Monsoon 2024 : गेल्या अनेक दिवसांपासून मान्सूनच्या परतीच्या पावसाची वाट पाहिली जात आहे. मान्सूनचा परतीचा प्रवास कधी सुरू होणार? अशी विचारणा केली जात आहे. सप्टेंबर महिना सुरू झाला की परतीच्या पावसाचे वेध लागत असते. दरवर्षी मान्सूनचा परतीचा प्रवास 17 सप्टेंबरला वायव्य भारतातून सुरू होत असतो. पण यंदा मात्र ही सर्वसाधारण तारीख उलटली तरी देखील हा प्रवास सुरू झालेला नाही.
अशातच आता भारतीय हवामान खात्याने मान्सून 2024 संदर्भात एक नवीन अपडेट दिली आहे. खरे तर गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील पावसाचा जोर कमी झाला आहे. हवामान खात्याने कालपासून राज्यात पाऊस पुन्हा एकदा सक्रिय झाला असल्याची माहिती दिली आहे.
मात्र राज्यात अजूनही पावसाचा जोर फारच मंदावलेला असल्याचे भासत आहे. अशातच, आता भारतीय हवामान खात्याने मान्सून बाबत मोठी माहिती दिली आहे. भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार यंदा मान्सूनचा परतीचा प्रवास लांबला आहे.
दरवर्षी 17 सप्टेंबरला परतीच्या पावसाला सुरुवात होत असते यंदा मात्र 23 सप्टेंबर पासून मान्सून माघारी फिरण्यास सुरुवात करणार आहे. सर्वप्रथम मान्सून राजस्थान सह वायव्य भारतातून माघार घेणार आहे. हवामान खात्याने या संदर्भात एक प्रसिद्ध पत्रक काढले आहे.
सदर प्रसिद्धी पत्रकानुसार सध्या मान्सून माघारी फिरण्यासाठी अनुकूल वातावरण आहे. सध्याची परिस्थिती पाहता उद्या अर्थातच 23 सप्टेंबरला पश्चिम राजस्थान व कच्छ या भागातून नैऋत्य मौसमी वारे अर्थातच मान्सूनच्या परतीचा प्रवास सुरु होणार आहे.
म्हणजे गेल्या अनेक दिवसांपासून ज्या परतीच्या पावसाची वाट पाहिली जात होती तो परतीचा पाऊस आता लवकरच सुरू होणार आहे. महाराष्ट्रात देखील लवकरच परतीच्या पावसाला सुरुवात होणार आहे.
दरम्यान भारतीय हवामान खात्याने आज अर्थातच 22 सप्टेंबरला राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे. या पार्श्वभूमीवर आज 22 सप्टेंबरला मराठवाड्यातील परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, धारशिव या जिल्ह्यांना जोरदार पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
आम्ही आपणास सांगू इच्छितो की जून ते सप्टेंबर हे चार महिने मान्सूनचे असतात. यंदा मात्र या चार पैकी पहिल्या तीन महिन्यांमध्येचं सरासरीपेक्षा जास्तीचा पाऊस झाला आहे. गेल्या वर्षी संपूर्ण मान्सून काळात सरासरी एवढा पाऊस झाला नाही.
यंदा मात्र जून, जुलै आणि ऑगस्ट या तीन महिन्यांमध्येचं सरासरीपेक्षा जास्तीच्या पावसाची नोंद करण्यात आली आहे. शिवाय आगामी काही दिवस राज्यात आणखी जोरदार पावसाची शक्यता वर्तवली जात आहे.