Monsoon 2022 :- गेल्या प्रदीर्घ काळापासून उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांसाठी दिलासादायक बातमी आहे. भारतीय हवामान विभागाने वर्तविलेल्या अंदाजानुसार नैऋत्य मान्सूनची वाटचाल सुरू झाली आहे.
पुढील ४८ तासांनी नैऋत्य मोसमी पावसाच्या दक्षिण अंदमान समुद्र, निकोबार बेटे, दक्षिण-पूर्व बंगालच्या उपसागरात आगमनाची शक्यता आता वेधशाळेने वर्तविली आहे.
केरळमध्येही मान्सून वेळेआधीच दाखल होण्याचा अंदाज हवामान विभागाने यापूर्वीच वर्तविला आहे.
२७ मेपर्यंत मान्सून भारतीय किनारपट्टीवर पोहोचेल आणि पहिला पाऊस केरळमध्ये पडेल असा अंदाज आहे. त्याला पृष्टी देणारी वाटचाल आता सुरू झाल्याचे दिसून येते.