अखेर प्रतीक्षा संपली ! म्हाडा ‘या’ मंडळात काढणार 4000 घरांसाठी लॉटरी; ‘या’ महिन्यात निघणार सोडत, घरांची किंमत आणि जागेचा तपशील वाचा

Ajay Patil
Published:
Mumbai Mhada News

Mhada News : राजधानी मुंबईत आपल हक्काचे घर शोधणाऱ्या प्रत्येक व्यक्तीसाठी आजची ही बातमी विशेष खास आहे. वास्तविक, गेल्या काही वर्षांपासून मुंबईमध्ये घरांच्या किमती मोठ्या वाढल्या आहेत. मुंबई शहराचा झपाट्याने होणारा विस्तार, वाढती लोकसंख्या, घर बांधण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या मटेरियलच्या किमतीत झालेली वाढ, इंधनदर वाढ, वाढती महागाई या सर्व पार्श्वभूमीवर मुंबईसह सर्वच महत्त्वाच्या शहरांमध्ये घरांच्या किमती वाढल्या आहेत.

यामुळे सर्वसामान्य आपल्या स्वप्नातील घर पूर्ण करण्यासाठी कायमच म्हाडाच्या माध्यमातून तयार करण्यात आलेल्या घरांचा सर्वप्रथम विचार करत असतात. दरम्यान मुंबई मधील म्हाडाच्या घरांबाबत एक मोठी माहिती हाती आली आहे.

हे पण वाचा :- शेअर बाजारातील गुंतवणूकदारांसाठी महत्त्वाची बातमी; ‘हा’ शेअर लवकरच आकाशाला गवसणी घालणार, मिळणार 74% रिटर्न; तज्ज्ञांचा अंदाज, पहा…..

हाती आलेल्या माहितीनुसार मुंबईमध्ये लवकरच चार हजार घरांची सोडत म्हाडाकडून काढली जाणार आहे. या चालू महिन्यात म्हणजेच एप्रिलमध्ये ही घर सोडत निघेल असा दावा काही मीडिया रिपोर्ट मध्ये झाला आहे. वास्तविक मुंबईमध्ये म्हाडाकडून गेल्या चार वर्षात घरांसाठीची कोणतीच सोडत काढण्यात आलेली नाही. यामुळे मुंबईमध्ये म्हाडाच्या घर सोडतिची वाट पाहणाऱ्या प्रत्येक नागरिकांसाठी ही एक मोठी आनंदाची बातमी आहे.

दरम्यान याबाबत मुंबई मंडळाचे अध्यक्ष मिलिंद बोरीकर यांनी मोठी माहिती दिली आहे. त्यांनी सांगितले की, गोरेगाव मध्ये सुरू असलेल्या म्हाडाच्या दोन मोठ्या प्रकल्पांना ओसी सर्टिफिकेट लवकरच मिळणार आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की म्हाडाच्या प्रकल्पांसाठी ऑक्सूपेंसी सर्टिफिकेकट म्हणजे ओसी सर्टिफिकेट अति महत्त्वाचे असते.

हे पण वाचा :- काय सांगता ! ‘या’ मुख्यमंत्र्यांकडे आहे सर्वात जास्त पैसा; महाराष्ट्रातील मुख्यमंत्र्यांकडे किती कोटी, पहा कोट्याधीश मुख्यमंत्र्यांची यादी

अशा परिस्थितीत या दोन प्रकल्पांना हे सर्टिफिकेट लवकरच मिळणार असल्याने या प्रकल्पातील घरे सोडतीसाठी येत्या काही दिवसांत उपलब्ध होणार आहेत. यासोबतच या घरांच्या सोडतीसाठी आवश्यक असलेल्या इतर विभागातील परवानग्यां देखील घेण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू असून काही विभागाच्या परवानग्यां ऑलरेडी म्हाडाच्या मुंबई मंडळाला मिळाल्या आहेत. अशा परिस्थितीत, लवकरच गोरेगावसह इतर भागातील घरांसाठीची सोडत जारी होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

हे पण वाचा :- शेतकऱ्यांसाठी खुशखबर! आता बँका देणार वाढीव पीककर्ज, कोणत्या पिकाला किती कर्ज? पहा संपूर्ण माहिती एका क्लिकवर

कोणत्या भागातील घरांसाठी जारी होणार सोडत

मिळालेल्या माहितीनुसार, गोरेगाव येथील 2638 घरांचा या सोडतीमध्ये समावेश राहणार आहे. कन्नमवार नगर, वांद्रे, बोरिवली, मागाठाणेसह अन्य ठिकाणांच्या घरांचा देखील यामध्ये समावेश असेल. एकूण चार हजार घरांसाठी ही सोडत काढली जाणार आहे. दरम्यान गोरेगाव मध्ये अल्पगटासाठी उपलब्ध होणाऱ्या घरांच्या किमती 45 लाखापर्यंत राहणार आहेत आणि ईडब्लूएससाठीच्या घरांच्या किमती या जवळपास 35 लाखापर्यंत असतील अशी माहिती समोर आली आहे. इतर गटातील घरांच्या किमती अद्याप सार्वजनिक झालेल्या नाहीत मात्र लवकरच यादेखील किमती पुढे येतील.

केव्हा निघणार जाहिरात, कसं राहणार वेळापत्रक?

एका प्रतिष्ठित मीडिया रिपोर्ट मध्ये दिलेल्या माहितीनुसार, या चालू महिन्यात म्हणजे एप्रिल अखेरीस किंवा मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात या लॉटरीची जाहिरात प्रसिद्ध होण्याची शक्यता आहे. जर या मीडिया रिपोर्ट मध्ये दिलेली माहिती खरी ठरली तर जाहिरात निघाल्यानंतर लगेचच म्हणजे मे महिन्यात नोंदणी प्रक्रिया सुरु होईल अन अर्जविक्री आणि अर्जस्वीकृती प्रक्रिया देखील मे-जून मध्ये राबवली जाऊ शकते. यानंतर मग जूनमध्ये या घर सोडतीचा निकाल लागू शकतो अशी शक्यता तज्ञ लोकांच्या माध्यमातून व्यक्त केली जात आहे.

हे पण वाचा :- विद्यार्थ्यांसाठी खुशखबर ! आता 10 ते 15 दिवसांत मिळणार कास्ट व्हॅलेडीटी सर्टिफिकेट; ‘या’ ठिकाणी करा अर्ज, ही कागदपत्रे तयार ठेवा, पहा…..

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe