Mhada News : अलीकडे मुंबईसारख्या शहरांमध्ये घरांच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. मुंबई पुणे नाशिक नागपूर ठाणे अमरावती नागपूर अशा शहरांमध्ये घर घेणे म्हणजेच मोठे आव्हानात्मक काम आहे. या महानगरांमध्ये घरांसाठी लाखो रुपये मोजावे लागतात. त्यामुळे अनेक जण म्हाडाच्या घरांची वाट पाहतात.
म्हाडाच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांना परवडणाऱ्या किमतीत घरे उपलब्ध करून दिली जातात. या घरांमुळे राज्यातील विविध महानगरांमधील नागरिकांचे घर खरेदीचे स्वप्न पूर्ण झाले आहे. अशातच आता म्हाडा प्राधिकरणाने मुंबईतील घरांबाबत एक मोठा निर्णय घेतला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दक्षिण मुंबईतील कोसळलेल्या किंवा रिकाम्या केलेल्या उपकरप्राप्त इमारतींमधील तळमजल्यावरील रहिवाशांसाठी प्राधिकरणाच्या माध्यमातून नुकताच एक मोठा दिलासा देणारा निर्णय घेण्यात आला आहे.
जाणकार लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, याआधी तळमजल्यावरील रहिवाशांना कायमस्वरूपी घर मिळवण्याचा अधिकार नव्हता. मात्र आता या तळमजल्यावरील रहिवाशांना सुद्धा घर मिळणार आहे. अशा रहिवाशांना सुद्धा बृहतसूचीत सामावून घेण्यात येणार असल्याची माहिती जाणकार लोकांकडून देण्यात आली आहे.
पण यासाठी काही अटी आणि शर्ती आहेत. यासाठीची अट अशी की, संबंधित इमारत ही कोसळलेली किंवा रिकामी केलेली असणे आवश्यक आहे. या अटीचे पालन करणाऱ्या लोकांना यामुळे मोठा दिलासा मिळणार आहे. झंकार लोकांनी असे सांगितले आहे की उपकरप्राप्त इमारती म्हणजे 1969 पूर्वी बांधलेल्या जुन्या, भाडेनियंत्रित इमारती असून त्यांचे वर्गीकरण तीन श्रेणींमध्ये होते.
दरम्यान, या इमारतीपैकी अनेक इमारती या जीर्ण अवस्थेत आहेत. म्हणून या संबंधित जुन्या इमारती विविध शहरी नूतनीकरण योजनांअंतर्गत पुनर्विकासासाठी पात्र असल्याची माहिती संबंधितांच्या माध्यमातून देण्यात आली आहे.
महत्त्वाची बाब अशी की ज्या ईमारतींचे पुनर्विकास प्रकल्प रखडले आहेत किंवा ज्या इमारती म्हाडा प्राधिकरणाच्या माध्यमातून अधिग्रहीत करण्यात आलेल्या आहेत अशा इमारतीमधील भाडेकरूंचा देखील समावेशासाठी विचार होणार असल्याची महत्त्वाची माहिती या निमित्ताने पुढे आली आहे.
अशातच म्हाडाशी संबंधित लोकांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सध्या प्राधिकरणाच्या माध्यमातून संक्रमण शिबिरात राहणाऱ्या रहिवाशांचे बायोमेट्रिक सर्वेक्षण केले जात आहे, ज्यामुळे त्यांच्या वर्गवारीनुसार हक्क निश्चित होणार अशी शक्यता आहे.
बायोमेट्रिक सर्वेक्षण पूर्ण झाल्यानंतर नागरिकांना अ ब क अशा श्रेणीमध्ये डिवाइड केले जाणार आहे. दरम्यान, तळमजल्यावर राहत असलेल्या राहणाऱ्या लोकांबाबत घेण्यात आलेल्या निर्णयामुळे अनेक रहिवासी, जे आजही संक्रमण शिबिरातच राहत आहेत, त्यांना आपल्या हक्काचे घर मिळणार असा विश्वास व्यक्त होतोय.
दरम्यान म्हाडाकडून इमारतींचा पुनर्विकास पूर्ण झाल्यावर अशा संबंधित पात्र लाभधारकांना कायमस्वरूपी घरे मिळणार आहेत. नक्कीच प्राधिकरणाकडून घेण्यात आलेला हा निर्णय अनेक रहिवाशांसाठी मोठा दिलासा देणारा राहणार आहे यात शन्काचं नाही.