म्हाडा पुणे मंडळाचा पुन्हा मोठा निर्णय ! ४,१८६ घरांच्या लॉटरीसाठी अर्ज करण्यास अजून मिळाली मुदतवाढ, नवीन तारीख पहा….

Published on -

Mhada Pune News : मुंबई पुणे ठाणे नागपूर कोल्हापूर सोलापूर अशा महानगरांमध्ये घर घेण म्हणजे फारच आव्हानात्मक काम बनत चालल आहे. नागरिकांना आपल्या आवडत्या लोकेशनवर घर खरेदी करायचे असल्यास आता लाखो रुपयांचा खर्च करावा लागतोय. प्रॉपर्टीच्या किमती सतत आकाशाला गवसणी घालत आहेत अशा स्थितीत अनेकांचे घराचे स्वप्न अजूनही स्वप्नच राहील आहे.

परंतु या महानगरांमध्ये म्हाडाच्या माध्यमातून सर्वसामान्यांसाठी परवडणाऱ्या किमतीत घर उपलब्ध करून दिली जात आहेत. सर्वसामान्य जनता म्हाडाच्या घरांना चांगला प्रतिसाद सुद्धा दाखवत आहे. दरम्यान माडाच्या पुणे मंडळांकडूनही सर्वसामान्यांकरीता हजारो घरांसाठी लॉटरी जाहीर करण्यात आली आहे.

पुणे, पिंपरी-चिंचवड, पीएमआरडीए तसेच सोलापूर, कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील विविध गृहनिर्माण प्रकल्पांमध्ये उपलब्ध असलेल्या घरांसाठी ही लॉटरी जाहीर केली असून याच लॉटरी बाबत आता एक नवं अपडेट समोर आल आहे.

या ४,१८६ सदनिकांसाठी आयोजित संगणकीय लॉटरीसाठी अर्ज करण्याची मुदत पुन्हा एकदा वाढवण्याचा निर्णय बोर्डाकडून घेण्यात आलाय आणि यामुळे सर्वसामान्यांना नक्कीच मोठा दिलासा मिळणार आहे.

नव्या डेडलाईनुसार आता पुणे मंडळाच्या या लॉटरीसाठी अर्जदारांना ३० नोव्हेंबर २०२५ रोजी रात्री ११.५९ वाजेपर्यंत ऑनलाइन अर्ज सादर करता येणार आहेत. यापूर्वी अर्ज करण्याची अंतिम तारीख २० नोव्हेंबर २०२५ होती. अर्थात यावेळी मंडळांनी दहा दिवसांची मुदत वाढवून दिली आहे.

यापूर्वीही मंडळांने एकदा मुदत वाढवून दिली होती आणि आता पुन्हा एकदा मुदत वाढवण्यात आली असल्याने समाधान व्यक्त केले जात आहे. पण ही शेवटची मुदतवाढ राहण्याची शक्यता आहे यामुळे इच्छुक अर्जदारांनी ताबडतोब योग्य कागदपत्रांसहित अर्ज सादर करणे त्यांच्या हिताचे राहणार आहेत.

बोर्डाकडून उपलब्ध माहितीनुसार, या योजनेसाठी आतापर्यंत १,८२,७८१ ऑनलाइन अर्ज प्राप्त झाले आहेत, त्यापैकी १,३३,८८५ अर्ज अनामत रकमेसह नोंदवले गेले आहेत. मोठ्या प्रमाणावर मिळालेल्या प्रतिसादामुळे आणि कागदपत्र पडताळणीदरम्यान अनेक अर्जदारांना आलेल्या तांत्रिक अडचणी लक्षात घेऊन म्हाडाने अर्जाची मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला.

अर्जदारांना ३० नोव्हेंबर २०२५ पर्यंत ऑनलाइन अनामत रक्कम भरता येणार आहे. तर RTGS/NEFT द्वारे भरणा करणाऱ्यांसाठी १ डिसेंबर २०२५ रोजी संबंधित बँकेच्या कार्यालयीन वेळेपर्यंत मुदत देण्यात आली आहे.

लॉटरी कधी?

या सदनिकांच्या विक्रीसाठीची संगणकीय लॉटरी ११ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी १२ वाजता काढण्यात येणार आहे. नवीन वेळापत्रक म्हाडाच्या अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध करण्यात येईल.

इतर सर्व अटी व जाहिरातीतील तपशील पूर्वीप्रमाणेच लागू राहतील, असे पुणे मंडळाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. अर्ज प्रक्रियेत आलेल्या तांत्रिक अडचणी, कागदपत्र पडताळणीतील विलंब आणि नागरिकांकडून वाढीव मुदतीची झालेली मागणी लक्षात घेऊन मंडळाने अर्ज भरण्यास मुदत वाढ दिल्याचे समजते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News