जाईल.

पुण्यातील लॉटरीला तुफान प्रतिसाद

दरम्यान, अलीकडेच म्हाडाच्या पुणे मंडळाने काढलेल्या 4,186 घरांच्या सोडतीला अर्जदारांकडून अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. एकूण 1,82,781 ऑनलाईन अर्ज प्राप्त झाले असून 1,33,885 अर्जदारांनी अनामत रक्कम भरून प्रक्रिया पूर्ण केली आहे.

एका घरासाठी तब्बल 43 अर्जदार स्पर्धेत असल्याचे दिसून आले. अर्ज प्रक्रियेदरम्यान काही तांत्रिक अडचणी आल्यामुळे मुदतवाढ देण्याचा निर्णय मंडळाने घेतला होता. म्हाडाच्या नाशिक लॉटरीमुळे सामान्य आणि मध्यमवर्गीय नागरिकांसाठी गृहस्वप्न साकार होण्याची आशा निर्माण झाली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe