MHADA News : मुंबईकरांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे. म्हाडा कडून लवकरच मोठ्या प्रमाणात घराची सोडत जारी होणार आहे. यामुळे म्हाडाच्या घरांच्या सोडतीची प्रतीक्षा करणाऱ्या मुंबईकरांना लवकरच खुशखबर मिळणार असल्याचे चित्र आहे. मिळालेल्या माहितीनुसार पुढल्या महिन्यात म्हाडाच्या माध्यमातून चार हजार घरांची सोडत सुरु होणार आहे.
म्हणजेच मार्च महिन्यात म्हाडाच्या घराच्या सोडतीची मुंबईकरांचीं प्रतीक्षा संपणार आहे. यासाठी आवश्यक तयारी जोरात सुरू असल्याचे सांगितले जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार या 4000 घरांपैकी 2683 घरे ही गोरेगावच्या टेकडी प्रकल्पातील राहणार आहेत. कन्नमवार नगर, वांद्रे, बोरिवली इत्यादी ठिकाणांच्या घरांचा देखील यामध्ये समावेश राहणार आहे.

आम्ही आपणास सांगू इच्छितो की, गोरेगावमध्ये म्हाडाच्या माध्यमातून दोन प्रकल्प उभारले जात आहेत. भूखंड-अ आणि भूखंड-ब वर हे प्रकल्प विकसित होत आहेत. यापैकी भूखंड अ हा लिंक रोडवरील मेट्रो स्टेशनजवळ आहे. या प्रकल्पात अत्यल्प उत्पन्न गटात म्हणजे ईडब्ल्यूएस गटात प्रत्येकी 23 मजल्यांच्या सात इमारतींचा समावेश राहणार असल्याची माहिती समोर आली आहे. या संपूर्ण भूखंड अ मधील प्रकल्प मध्ये 322 चौरस फुटांची 1239 घरे म्हाडाच्या माध्यमातून बांधली जात आहेत.
याशिवाय जर आपण भूखंड ब मधील प्रकल्पाचा विचार केला तर यामध्ये 4-4 इमारती अत्यल्प आणि अल्प उत्पन्न गटाच्या राहणार आहेत. हा दुसरा प्रकल्प एसव्ही रोडजवळ म्हाडा कडून विकसित होत आहे. एका मीडिया रिपोर्ट मध्ये दिलेल्या माहितीनुसार गोरेगाव मध्ये विकसित होणाऱ्या या प्रकल्प अंतर्गत म्हाडाकडून जी घरांची सोडत जारी होणार आहे त्या घरांचे दर 35 ते 45 लाखांपर्यंत राहणार आहेत.
अत्यल्प गटातील घरांची किंमत 35 लाख आणि अल्प गटातील घरांची किंमत 45 लाखांपर्यंत राहणार आहे. म्हणजेच मध्य आणि उच्च उत्पन्न गटातील घरे सध्या तयार होत असून याची सोडत पुढल्या महिन्यात होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान या उच्च उत्पन्न गटातील घराच्या किमती बाबत देखील अद्याप माहिती हाती आलेली नाही. सदर मीडिया रिपोर्टवर जर विश्वास ठेवला तर उच्च उत्पन्न गटातील घराच्या किमती ठरवल्या गेलेल्या नाहीत. याच्या किमती नंतर ठरवल्या जाणार आहेत.
दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार आता माढाकडून घर सोडत जिंकल्यानंतर तात्काळ दिले जाणार आहेत. सोडत जिंकलेल्या लोकांनी पैसे भरले की तात्काळ त्यांना घराच्या चाव्या दिल्या जातील असं सांगितलं जात आहे. यासाठी म्हाडाच्या संकेतस्थळावर ऑनलाइन नोंदणी सुरू झाल्याची माहिती हाती आली आहे. निश्चितच म्हाडा कडून घराची सोडतीची वाट पाहणाऱ्यांसाठी ही एक गुड न्यूज आहे.