Mhada News : प्रत्येकाचे आपले एक हक्काचे घर असावे असे स्वप्न असते. यासाठी प्रत्येक जण आपल्या परीने काबाडकष्ट करत असतो. घर घेणे हे आयुष्यातील एक मोठी उपलब्धी आहे. सर्वसामान्य कुटुंबातील तरुण नोकरी लागल्यानंतर पहिल्यांदा घराचा विचार करतात. यासाठी होम लोन काढले जाते आणि घर खरेदीचे स्वप्न पूर्ण केले जाते.
मात्र अलीकडील काही वर्षांमध्ये घरांच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढल्या असून आणि या अशा काळात सर्वसामान्य नागरिकांना म्हाडा आणि सिडको कडून उपलब्ध होणाऱ्या घरांमुळे मोठा आधार मिळत आहे. दरम्यान म्हाडाच्या कोकण मंडळांने सर्वसामान्य नागरिकांसाठी लवकरच 8,000 घरांची लॉटरी काढण्याची योजना आखली आहे.

यामुळे कोकण मंडळा अंतर्गत येणाऱ्या कार्यक्षेत्रात म्हाडाचे घर घेऊ इच्छिणाऱ्या नागरिकांना मोठा दिलासा मिळणार असल्याचे बोलले जात आहे. खरे तर नुकत्याच काही दिवसांपूर्वी म्हाडा मुंबई मंडळाने 203 घरांसाठी लॉटरी जाहीर केली होती.
या लॉटरीसाठी लाखों लोकांनी अर्ज केले असून यातून विजयी होणाऱ्या उमेदवारांना घराचा ताबा दिला जाणार आहे. यासाठी लवकरच म्हाडा मुंबई मंडळाची संगणकीय सोडत निघणार आहे. दरम्यान, आता मुंबई मंडळानंतर कोकण मंडळाने देखील हजारो घरांसाठी लॉटरी काढण्याचा निर्णय घेतला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार ऑक्टोबर महिन्यात कोकण मंडळाच्या माध्यमातून 8000 घरांसाठी लॉटरी काढली जाणार आहे. महत्त्वाची बाब अशी की ही लॉटरी ऑक्टोबरच्या पहिल्याच आठवड्यात काढली जाणार असून लॉटरीची जाहिरात प्रसिद्ध झाली की त्याच दिवसापासून अर्ज विक्री आणि स्वीकृतीच्या प्रक्रियेला सुरुवात होणार आहे.
किती घरांसाठी आणि कोणत्या तारखेला निघणार लॉटरी
मिळालेल्या माहितीनुसार, 3 ऑक्टोबरला म्हाडा कोकण मंडळ ठाण्यातील 20% योजनेतील 913 घरांसाठी प्रथम येणाऱ्या प्राधान्य योजनेअंतर्गत लॉटरी जाहीर करणार आहे.
ही लॉटरी जाहीर झाली की पाच दिवसांनी म्हणजेच 8 ऑक्टोबरला कोकण मंडळाच्या माध्यमातून माडाच्या विविध योजनांमधील 7000 घरांसाठी लॉटरी जाहीर करणार आहे. म्हणजे जवळपास 8000 घरांसाठी कोकण मंडळाकडून लॉटरी काढली जाणार आहे.
घरांच्या किमती काय राहणार
कोकण मंडळाच्या आगामी सोडतीत खाजगी बिल्डरांकडून म्हाडाला उपलब्ध झालेल्या ठाणे शहर, टिटवाळा आणि वसई परिसरातील घरांचा समावेश राहणार आहे. महत्त्वाचे म्हणजे मोक्याच्या ठिकाणी उपलब्ध होणाऱ्या या घरांची किंमत वीस लाख रुपये एवढी राहील असा एक अंदाज समोर येत आहे.
तथापि किमती बाबत अजूनही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. जेव्हा कोकण मंडळाची लॉटरी जाहीर होईल तेव्हाच किमती बाबत योग्य ती माहिती समोर येऊ शकणार आहे.