केंद्रातील मोदी सरकारचा राज्यातील रेल्वे प्रवाशांसाठी मोठा निर्णय ! ‘या’ Railway मार्ग प्रकल्पाला मंजुरी

राज्यातील रेल्वे प्रवाशांसाठी एका महत्वाच्या रेल्वे प्रकल्पाला मंजुरी देण्यात आली आहे. केंद्रातील सरकारने राज्यातील गोंदिया-बल्हारशाह रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणासाठी तब्बल 4,819 कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी देण्यात आली आहे.

Updated on -

Maharashtra Railway : राज्यातील रेल्वे प्रवाशांसाठी मोठा निर्णय घेण्यात आला आहे. केंद्रातील मोदी सरकारने एका महत्वाच्या रेल्वे प्रकल्पाला मंजुरी दिली आहे. नुकत्याच संपन्न झालेल्या मोदी सरकारच्या मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण रेल्वे प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली असून, महाराष्ट्रालाही एका प्रकल्पाची भेट मिळाली आहे.

राज्यातील गोंदिया-बल्हारशाह रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणासाठी केंद्रातील सरकारकडून मंजुरी मिळाली असून या प्रकल्पासाठी तब्बल 4,819 कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी देण्यात आली आहे. रेल्वे, माहिती व प्रसारण, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी याबाबत मोठी माहिती दिली आहे.
कोणत्या चार प्रकल्पांना मिळाली मान्यता

मिळालेल्या माहितीनुसार, एकूण 18,658 कोटी रुपये खर्चाच्या देशातील चार रेल्वे प्रकल्पांना मंत्रिमंडळाने हिरवा कंदील दाखवला आहे. या प्रकल्पांमुळे महाराष्ट्र, ओडिशा आणि छत्तीसगडमधील 15 जिल्ह्यांमध्ये रेल्वे जाळ्याचा विस्तार होणार आहे. या संबंधित राज्यांमधील 15 जिल्ह्यांमधील रेल्वे प्रवाशांना या मंजूर झालेल्या रेल्वे प्रकल्पांचा फायदा होणार आहे.

संबंधित तीनही राज्यात हे प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर सुमारे 1247 किमीचे रेल्वेचे जाळे तयार होणार आहे. या मंजूर करण्यात आलेल्या चार प्रकल्पांमध्ये गोंदिया-बल्हारशाह डबलिंगसह, संबलपूर-जरापडा तिसरी आणि चौथी लाईन, झारसुगुडा-सासन तिसरी आणि चौथी लाईन, तसेच खरसिया-नया रायपूर-परमलकसा पाचवी आणि सहावी लाईन यांचा समावेश आहे.

महाराष्ट्रातील प्रकल्प कसा आहे?

गोंदिया-बल्हारशाह रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण हा प्रकल्प नागझिरा अभयारण्य आणि नवागाव राष्ट्रीय उद्यान अशा प्रमुख पर्यटन स्थळांना कनेक्टिव्हिटी देणार आहे, इतकाच नव्हे तर तो उत्तर भारतातील राज्यांना दक्षिण भारताशी जोडणाऱ्या महत्त्वाच्या मार्गांपैकी एक आहे. या प्रकल्पामुळे महाराष्ट्रातील विदर्भ आणि मराठवाडा विभागांतील तसेच तेलंगणातील काही भागांतील आर्थिक घडामोडींना चालना मिळणार आहे. मराठवाडा आणि विदर्भ विभागातील एकात्मिक विकासाला या प्रकल्पामुळे चालना मिळणार आहे.

या प्रकल्पाच्या लाभार्थी जिल्ह्यांमध्ये गोंदिया, भंडारा, गडचिरोली आणि चंद्रपूरचा समावेश आहे. या मार्गावर 29 स्थानके, 36 मोठे पूल, 338 छोटे पूल, आणि 67 रूबल्स प्रस्तावित आहेत. एकूण 248 किमी लांबीचा हा रेल्वे मार्ग असून ट्रॅकची लांबी 268 किमी असेल. या विस्तारामुळे अधिक मालवाहतूक गाड्या तसेच मेल, एक्सप्रेस व प्रवासी गाड्यांची हाताळणी करता येणार आहे. नक्कीच राज्यातील रेल्वेचे नेटवर्क या प्रकल्पामुळे आणखी सक्षम होणार आहे आणि रेल्वे वाहतूक आणखी सोयीची होणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News