Mocha Cyclone Maharashtra : गेल्या दीड ते दोन महिन्यांपासून राज्यात सातत्याने अवकाळी पाऊस आणि गारपीट होत आहे. यामुळे शेतकरी बांधव मोठ्या चिंतेत सापडले आहेत. शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
मुंबई आणि उपनगरात तसेच पुणे, अहमदनगर यांसारख्या शहरात देखील अवकाळी पावसाने अक्षरशः थैमान माजवले होते. यामुळे शहरातील जनजीवन थोड्या काळ का होईना विस्कळीत झाले होते. अशातच आता देशात मोचा चक्रीवादळाने आपला मोर्चा खोलला आहे.
बंगालच्या उपसागरात तयार होत असलेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे येत्या 48 तासात या चक्रीवादळाची निर्मिती होणार असल्याचे हवामान विभागाच्या माध्यमातून सांगितले गेले आहे.
यामुळे बंगालच्या उपसागरात तयार होत असलेल्या या चक्रीवादळाचा फटका आपल्या महाराष्ट्राला देखील बसणार का? किंवा देशातील कोणत्या राज्याला या चक्रीवादळाचा सर्वाधिक धोका राहणार आहे? याविषयी आज आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
हे पण वाचा :- बातमी कामाची ! अवकाळी पावसामुळे मान्सूनकाळात पर्जन्यमान कमी राहणार का? पहा या प्रश्नाचे उत्तर सविस्तर
कोणत्या राज्याला बसणार फटका?
मोचा चक्रीवादळाचा फटका हा ओडिशा आणि पश्चिम बंगाल या दोन राज्यांना सर्वाधिक बसणार असून या पार्श्वभूमीवर भारतीय हवामान विभागाच्या माध्यमातून या दोन्ही राज्यांना हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.
ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी यासंदर्भात नुकतीच एक आढावा बैठक देखील घेतली आहे. या बैठकीत मुख्यमंत्री महोदय यांनी आपातकालीन परिस्थितीमध्ये सर्व यंत्रणा सज्ज ठेवण्याचे आदेश दिले आहेत. हवामान खात्याने येत्या पाच दिवसांसाठी या चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर वायव्य भारतासाठी अलर्ट जारी केला आहे.
या चक्रीवादळाचा ओडिशा आणि पश्चिम बंगाल या दोन राज्यांना सर्वाधिक फटका बसण्याची शक्यता आहे. यासोबतच IMD ने पुढील दोन दिवस वायव्य भारतात जोरदार वाऱ्यासह हलका ते मध्यम पाऊस मोचा चक्रीवादळामुळे पडू शकतो असा अंदाज बांधला आहे. अर्थातच वायव्य भारतात या चक्रीवादळामुळे पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
या चक्रीवादळाचा आपल्या महाराष्ट्राला फटका बसणार नाही हे यावरून सिद्ध होते. मात्र आगामी काही दिवस भारतीय हवामान विभागाने महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात पावसाची शक्यता वर्तवली आहे. परंतु चक्रीवादळाचा कोणताच विपरीत परिणाम महाराष्ट्रावर होणार नाही असं सध्या स्थितीला स्पष्ट झालं आहे.
हे पण वाचा :- खुशखबर ! राज्यातील बेरोजगार तरुणांना मिळणार 1 लाखाचे बिनव्याजी कर्ज, पहा कोणते युवक राहणार पात्र?