Mofat Ration Scheme : सध्या देशात नवरात्र उत्सवाची धूम सुरू असून लवकरच विजयादशमी अर्थातच दसऱ्याचा मोठा सण साजरा होणार आहे. यानंतर मग दिवाळीचा सण येणार आहे. दरम्यान, विजयादशमी अर्थात दसरा आणि दिवाळी सण येण्याआधीच देशभरातील सर्वसामान्य गोरगरीब जनतेसाठी केंद्रातील मोदी सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे.
हा निर्णय देशभरातील सर्वसामान्य रेशन कार्ड धारकांसाठी मोठा फायद्याचा ठरणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार काल झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मोफत रेशन वाटपाच्या योजनेला मुदतवाढ देण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला आहे.

भारतीय रेशन कार्ड धारकांना पुढील चार वर्ष म्हणजेच वर्ष 2028 पर्यंत आता मोफत रेशन पुरवले जाणार आहे. यामुळे नक्कीच देशभरातील सर्वसामान्य गरीब रेशन कार्डधारकांना या निर्णयाचा मोठा फायदा होणार आहे.
केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी मोदी सरकारने घेतलेल्या या निर्णयाची माहिती दिली आहे. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितल्याप्रमाणे, मोदी सरकारने देशाच्या विकासाला चालना देण्यासाठी नुकताच एक ऐतिहासिक निर्णय घेतला आहे.
देशातील नागरिकांची पोषण सुरक्षा वाढवण्यासाठी मंत्रिमंडळाने जुलै २०२४ ते डिसेंबर २०२८ पर्यंत पंतप्रधान गरीब कल्याण योजना (PMGKAY) आणि इतर कल्याणकारी योजनांतर्गत मोफत तांदळाचा पुरवठा सुरू ठेवण्यास मंजुरी दिली असल्याची माहिती त्यांनी प्रसार माध्यमांना दिली आहे.
गरिबांना मोफत तांदळाचा पुरवठा केल्यास सर्वसामान्य नागरिकांना पोषण आहार मिळणार आहे. यामुळे त्यांचे आरोग्य अधिक चांगले होणार आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की कोरोना काळापासून देशातील रेशन कार्डधारकांना मोफत रेशन उपलब्ध करून दिले जात आहे.
कोरोना काळात आलेल्या अडचणींमुळे सर्वसामान्यांचे उपासमार होऊ नये यासाठी केंद्रातील सरकारने मोफत रेशन देण्याचा निर्णय घेतला होता. पुढे वेळोवेळी या योजनेला मुदतवाढ देण्यात आली.
दरम्यान कालच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत या योजनेला तब्बल चार वर्षांची मुदतवाढ मिळाली आहे. आता देशातील सर्वसामान्य रेशन कार्डधारकांना डिसेंबर 2028 पर्यंत मोफत रेशन मिळणार आहे.